Monday, February 27, 2017

अन्न भेसळ काही उदाहरणे

अन्नभेसळ: घरगुती तपासणी

1.दुध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ
दुधात पाणी मिसळणे किंवा त्यातील चरबी काढून घेणे.

2.शुध्द तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे.

3.लोण्यात पाणी जास्त प्रमाणात ठेवणे (वजन वाढण्यासाठी)

4.हळद पावडरीत एक विषारी पिवळा रंग मिसळणे.

5.मिरची पावडरीत (लाल तिखट) लाकडाचा भुसा, विटांची पावडर किंवा इतर पावडर मिसळणे.

6.हिंग खडयाबरोबर (किंवा खडयाच्या ऐवजी) इतर खडे विकले जातात.

7.रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो.

8.धान्यामध्ये खडे, किडके धान्य यांचे प्रमाण जास्त असेल तर ती भेसळ समजा
9.मोहरीमध्ये धोत-याचे बी मिसळले जाते व ते विषारी असते. (धोत-याचा दाणा एका बाजूला त्रिकोणी असतो व मोहरीपेक्षा साधारणपणे लहान असतो.) 

10.चहाच्या पावडरीमध्ये लाकडाचा भुसा वा एकदा वापरलेली चहापूड मिसळतात.

11.डाळींना कृत्रिम रंग देऊन आकर्षक केले जाते. हे रंग अपायकारक असतात.

12.खाद्यपदार्थात धुण्याचा सोडा घातला जातो. त्यामुळे आतडयांना इजा होते.

13.खाद्यतेलात विषारी तेले मिसळल्यामुळे अपंगत्व येण्याची शक्यता असते.

14.अरगटयुक्त बाजरी विकणे हाही गुन्हा आहे व त्यामुळे विषबाधा होऊ शकते. (सूचना : मिठाच्या पाण्यात अरगटयुक्त बाजरीचे दाणे तरंगतात व चांगले दाणे खाली जातात)

15.पिठीसाखरेत सोडा मिसळला जातो.
बेसन पिठात लाखी डाळीचे पीठ (एक विषारी डाळ) मिसळले जाते.

16.जिरे किंवा बडेशेप यामध्ये गवताचे बी मिसळले जाते. (सूचना : जि-याच्या दाण्यांवर बारीक रेघा असतात)

17.लवंग, दालचिनी वगैरे मसाल्याच्या पदार्थाचा अर्क काढून घेतात व निःसत्त्व माल बाजारात विकला जातो, हीही एक प्रकारची भेसळच आहे.

18.प्यायच्या दारूमध्ये स्पिरीट किंवा आणखी काही विषारी पदार्थ मिसळतात. (वास्तविक ही 'अन्नभेसळ' नाही, पण भेसळीचे घातक उदाहरण आहे.)

अन्नभेसळीचे दुष्परिणाम
          अन्नभेसळीचे दुष्परिणाम अनेक आहेत व रोज भेसळीचे अन्न पोटात जाऊन काही काळानंतर परिणाम दिसायला लागतात. काही वेळा मात्र ताबडतोब दुष्परिणाम दिसतात व मृत्यूही येऊ शकतो. अन्नभेसळीमुळे ब-याच लोकांना अपंगत्व आलेले आहे. तरीही भेसळ अखंडपणे चालूच आहे. भेसळीसंबंधी काही नेहमीची उदाहरणे आपण पाहिली.
भेसळीची शंका आल्यास त्या भागातल्या अन्ननिरीक्षकाशी संपर्क साधावा किंवा राज्य सरकारच्या आरोग्य प्रयोगशाळांशी संपर्क साधावा. या प्रयोगशाळा औरंगाबाद, नागपूर, पुणे, सोलापूर,कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नाशिक, कोकण भवन, जळगाव व सांगली येथे आहेत. शिवाय स्थानिक प्राथमिक आरोग्यकेंद्रे किंवा जिल्हा परिषदांचे आरोग्य अधिकारी यांच्या मार्फतही संपर्क साधता येईल.

