भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले महात्मा गांधीजी आपण सर्व जाणतो.
२ ऑक्टोबर १८६९ रोजी जन्मलेल्या “मोहनदास करमचंद गांधी”जींची, वयाच्या ७९ व्या वर्षी – ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली.
भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसेचं तत्वज्ञान आपल्या वागणुकीतून शिकवणाऱ्या ह्या राष्ट्रीय संताबद्दल अश्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या – ज्या तुम्हाला माहित नसतील.
१) ५ वेळा Nobel नामांकनं !
गांधीजींना Nobel Peace Prize – जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या कार्यासाठी देण्यात येणाऱ्या नोबेल परितोषिकासाठी एक-दोनदा नव्हे तर ५ वेळा नामांकन मिळालं होतं . परंतु गांधींच्या मृत्यूआधी त्यांना हे पारितोषिक देण्यात आलं नाही. Nobel पारितोषिक मृत्युपश्चात देण्यात येत नाही – त्यामुळे गांधीजींना Nobel कधीच देण्यात येणार नाही ह्याबद्दल खुद्द Nobel committee ने दिलगिरी व्यक्त केली आहे.
१९८९ मध्ये जेव्हा दलाई लामांना नोबेलचा शांतता पुरस्कार देण्यात आला तेव्हा “हे एक प्रकारे गांधीजींना अभिवादन आहे” असं कमिटीचे चेअरमन म्हणाले.
२) गांधीजींचा हिटलरशी पत्रव्यवहार
गांधीजींनी अनेकांशी पत्रव्यवहार केला होता. ज्यात Tolstoy, Einstein आणि Hitler सुद्धा होते.
३) संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा — दोनदा !
गांधीजी त्यांच्या जीवनातील ४० वर्ष, दररोज साधारण १८ किलोमीटर चालालले. त्यांनी १९१३ ते १९३८ एवढ्या कालावधीत ७९००० किमी अंतर पायी कापलं.
हे अंतर पृथ्वीला २ दा प्रदक्षिणा मारल्याइतकं होईल.
४) TIME Person Of The Year – असणारे एकमेव भारतीय
गांधीजी १९३० मध्ये प्रतिष्ठित TIME magazine च्या मुखपृष्ठावर TIME Person Of The Year म्हणून झळकले होते.
इतर कुठलाही भारतीय TIME Person Of The Year ह्या मानाने सन्मानित झाला नाहीये.
६)Apple चा निर्माता असलेले Steve Jobs गांधीजींचे खूप मोठे जाहते होते.
गांधींची आठवण आणि त्यांना अभिवादन म्हणूनच ते गांधीजींसारखाच चष्मा वापरायचे.
७) M G Road
भारतात गांधीजींच्या नावाने छोटे-छोटे अगणित रस्ते आहेत. पण “महात्मा गांधी रोड” नावाने तब्बल
५३ मोठे रस्ते भारतात आणि ४८ परदेशांत आहेत.
गांधीजींनी सांगितलेल्या मानवता, अंत्योदय, शांतता – ह्या रस्त्यांवर आम्ही चालतोय की नाही माहित नाही. पण गांधीजींचं नाव आम्ही भरपूर रस्त्यांना दिलं आहे !
—
महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन !
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !
No comments:
Post a Comment