Friday, February 17, 2017

नक्की वाचावं, असं काही...

     आपल्या आई-वडिलांनी, शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला कित्येक वेळेला ‘चांगल्या’ सवयी यावर लेक्चर दिलं असेल, हो ना! पण, आपण जाऊ दे, काय फरक पडतो, मला कंटाळा आला असं म्हणून आपण वेळ मारून नेली असेल.
        आपल्या शाळेतही फळ्यावर रोज वेगळा ‘सुविचार’ लिहायला सांगायचे. एखाद्या चांगल्या अक्षर असलेल्या मुलीला ते काम दिलं जायचं. पण, हे सुविचारही शाळा सुटल्यावर शाळेतल्या फळ्यावर रहायचे! सुविचार लिहिणं हे फक्त ‘चांगलं अक्षर असलेल्या मुलींसाठीचं काम’ असं म्हणून आपण टिंगलटवाळीही केली असेल. पण शाळेतले हे सुविचार आपलं व्यक्तिमत्त्व घडवत असतात. असं मी नाही, पण मोठमोठ्या जगात खूप मूलभूत काम करून ठेवलेल्या लोकांनी म्हणून ठेवलं आहे.
      विल ड्युरांट, ज्यानं आपल्या मानवजातीचाच इतिहास लिहिण्याचं मूलभूत काम केलं, तो म्हणायचा की, आपण जे नियमितपणे करतो तेच ‘खरे’ आपण आहोत! म्हणजे मी रोज ठरवलं की बाहेरचं नाही खायचं, पण मी रोज खातेच आहे... आळशीपणा करतेच आहे, तर ती माझी सवय आहे म्हणजेच मी मूलत: तशीच आहे! आणि तशीच राहणार आहे... आणि ओळखली जाणार आहे.  
         त्यामुळे आपल्याला काही कमाल करायचं असेल ना मित्रांनो तर आपल्या सवयींकडे आत्तााच लक्ष द्या. कारण आत्ताच्या सवयी मग या सवयी कशा लावायच्या स्वत:ला यावर अनेकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे हा लेख. 
         यामध्ये चांगल्या सवयी स्वत:ला कशा लावून घ्यायच्या यावर दारियस फोरो नावाच्या एका विचारवंतानं लिहून ठेवलं आहे.
     मार्गारेट थॅचर म्हणून गेल्या की, आपल्या युगाचा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की, आपण माणसाच्या भावनांना त्यांच्या विचारांपेक्षा अधिक महत्त्व देतो. भावना या काळानुरूप बदलतात, पण आपले विचार आपल्याला घडवतात. म्हणूनच त्या म्हणायच्या की तुमच्या विचारांवर ताबा ठेवा कारण ते विचार तुमचे शब्द बनतात. तुमच्या शब्दांवर ताबा ठेवा कारण तुमचे शब्द तुमच्या कृती ठरवतात. तुमच्या कृतींवर ताबा ठेवा कारण, तुमच्या कृती, तुमची वागणूक, तुमची सवय बनून जाते. तुमच्या सवयींवर ताबा ठेवा कारण तुमच्या सवयी तुमचं व्यक्तिमत्त्व बनून जातं.
    त्यामुळे स्वत:चं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी हा लेख नक्की वाचा!
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...