  अन्नभेसळची तापसणी
          दूधामध्ये पाणी मिसळणे ही सामान्य तक्रार असते. यासाठी दुधाचा एक थेंब गुळगुळीत स्वच्छ उभ्या पृष्ठभागावर लावला तर शुध्द दुध तेथेच ठिपक्याप्रमाणे राहते. किंवा खाली ओघळून पांढरा पट्टा दिसतो. मात्र पाणी घातलेले दुध ताबडतोब खाली ओघळते आणि त्याचा ओघळ पांढरा दिसत नाही.

1. दुधामध्ये युरीया हे खत मिसळण्याची धास्ती मोठया प्रमाणावर असते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये पाच मि.ली. दूध घेऊन त्यात ब्रोमोथायमॉल या निळया औषधाचे दोन थेंब टाका. दहा मिनिटांनंतर निळा रंग आल्यास यात युरीया आहे असे समजा.

2. दुधामध्ये स्टार्च म्हणजे कांजी घातलेली तपासायची असल्यास दुधात 2-3 थेंब टिंक्चर आयोडिन टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्चची भेसळ आहे असे समजावे.

3. दुधामधून फॅट (चरबी) काढून घेतली असल्यास लॅक्टोमीटरने 26 च्या वरती रिडिंग येते. पण दुध घट्टच दिसते.

4. खव्यामध्ये कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. खव्याचा थोडा नमुना पाण्यात उकळावा,थंड करावा आणि त्यात आयोडिनचे थेंब टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च आहे (पिठूळ पदार्थ) असे समजावे.

5. पनीरमध्येही कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. यासाठी अशीच तपासणी करावी.

6. तुपामध्ये शिजवलेल्या बटाटयाचा किंवा रताळयाचा गर मिसळला जातो. याची तपासणी खव्याप्रमाणेच आयोडिनचे थेंब टाकून करता येते.

7. शुध्द तूप किंवा लोण्यात वनस्पती तूप भेसळ केले जाते. हे तपासण्यासाठी तूप किंवा लोण्याचा एक मोठा चमचाभर नमुना घेऊन तो गरम करा. एका छोटया वाटीत हा नमुना घेऊन त्यावर तेवढेच हायड्रोक्लोरिक आम्ल ओता आणि त्यातच एक चिमूटभर साखर टाका. हे मिश्रण थोडे हलवा आणि 5 मिनिटे स्थिर ठेवा. या मिश्रणात खालच्या बाजूला नारिंगी थर दिसल्यास वनस्पती तूपाची भेसळ आहे असे समजा.

8. आईसक्रीममध्ये धुण्याची पावडर मिसळली जाते. अशा आईसक्रीममध्ये लिंबाचे काही थेंब टाकल्यास बुडबुडे येतात. धुण्याची पावडर नसेल तर बुडबुडे येत नाहीत.

9. आईसक्रीमध्ये साखरेऐवजी सॅकॅरीन मिसळलेले असल्यास चवीवरून ते कळते. सॅकॅरीनची गोड चव जीभेवर बराच वेळ राहून नंतर एक कडवट चव शिल्लक राहते.

भेसळ ओळखा
1. धान्यामध्ये माती, खडे, दगडाचा चुरा, गवत, तणाच्या बिया, किडके धान्य, इत्यादी मिसळले जातात. यात कधीकधी किडे, उंदराचे केस आणि लेंडया सापडतात. ही भेसळ डोळयांनी पाहून समजते. ही भेसळ आरोग्याला घातक आहे.

2. आटा, मैदा रवा यांमध्ये बारीक वाळू किंवा माती मिसळली जाते. हे डोळयांनी पाहून कळते.

3. रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो. लोहचुंबक फिरवून लोखंड वेगळे काढता येते.

4. पिठीसाखरेमध्ये खडूची पावडर मिसळली जाते. हे तपासण्यासाठी काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडी साखर मिसळा. खडू असल्यास तो खाली तळाला साठतो.

5. मिठामध्ये खडूची पावडर मिसळली जाते आणि त्यासाठी अशीच तपासणी करावी.

6. पिठीसाखरेत भेसळीसाठी धुण्याचा सोडा टाकला जातो. या नमुन्यावर सौम्य हायड्रोक्लोरीक आम्ल टाका.त्यातून बुडबुडे आल्यास या नमुन्यात धुण्याचा सोडा आहे असे समजावे.

