*प्रशांतराव ! तुम्ही बापाच्या गैरहजेरीतच जन्माला आलात का ?*
भाजपाचे आमदार प्रशांत परिचारकांनी अतिशय संतापजनक वक्तव्य केले आहे.त्यांनी भारतीय लष्कर आणि स्त्रियांची मानहानी केली आहे.त्यांनी आपल्या विकृत पिचकार्या टाकताना म्हंटले आहे की , " जवान सीमेवर जातात अन मागे त्यांच्या बायका बाळंत होतात.ते वर्षभर गावाकडे येत नाहीत मात्र तिकडे मुलगा झाला म्हणूण पेढे वाटतात. "असला अतिशय विकृत विनोद करून परिचारकांनी आपली लायकी दाखवून दिली आहे.हा लष्कराच्या राष्ट्रभक्तीचा अवमान आहेच पण स्त्रियांचा ,स्त्रित्वाचा अवमान आहे.परिचारकास या चुकीसाठी जोड्याने मारले तरी कमीच आहे.पंढरपूरच्या वाळवंटात ही विकृती जन्मालाच कशी आली ? याचा अभ्यास करावा लागेल.ज्या भूमीत संतांची पायधूळ लागली अशा पवित्र मातीत ही विकृत मानसिकता कशी निर्माण झाली आहे ? ज्या पंढरपूरच्या भूमीत जनाई ,मुक्ताई , कान्होपात्रा सारख्या संत निर्माण झाल्या .आभाळाच्या उंचीला पोहोचल्या .त्यांनी स्त्रीत्वाच्या मर्यादा पार करून मानवी जीवनाला एक वेगळा आयाम दिला.एक वेगळी ओळख दिली.त्याच पंढरपूरात ही घाण कशी निर्माण झाली ? परिचारकांच्या मस्तकात गोपाळ बडवेचे मलमुत्र साचलेले दिसते आहे. परिचारकांनी तमाम स्त्रीवर्गाचा अवमान केला आहे.आपले घरदार ,कुटुंब सोडून देशाच्या सेवेत असणार्या जवानांची कुचेष्टा केली आहे.हा देशभक्तीचा ,बलिदानाचा व स्त्रिवर्गाचा अवमान आहे.मराठीत एक म्हण आहे , "ज्यांच्या जीवावर उड्या त्यांच्याच कानात काड्या " हा प्रकार त्यातलाच आहे.जवानांची अशाप्रकारची थट्टा आजवर कोणीच केली नाही. ही परिचारकांची संस्कृती आहे की काय ? त्यांच्यात हे चालतं का ? त्याशिवाय त्यांच्या डोक्यात हे आलेच कसे ?परिचारकांचे बापही कामानिमित्त ,राजकीय बैठकीनिमित्त बाहेर जात असतील ना ! मग बाकीच्यांनी असेच म्हणायचे का ? पण असे कोण म्हणणार नाही .कारण ही संस्कृती परिचारकांचीच असावी. इतरांची नाही.आमिर खानचा निषेध करायला सरसावलेली संघप्रणीत पिलावळ याचा निषेध करणार का ? परिचारकास काय म्हणणार ? देशद्रोही की गद्दार ? सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यापेक्षा हे किती भयानक आहे.तमाम जवानांच्या माय बहीणींच्या चारित्र्यावर चिखलफेक करणारी ही प्रवृत्ती आहे. खेदाची बाब म्हणजे परिचारक हे बोलत असताना समोर बसलेली माकडं फिदी फिदी हसत होती.हा परिचारक जेवढा नालायक त्याच्यापेक्षा हसणारे महानालायक आहेत. ते लायकीचे असते तर एखाद्याने उठून परिचारकाचे मुस्काट फोडले असते. आज जर आचार्य अत्रे असते तर संतापाने म्हणाले असते की, प्रशांतराव तुम्ही बापाच्या गैरहजेरीत जन्माला आलात काय ? असा रोकडा सवाल अत्र्यांनी नक्कीच केला असता.आज त्यांनी लागलीच माफी मागितली आहे.पण माफी मागून केलेल्या नालायकीला दुर्लक्षित करता येत नाही. अशी माहिती मिळाली आहे की प्रशात परिचारकांचे पुर्वज रावबहाद्दूर परिचारकांनी इग्रजांना मदत करून क्रांतीकारकांना पकडून दिले.त्यांच्या या नमकहरामीनंतरच त्यांना रावबहाद्दूर हा किताब मिळाला.हे जर खरे असेल तर हा प्रशातरावांचा दोष नाही.ती डीएनए मधून मिळालेली देणगी असणार.त्याशिवाय हे घडणार नाही.परिचारकांनी आमदारकीचा राजिनामा द्यायला हवा.असला हलकट माणूस विधानसभेत असणे हा विधानसभेचा अवमान आहे.त्यामुळे निव्वळ माफी मागून चालणार नाही.नेहमी देशभक्तीच्या उन्मादात असणारी भाजपेयी पिलावळ आता का शांत आहे ? देशभक्तीचे अर्थ सोईनुसार लावतात का ? तथाकथित देशभक्तांची पिलावळ परिचारकांच्या हरामखोरीवर काय बोलणार की नाहीच ? पाकडे ज्यावेळी सैनिकांची विटंबना करतात त्यापेक्षा हे भयानक आहे.पाकडे बोलून चालून शत्रूच आहेत.पण हे काय ? हे ऐकल्यावर सीमेवर लढणार्या सैनिकांच्या मनास काय वेदना होतील ? याचा विचार न केलेला बरा.घरादाराचा ,बायका-पोरांचा ,व्यक्तीगत सुखांचा त्याग करून सीमेचे रक्षण करणार्या जवानांची ही कुचेष्टा मनाला वेदना देणारी आहे.संताप आणणारी आहे.देशभक्तीच्या व नितिमत्तेच्या गप्पा मारणार्या भाजपाच्या बुडाखाली कसले नग दडले आहेत ? एका महिलेचा विनयभंग करणारा गणेश पांडे ,आता हा परिचारक.मस्तावलेली ही पिलावळ पोटात घेवून इतरांना देशभक्तीचे ,नितीमत्तेचे धडे देणार्या भाजपाने आपले बूड स्वच्छ करायला हवे.देवेंद्रपंत या पंताचं काय करणार ? त्यांच्यावर गोमुत्र शिंपडून पवित्र करून घेणार की गणेश पांडे सारखा मोकळे सोडणार ?
दत्तकुमार खंडागळे
संपादक वज्रधारी
९५६१५५१००६
Friday, February 24, 2017
साप्ताहिक वज्रधारीमध्ये प्रकाशित झालेला लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment