Wednesday, February 8, 2017

तुमचे डोळे चांगले असतील

तुमचे डोळे चांगले असती*
तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...

पण जर तुमची वाणी गोड असेल
तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...

माणसाला बोलायला शिकण्यास
(किमान) २ वर्ष लागतात...

*पण "काय बोलावे?"*
हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...

*ओढ म्हणजे काय?*
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...

*प्रेम म्हणजे काय?*
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...

*विरह म्हणजे काय?*
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...

*जिंकण म्हणजे काय?*
हे हरल्याशिवाय कळत नाही...

*दुःख म्हणजे काय?*
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...

*सुख म्हणजे काय?*
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

*समाधान म्हणजे काय?*
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

*मैत्री म्हणजे काय?*
हे ती केल्याशिवाय कळत नाही...

*आपली माणस कोण?*
हे संकटांशिवाय कळत नाही...

*सत्य म्हणजे काय?*
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...

*उत्तर म्हणजे काय?*
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...

*जबाबदारी म्हणजे काय?*
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...

*काळ म्हणजे काय?*
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.

मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात.
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण माझा विश्वास आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु, मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल...
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...