7. चांदीचा वर्ख मिठाईमध्ये वापरला जातो. मात्र बरेच मिठाई कारखाने चांदीच्या वर्खाऐवजी ऍल्युमिनियमचा घातक वर्ख वापरतात. हे तपासण्यासाठी हा वर्ख वेगळा काढून ज्योतीमध्ये धरा. वर्ख चांदीचा असेल तर तो वितळून बारीक गोळा बनतो. मात्र ऍल्युमिनियमचा वर्ख जळून करडी काळी राख बनते.

8. मधामध्ये पाणी साखरपाणी मिसळले जाते. हे तपासण्यासाठी कापसाची एक वात मधात भिजवून ती काडीने पेटवा शुध्द मध छान जळतो. मात्र त्यात पाणी असेल तर वात पेटत नाही किंवा पेटताना चरचर असा पाण्याचा आवाज येतो.

9. कॉफीमध्ये चिकोरी हा पदार्थ मिसळला जातो. यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन ही कॉफीची पावडर त्यावर विखरा. कॉफी असल्यास ती पाण्यावर तरंगते. पण चिकोरी काही सेकंदातच तळाला जाते. चिकोरीचे बुडणारे कण बुडताना रंगाच्या रेषा दिसतात.

10. चहामध्ये इतर वनस्पतींची रंगीत पाने मिसळली जातात. पांढ-या कागदावर हा चहा घासल्यास इतर वनस्पतींना दिलेला रंग कागदावर दिसतो. केवळ चहा असल्यास कागदाला रंग लागत नाही.

11. चहामध्ये वापरलेली चहापत्ती मिसळली जाते. यासाठी एक फिल्टरपेपरवर 3-4 पाण्याचे थेंब टाकून त्यावर थोडी चहापूड टाकावी. चांगला चहा असल्यास त्यावर लाल-काळे डाग दिसतात. चहा वापरलेला असल्यास रंगीत डाग दिसत नाहीत.

12. तेलांमध्ये काही वेळी अर्जिमोनतेल मिसळले जाते. हे तपासण्यासाठी तेलाचा नमुना एका टेस्टटयुबमध्ये घेऊन त्यात तेवढचे नायट्रिक ऍसिड टाकून हळूहळू ढवळा. लालसर रंग आल्यास भेसळ आहे असे समजावे.

13. तेलामध्ये मिनरल ऑईल भेसळ करण्याची उदाहरणे आढळतात. यासाठी तेलाचा 2 मि.ली नमुना टेस्टटयूबमध्ये घेऊन त्यात एन-12 अल्कोहोलिक पोटॅश मिसळावे. ही टेस्टटयूब मिश्रण 15 मिनिटे गरम पाण्यात घालून त्यात 10 मि.ली. पाणी टाकावे. मिनरल ऑईल असेल तर मिश्रण गढूळ दिसते.

14. खाद्यतेलामध्ये एरंडेल तेल मिसळण्याचे प्रकार असतात. हे तपासण्यासाठी तेलाचा 1मि.ली. नमुना घेऊन त्यात 10 मि.ली. ऍसिडीफाईड पेट्रोलियम इथर टाकावे आणि ढवळावे. या टेस्टटयूबमध्ये अमोनियम मॉलिबडेटचे काही थेंब टाकावे. पांढरा गढूळ रंग आल्यास एरंडेल तेल मिसळले आहे असे समजावे.

15. लाल मिरचीच्या पावडरमध्ये रोडामिन मिसळले जाते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये लात तिखटाचे दोन ग्रॅम (अर्धा चमचा) नमुना घेऊन त्यावर 5 मि.ली. ऍसिटोन टाका. (मुली नेलपॉलिश काढण्यासाठी वापरतात तो द्राव ऍसिटोन असतो.) यातून ताबडतोब लाल रंग उठल्यास रोडामिन आहे असे समजा. लाल तिखटात काही वेळा विटकरीचा भुगा मिसळला जातो. यासाठी हे तिखट ग्लासभर पाण्यात टाका. विटकरीचा अंश वेगाने खाली जातो तर मिरचीचे तिखट पाण्यावर बराचवेळ तरंगते आणि हळूहळू खाली जाते.

