Thursday, February 9, 2017

बोधकथा

     मित्रानो 2 मिनिट वेळ काढून नक्की वाचा खूप सुंदर आहे

एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.
      एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला.  खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.
         त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिका-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.
            हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"
        भिकारी म्हणतो, "माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."
      तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
          त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या   येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते.
तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते.
     तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, "साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो."
       तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो.
"वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."
      भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
*आयुष्य कुणी जास्त जाणलं?*
या ओळी लिहीणा-या *लेखकानं?
*त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या *लोकांनी?*
कि इतक्या वर्षांनी रडणा-या *त्या भिका-यानं?*
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...