Friday, February 17, 2017

एक खडूस म्हातारा …………………….(विनोद )


एकदा एक खडूस म्हातारा एका गार्डनमध्ये बसला होता.
तिथे एक युवक आला आणि म्हणाला ” किती वाजले ? ”
तर म्हातारा म्हणाला…….
” आज तुम्ही टाईम विचारला
उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल ”
युवक : ” कदाचित हो ”
म्हातारा : ” आपली ओळख होईल, मग आपण रोज भेटू ”
युवक : ” कदाचित हो ”
म्हातारा : ” मग तुम्ही माझ्या घरी याल, घरी माझी तरुण मुलगी आहे, तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. ”
युवक : लाजून ” कदाचित हो ”
म्हातारा : ” तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल, मग तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकणार नाही ”
युवक : हसून ” हो ”
म्हातारा : ” मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्नासाठी तिला मागणी घालाल ……….
तेव्हा ………
…..………
................
............
मी तुम्हाला सांगेन
हरामखोर
नालायक माणसा
ज्याच्याकडे स्वतःसाठी घड्याळ घ्यायची ऐपत नाही,
अशा मुलाबरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही.”

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...