16. हळदीमध्ये मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग मिसळला जातो. यासाठी या हळदीवर हायड्रोक्लोरिक आम्लाचे 4-5 थेंब टाका. या पदार्थात मेटॅलिन यलो पावडर असेल तर ताबडतोब रंग जांभळा होतो. यात थोडे पाणी टाकले तरी हा जांभळा रंग टिकून राहतो. ही त्याची खूण आहे.

17. हळदीमध्ये रंगीत भुसा किंवा खडूची पावडर मिसळली जाते. हा नमुना पाण्यात टाकल्यास खडूची पावडत तळाशी बसते व भुसा तरंगत राहतो. हळदीचा अंश पाण्यात मिसळून जातो.

18. मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग तुरडाळ, मुगडाळ किंवा चणाडाळीवरपण वापरला जातो. हे तपासण्यासाठी कोमट पाण्यात नमुन्याची डाळ टाका. हे पाणी वेगळे काढून त्यात वरील आम्लाचे 2-3 थेंब टाका. गुलाबी रंग आल्यास मेटॅलिक पावडर आहे असे समजावे.

19. हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्यांवर मॅलाचाईट ग्रीन हा घातक रंग टाकला जातो. यासाठी एक पांढरा टिपकागद घेऊन त्यावर थोडे पाणी टाकून ओला करा आणि भाजीचा नमुना त्यावर ठेवा. हिरवा रंग कागदावर उतरल्यास भेसळ आहे असे समजा.

20. काळया मि-यांमध्ये पपईच्या वाळलेल्या बिया मिसळल्या जातात. यासाठी हा नमुना मद्यार्कात टाका. काळी मिरी असतील तर ती खाली बसतात. मात्र पपईच्या बिया तरंगतात.

21. हिंगामध्ये पिवळया दगडाची पूड मिसळली जाते. हे तपासण्यासाठी पेलाभर पाण्यात हिंगपावडरीचा नमुना टाका. हिंग असेल तर तरंगतो. आणि दगडाची पूड असल्यास ती खाली बसते. (सूचना : शुध्द हिंग पाण्यात विरघळतो व पाण्याचा रंग पांढरा होतो. हिंग बनावट असेल तर असे होणार नाही)

22. केशरामध्ये मक्याचे केस वाळवून मिसळले जातात. हे केस ओढले तर लगेच तुटतात. मात्र केशर सहज तुटत नाही कारण ते चिवट असते. तसेच हा नमुना पाण्यात टाकल्यास केशरातून रंग पाझरतो तर मक्याचे केस तसेच राहतात.
हल्ली बातम्यांमध्ये अन्नभेसळीची बरीच उदाहरणे दिसून येतात.
         यापैकी काही उदाहरणे खाली दिली आहेत. साली गाझियाबादमध्ये 2500किलो खवा एका ट्रॅक्टर ट्रॉलीतून जप्त केला. हा खवा उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे चालला होता. हा सर्व खवा भेसळयुक्त होता. यापूर्वीच असा50 टन भेसळीचा खवा याच भागात सापडला होता. हा सर्व खवा मिठाई करण्यासाठी वापरला जातो. अहमदाबादमध्ये शीतपेये पिऊन एक बालक दगावले आणि इतर दहाजण खूप आजारी पडले. या शीतपेयात बहुधा कीटकनाशके असावीत. जून 2009 मध्ये आग्रा शहरात पोलिसांना एक नकली तूपाचा कारखाना सापडला. प्राण्यांच्या चरबीपासून हे तूप बनवले जात होते. पण कुणीच सापडले नाही कारण कामगारांना आधीच धाडीची बातमी लागली होती. जुलै 2009 मध्ये हरियाना पोलिसांना भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे साठे सापडले. यात चीज, तूप आणि लोणी हे पदार्थ होते आणि सर्वात रासायनिक पदार्थ मिसळलेले तपासल्यावर यात पांढरा रंग, धुण्याचा सोडा,हायड्रोजन वगैरे पदार्थ सापडले. या पदार्थांचा वेगळा साठाही सापडला. शीतपेयांमध्ये घातक कीटकनाशके सापडल्यानंतर बराच गहजब झाला. यामुळे लोकांनी या कंपनीची शीतपेये पिणे मोठया प्रमाणावर कमी केले. मध्य प्रदेशातील पाच व्यापा-यांना तुपात भेसळ केल्याबद्दल अटक झाली. हा धंदा ग्वाल्हेर परिसरात मोठया प्रमाणावर पसरलेला होता. महाराष्ट्रात फलटण परिसरात रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले द्रावण दुधात मिसळण्याचे एक कारस्थानच उघडकीला आले. दुधाच्या धंद्यात भेसळीची अनेक उदाहरणे सापडतात. टीपकागद, युरीया,इतर रसायने, पाणी वगैरे अनेक पदार्थ गवळी स्वत: किंवा दुधाचे व्यापारी मिसळतात असा संशय आहे. काही फळांमध्ये रंगाचे इंजेक्शन देऊन कृत्रिम रंग आणला जातो. टोमॅटो, पपई, डाळिंब ही यातली नेहमीची उदाहरणे होत.
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो

