तुम्ही कधी विचारही केला नसेल की आपण ज्या देशात रहातो त्याच देशातील काही ठिकाणी आपल्याला जाण्यास मनाई आहे. अहो खरंच, भारतात अश्या काही जागा आहेत जेथे भारतीयांना NO Entry आहे.
1.ब्रॉडलँड लॉज, चेन्नई
या लॉजची पॉलीसीच अशी आहे की येथे भारतीयांना पूर्णत: प्रवेश निषिद्ध आहे. ज्यांच्याकडे फॉरेन पासपोर्ट आहेत अश्या लोकांनाच या लॉजमध्ये प्रवेश दिला जातो.
2.फॉरेनर्स ओन्ली बीच, गोवा
गोव्यामध्ये असे अनेक बीच आहेत जेथे भारतीयांना प्रवेश नाकारला जातो. त्यांना फॉरेनर्स ओन्ली बीच म्हटले जाते. याचं कारण देताना या बीचचे मालक सांगतात की, “बिकिनी” घातलेल्या फॉरेन स्त्रियांकडे भारतीय पुरुष अश्लील नजरेने बघतात, ज्यामुळे परदेशी पर्यटकांना त्रास होतो.
3.फॉरेनर्स ओन्ली बीच, पोंडेचेरी
गोव्याप्रमाणेच पोंडेचेरीमध्ये फॉरेनर्स ओन्ली बीच भरपूर आहेत. येथे देखील गोव्याप्रमाणेच कारण सांगितलं जात आणि भारतीयांना प्रवेश नाकारण्यात येतो.
4.फ्रीकासोल कॅफे, कसोल
हा कॅफे हिमाचल प्रदेशामध्ये आहे. हा कॅफे तेव्हा जबरदस्त चर्चेत आला होता, जेव्हा कॅफेच्या मालकाने भारतीयांना कॅफेमध्ये येण्यास बंदी घातली. त्याला कारण विचारले असता त्याने देखील हेच करण सांगितले की भारतीय नागरिकांमुळे परदेशी पर्यटकांना त्रास होतो आणि तश्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत.
5.UNO-IN हॉटेल, बँगलोर
२०१२ साली हे हॉटेल खास करून जपानी पर्यटकांसाठी बांधण्यात आलं होतं. जेव्हा भारतीयांना या हॉटेल मध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता तेव्हा त्यावरून काही काळ वाद देखील उफाळला होता. पण अखेर प्रशासनाने या हॉटेलवरच कायमची बंदी आणली.
म्हणजे आपल्याच घरचे दरवाजे आपल्यासाठीच बंद!!!
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !
No comments:
Post a Comment