Monday, May 8, 2017

छत्रपती छत्रपती शाहू महाराज आणि मुस्लिम समाज

          शाहू महाराज यांचे मुस्लिम प्रेम कदाचित मुस्लिम समाजात येवू दिले नाही वा मुस्लिम समाजासही समजले नाही.निदान मुस्लिम समाजाने यावर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.छत्रपती शिवरायांचा सर्वधर्मसमभाव हा छत्रपती शाहू महाराजांनी जोपासला.जगाच्या इतिहासात मुस्लिम समाजासाठीही प्रेम करणार्या लोकराजाने १९०६ मध्ये स्वत:च्या पुढाकाराने प्रमुख मुस्लिम मंडळांची सभा बोलावून मोहोमेडन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून मुस्लिम बोर्डींग सुरु केले.संस्थानातील दर्गे,मशिदी इ.धार्मिक स्थळांच्या खर्चातून उरलेला पैसा मुस्लिम समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला.या सोसायटीचे छत्रपती शाहू महाराज खुद्द पदसिद्ध अध्यक्ष होते.इतिहासात मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शाहू महाराज कदाचित पहिलेच असू शकतील.मुस्लिमांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शाहू महाराजांनी जोरदार प्रयत्न केले.मात्र मुस्लिम समाजाने या संधीचा फ़ायदा घेतला नाही.शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाज थंड राहिल्यावरही छत्रपती शाहू राजे मात्र थंड न बसता या समाजातील शिक्षणाची आवड असणार्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देऊन मुस्लिम शिक्षणास चालना दिली.

(हे पण वाचा आरक्षणाची संकल्पना)

         मुस्लिम बोर्डिंग साठी चौफ़ाळाच्या माळावर पंचवीस ह
जार चौरस फ़ुटाची मोकळी जागा व इमारत बांधणीस ५५०० रु.ची भरगोस देणगी दिली व संस्थानच्या जंगलातून मोफ़त सागवान लाकूड दिले.मुस्लिम समाजातील मुलांनी शिकावे यासाठी भरभरून दान छत्रपती शाहू महाराजांनी दिले.मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा सन्मान करणे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य नव्हे काय ? उर्दू शाळांमधून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जिवंत ठेवण्यास मुस्लिम समाजाने छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून हे कार्य जोमाने पुढे नेणे आता आवश्यक बनले आहे.
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com    
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...