Sunday, February 26, 2017

वाचा आणि हसा

पुढारी (डाँक्टराना ) : माझ्या
तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला
समजेल अशा भाषेत सांगा.!

डाँक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार
रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे..

फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत..

ऊजवी कडील किडनीने आपल्या
पदाचा राजीनामा दिला आहे..

चरबी महागाई प्रमाणे वाढत
चालली आहे. त्यामुळे,

रक्तवाहिन्यां मध्ये रास्तारोको
आंदोलन चालू झालेले आहे..

मज्जासंस्था सुध्दा आपला पाठींबा
काढून घेण्याच्या मार्गावर आहेत..

या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील
पक्ष श्रेष्टिंवर पडत आहे. त्यामुळे,

ते आपले सरकार बरखास्त
करण्याच्या तयारीत आहेत

.

उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना

आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना
खुप छान आहेत जरूर वाचा

१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर)
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा.
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.
१८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा.
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.
२६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.
२७. घाम येईल इतका व्यायाम करा.
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.
२९. शक्य तेव्हढा सेक्सचा आनंद घ्या. (आठवड्यातून किमान दोनदा)
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.
३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.
३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत.
३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)
३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.
४०. नेहमी गर्म व ताजे जेवण घेत जा.
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाळरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापारा.
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.
४९. आहारात नाचणीचा समावेश करा.
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.
५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)
५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.
६२. तुमच्या आवडीचेच काम करा.
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.
६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.
६६. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे / भल्याचे कृत्य करा.
६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा.
६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा.
६९. मुक्तपणे जोरात हसा.
७०. धूम्रपान वर्ज्य करा.
७१. मद्यपान वर्ज्य करा.
७२. गुटखा / तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहा.
७३. पत्त्यांचा जुगार,मटका,रेस,वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा. एकपत्नीव्रत आचरा.
७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा.
७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला.
७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा.
७७. सकारात्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.
७९. दुपारी १०-१५ मिनीटांची डुलकी घ्या.
८०. लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा.
८१. दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा.
८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा.
८४. मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा.
८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा.
८६. आरामदायी पादत्राणे वापरा.
८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.
८८. मुक्तपणे व आनंदाने गा.
८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”)
९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला.
९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.
९२. बागकामात मन रमवा.
९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.
९४. नियमित पोहायला जा.
९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.
९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात गेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.
९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.
९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्यख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.
९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.
१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.
१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा.
१०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा.
१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.
१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.
१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .
१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.
१०७. नियमित रक्तदान करा.
१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.
१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.
११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.
१११. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका.
११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.
११३. भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा.
११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.
११५. बाजारान्त मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.
११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.
११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या.
११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.
११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका.
१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.
१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.
१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.
१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)
१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.
१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.
१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील असे करू नयेत.
१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)
१२८. आपल्याला ज्याची अॅकलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.
१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.
१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.
१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.
१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.
१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.
१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.
१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडडिक्ट होऊ नका)
१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.
१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.
१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.
१३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.
१४०. तुमच्याशारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...