व्यायामाबरोबरच गरज असते ती योग्य आहाराची. ज्यामुळे तुम्ही गाळलेल्या घामाचा परिणाम दिसायला मदत होते, तसेच यामुळे स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढण्यास सुद्धा मदत होते. जरी तुम्ही व्यायामानंतर योग्य आहार घेत असलात तरी व्यायाम कारण्यापूर्वीही काही फळे खावीत त्याने नक्कीच फायदा होईल...
(हे पण वाचा : आरोग्यमंथन भाग 1)
👉 केळी :
स्नायूंना बळकटी येण्यासाठी केळी उपयुक्त ठरते. त्यामुळे व्यायाम करण्याआधी केळी खाणे आवश्यक आहे.
👉 ड्राय फ्रूट :
सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर तरतरीत राहता. त्यामुळे वर्कआऊटआधी ड्राय फ्रूट खाणे अतिशय उत्तम.
👉 ओट्स :
ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहण्यासाठी ओट्स खावेत.
👉 कॉफी:
व्यायाम करण्याआधी कॉफी पिणेही एक चांगला पर्याय आहे. कॉफी शरीरात इंधनाप्रमाणे काम करते.
👉फ्रूट स्मूदी :
कार्बोहायड्रेट्स फ्रूट्सच्या स्मूदीमुळे शरीर कणखर आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते. शिवाय, दिवसभर चेहऱ्यावर एकप्रकारचे तेज राहते.
👉 चणे :
व्यायाम करण्याआधी प्रोटिन आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असलेले चणे खायला हवेत.
👉 अंडी :
अंडी खाल्ल्याने विशेषत: व्यायाम करण्याआधी अंडी खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते.
👉 कडधान्य :
व्यायाम करण्याआधी आहारात कडधान्य असल्यास शरीराला फायद्याचे ठरते.
👉 पनीर :
पनीरमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि प्रोटिन अधिक असते. त्यामुळे व्यायाम करण्याआधी पनीर खाणे हा चांगला पर्याय आहे.
👉 चिकन आणि ब्राऊन राईस :
संध्याकाळी आणि रात्री व्यायाम करण्याआधी चिकन आणि ब्राऊन राईस हा पर्याय उत्तम आहे. यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात मिळतात.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment