Wednesday, May 10, 2017

हत्तींची वाटणी

    एक श्रीमंत माणूस होता. बरीच धनदौलत होती त्याची. आपला मॄत्युसमय जवळ येताच तीन मुलांमध्ये आपल्या मालमत्तेची वाटणी केली, आणि तो त्यांना म्हणाला, 'माझे एकूण सतरा हत्ती आहेत. त्यापैकी वडील मुलाने निम्मे घ्यावे. मधल्या मुलाने एक तृतीयांश घ्यावे; आणि सर्वांत धाकट्या मुलाने एक नवमांश घ्यावे,' याप्रमाणे सांगून झाल्यावर लगेच त्याला मृत्यु आला.
'हत्ती सतरा ! आणि त्यांच्या निम्मे घ्यायचे. म्हणजे साडेआठ हत्ती घ्यावे लागतील ! अर्थातच एका हत्तीला मध्येच कापावे लागले. असं कसं करुन चालेल ? पण तीच समस्या उरलेल्या दोन भावांमध्ये सतरा हत्तींची वाटणी करताना उदभवेल, मग हत्तींची वाटणी कशी करायची ?' हा प्रश्न त्या तीन भावांच्या वडीलधाऱ्या नातेवाइकांना पडला. अखेर त्यांनी हे प्रकरण न्यायमुर्ती रमण यांच्याकडे नेलं.त्या तीन भावांच म्हणणं ऎकून व क्षणभर विचार करुन न्यायमुर्ती रमण त्यांना म्हणाले, 'तुमच्या वडिलांनी ज्या प्रमाणात तुम्हाला हत्ती दिले जावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, त्या प्रमाणात तरे मी तुम्हाला हत्ती देईनच, पण प्रत्येकाच्या वाट्याला थोडासा अधिक हत्ती आला, तर त्या गोष्टीला तुमची हरकत आहे का ?'

'कुठल्याही हत्तीचा जीव न घेता, प्रत्येकाच्या वाट्याला जर थोडाथोडा हत्ती जास्त आला, तर उलट आनंदाचीच गोष्ट आहे ती.' असे त्या भावांनी सांगताच, न्यायमुर्ती रमण यांनी आपला हत्ती त्या सतरा हत्तीमंध्ये आणून उभा केला. मग त्या अठरा हत्तीम्चा निम्मा भाग म्हणून नऊ हत्ती रमण यांनी मोठ्या मुलाला दिले.
त्य अठरा हत्तींचा एक तृतीयांश भाग म्हणून त्यांनी सहा हत्ती मधल्या मुलाला दिले.
आणि अठरा हत्तींचा एक नवमांश हिस्सा म्हणून दोन हत्ती त्या धाकट्या मुलाला दिले.
अशा तऱ्हेनं ९+६+२= १७ हत्तीचं वाटप होताच, न्यायमुर्ती रमण आपल्या उरलेल्या हत्तीवर स्वार होऊन हसत हसत घरी गेले.
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com    
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...