आपले हात सुंदर दिसावेत असं कुणाला नाही वाटणार? पण हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी हाताची नखं सुंदर दिसणं फार आवश्यक आहे. हेल्दी आणि स्टायलिश नखं हवं असतील तर तुम्हाला नखांची काळजी घेणंही तितकचं गरजेचं असतं. बरेच लोक नखांकडे दुर्लक्ष करतात. मात्र ते अयोग्य आहे. नखांच्या काळजी घेण्याकरता आठवड्यातून एकदा मॅन्युकेअर केलं पाहिजे. मेनिक्युअर तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. तसेच तुमची नखं सुंदर रहावी यासाठी आम्ही काही खास टीप्स जाणून घेऊयात...
👉 नखांना नेलपेंट लावून नखांचं सौंदर्य आणखी वाढवता येईल.
👉 नखांना शेप देण्यासाठी फायलरचा वापर करा.
👉 नखांच्या टोकांचं रक्षण करण्यासाठी नेहमी टॉप कोट लावा.
👉 हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा मेनिक्युअरिंग करा. घरच्या घरी मेनिक्युअर केलं तरी कमीत कमी चार ते सहा आठवड्यांतून एकदा पार्लरमधून मेनिक्युअर करून घ्या.
👉 आंघोळीनंतर मेनिक्युअर करणं उत्तम. याचं कारण म्हणजे खूप पाण्यामुळे नखांतील मळ निघालेला असतो.
👉 आठवड्यातून एकदाच नेलपेंट रिमूव्हरचा वापर करा. रिमूव्हरचा अतिवापर केल्यास नखं कोरडी पडतात.
👉 नखांना मॉइश्चरायझर पुरवण्यासाठी एखाद्या क्लीअर / ट्रान्स्परन्ट नेलपेंटचा वापर टॉप कोट किंवा सीलर म्हणून करता येईल.
👉 रोज गाजराचा रस पिणं नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळवून देईल. यामुळे नखं मजबूत होण्यास मदत होते.
👉 साबणाने हात धुतल्यावर क्रीम किंवा लोशन लावा. साबणामुळे हात आणि नखं कोरडी पडतात. नखांना आणि हातांना पुरेसं मॉइश्चरायझर मिळावं यासाठी लोशन, क्रीम लावा.
👉 नेलपेंट लावण्यापूर्वी नेलपेंटची बाटली हलवून घ्या.
👉 क्लिअर नेलपेंटचा बेस कोट लावल्यावर कलर नेलपेंट नखांना लावा.
👉 मध्यभाग, डावा आणि उजवा किंवा उजवा, मध्यभाग आणि डावा अशा क्रमाने नेलपेंट लावा.
👉 नेलपेंट लावताना नेहमी दोन कोट लावा. दोनपेक्षा अधिक कोट लावल्यास नखांच्या वाढीचा वेग कमी होतो.
👉 नेलपेंटचा पहिला कोट सुकल्यावरच दुसरा कोट लावा.
👉 अॅसिटोनचा वापर रीमूव्हर म्हणून करू नका.
👉 नेलपेंटची बाटली थंड आणि कोरड्या जागेत, सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. ही बाटली तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.
👉 नखं खूप लांब वाढवू नका. लांब नखांमध्ये मळ साठू शकतो. यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे.
👉 नखं साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे साधारण गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा आणि फार टोकदार नसणार्या फायलरने नीट शेप द्या.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment