Sunday, February 19, 2017

यशस्वी व्हायचे आहे का ????

         जेव्हा आपण यशस्वी होण्याची वेगवेगळी कारणे बघतो तेव्हा आपण बुद्धिमत्तेला, IQ ला सगळ्यात जास्त महत्व देतो, परंतु Stanford University ने केलेल्या study मुळे तुमचे मत नक्कीच बदलेल (आणि वृत्तीपण!)
           Psychologist, Carol Dweck यांनी त्यांचं आयुष्य ह्याच विषयाचा अभ्यास करण्यात व्यतीत केलंय. त्यांच्या अभ्यासानुसार नुसार तुमच्या IQ पेक्षा तुमचा attitude study करून तुम्ही किती successful होऊ शकाल – ह्याचं prediction जास्त अचूक करता येतं.
       Dweck म्हणतात की लोकांची core वृत्ती २ प्रकारात मोडते – fixed mindset आणि growth mindset ( सारासार विचारसरणी आणि यशस्वी होण्याची विचारसरणी ).
1.Fixed mindset –
          म्हणजेच सारासार विचारसरणीने तुम्हाला माहीत असतं कि तुम्ही कोण आहात आणि किती यशस्वी होऊ शकता. पण हा विचार एका level पर्यंतच कामाला येतो. तुम्ही जेव्हा challenges ला सामोरे जाता तेव्हा तुमची वृत्ती त्याला स्वीकारायला तयार होत नाही आणि तुम्ही पुढे जायला नकार दर्शवता.
2.Growth mindset -
      लोकं ह्या विश्वासाने काम करतात की परिश्रम करून ते कोणत्याही संकटांवर मात करू शकतात. ह्या mindset च्या लोकांचा IQ एकवेळ कमी जरी असला तरी ते इतरांवर सहज मात करून पुढे जाऊ शकतात. कारण त्यांची challenges काढे बघायची वृत्ती खूप वेगळी असून ते त्यांना challenges न मानता त्यांना नवीन शिकण्याची संधी मानतात.
Carol Dweck च्या मते पुढील गोष्टी तुम्हाला तुमची वृत्ती सुधारण्यस मदत करू शकतील :
१. स्वतःला कधीच असहाय्य समजू नका
२. कोणतेही कार्य हे आवडीने आणि जोमाने करा, अन्यथा ते काम हातीच घेऊ नका
३. वेळोवेळी योग्य दिशा लक्षात घेऊन काम करा – ती दिशा “कठीण” असली तरी चालेल, पण ती “योग्य” असणं महत्वाचं आहे.
४. नेहमी स्वतःला एक पाऊल पुढे ढकलण्यासाठी प्रवृत्त करा – Go that extra mile!
५. तुम्ही जे काही काम करत आहात त्यातून definite, स्पष्ट परिणामाची अपेक्षा करा (Expect Results)
६. परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिका (Be Flexible) – प्राप्त परिस्थिती मान्य केली की त्यानुत रस्ता काढणं सोपं होतं.
७. जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा इतरांना किंव्हा परिस्थितीला दोष देण्यापेक्षा – “मी काय केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं” ह्याचा विचार करा.
८. आपल्या कामाचा review वेळोवेळी ठेऊन आपली वाटचाल आपल्या ध्येयाच्या दिशेने होत आहे किंवा नाही ह्याचा नेहमीच पडताळा घ्या
Best of luck
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...