सर्वास असावी चिंता समाजी ।कोण आहे लायक जनामाजी।
कोण घेई गावाची काळजी। सर्व काळ।।
तोचि करावा पुढारी। एरव्ही पडो नये कुणाच्याही आहारी।
धन वेचतो म्हणोनि गावाधिकारी।करू नये कोणासि।।
पुढारीपण सेवेनेच मिळे। हेच बोलावे मिळून सगळे।
तेथे पक्षबाजीचे चाळे। वाढोची न द्यावे।।
नाती, गोती, पक्ष-पंथ। जात-पात,गरीब-श्रीमंत।
देवघेव, भिडमुर्वत। यासाठी मत देऊचि नये।।
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे। आपल्या मतावरीच साचे।
एकेक मत लाख मोलाचे। ओळखावे याचे महिमान।।
मत हे दुधारी तलवार। उपयोग न केला बरोबर।
तरी अपलाचि उलटतो वार। आपणावर शेवटी।।
No comments:
Post a Comment