Friday, December 15, 2017

बहिष्कृत बाबासाहेब-----अजूनही

*बहिष्कृत बाबासाहेब-----अजूनही*
✍गौरव लता मोहन✍

आज 6 डिसेंम्बर,
बाबाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस, काहींसाठी दुःखद तर काहींसाठी अत्यानंदाचा.काही महारथी तर बाबासाहेब गेल्याच्या शोकापेक्षा आज बाबरी मशीद पाडल्याचा आंनद आपल्या dp तुन व्यक्त करत आहेत.
कारण आपल्या देशात दुसऱ्याच्या मृत्यूचे सोहळे साजरे करण्याची काही हिडीस लोकांची परम्परा आजही कायम आहे.
जसं गांधींना गोळ्या घातल्यानंतर ही नथुरामी पिलावळ फटाके फोडून आंनद साजरा करते किंवा  त्यांचा 'वध' केला अशी मखलाशी मारत हिंडताना दिसते किंवा आता नथुरामचे पुतळे उभारताना दिसते.
असाच प्रकार बाबासाहेबांबद्दल सुद्धा बघायला मिळतो,
यांच्याकडून त्यांची हत्या तर करवल्या गेली नाही, पण आता ते त्यांच्या विचारांना सुरुंग लावण्याची जबाबदारी नेटाने पार पाडत असतात.
अहो ते सोडा, पण त्यांच्या लेखी शुद्र ठरवल्या गेलेल्या ब्राम्हणेतर जमातींना बाबासाहेबांची इतकी ऍलर्जी आहे की, बाबासाहेबच त्यांना बहिष्कृत वाटू लागतात.
बाबासाहेब कोण्या एका धर्माचे किंवा जातीचे नसून ते एका मानवतावादी चळवळीचे प्रतिनिधित्व करत होते, हे आधी समजून घ्यायला हवे.
यांच्या डोक्यातून हे भूत काढणं  मोठं कठीण जातंय म्हणून हा लेखनप्रपंच.

*मला आलेले काही अनुभव सांगतो, जे की माझ्यासारख्याच सर्वसाधारण obc बांधवांना येत असतात*

1) तू महार, मांग चांभारांच्या लेकरांसोबत दिसतो, जेवतो, राहतो.(पहिल्यांदा मी कुणाच्याच जातीवर संशोधन करून मैत्री करत नाही हे स्पष्ट आहे आणि माझी मैत्री सर्व जाती धर्मातील लोकांशी आहे, फक्त दोष यांच्या जातीवादी चष्म्याचा आहे)

2) तुला काही तुझ्या जातीचा अभिमान वगैरे नाही वाटते !
(म्हणजे जातीसंग शेण खाण्याची प्रवृत्ती हे मला शिकवू पाहत असतात)

3) घरात बाबासाहेबांचा फोटो,
गौतम बुद्धाची प्रतिमा वगैरे ठेवतो,(म्हणजे तथाकथित 33 कोटी देव कमी पडले की काय ? असं बजावतात)

4) आपला धर्म सोडून जातोस वाटते ?(वास्तवात मी हे सर्व धर्म माझ्या डोक्यातून केव्हाचेच काढून टाकलेत आणि मला कोणताच तथाकथित धर्म स्विकारण्याची आवश्यकताही वाटत नाही व स्वतःला या जातीधर्माच्या पलीकडे गेलेला मानतो)

5) एखाद्या पुरोगामी विचाराचे किंवा निरीश्वरवादी विचाराचे समर्थन करतांना यांना आढळलो की, लगेच अनोळखी लोक विचारतात, 
(आपण आंबेडकरवाले आहात काय ?)

6) सोशल मीडियावर आंबेडकर किंवा बुद्धाचा dp जरी ठेवला, तर नातेवाईक म्हणतात,
(आता तर तुला आमची पोरगीच देत नाही, जा पहा त्यांचीच एखादी)

7) निळ्या रंगाची पसंती दाखवली, तर हे म्हणतात, तू बुद्धं शरणम वालाच ना ?
(मला तर निसर्गातील सर्वच रंग आवडतात)

8) आपल्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी ?(हा प्रश्न विचारणारा वरीलपैकी सर्वात मूर्ख ठरतो, एखादा 2 चांगली पुस्तके वाचलेला माणूस असं म्हणूच शकत नाही)

9) केवढा तोरा त्यांना बौद्ध असण्याचा ?
(खरा बौद्ध या कट्टरतेत पडत नाही, पण तुम्हीही मिरवताच की जागोजागी आपली पाटीलकी !)

10) आरक्षणामुळे माजलेत साले !
(म्हणजे सर्व सत्ता, संपत्तीचा, नोकऱ्यांचा, जमिनींचा उपभोग काय यांनीच घ्यावा !)

एवढा तिरस्कार !
आणि तोही आपल्यासारख्याच त्याच हाडा-मांस-रक्तापासून बनलेला आहे हे माहित असून सुद्धा! हे तूम्ही केव्हा स्विकाराल ?
*हि घाण डोक्यातून काढून फक्त आपण मानव आहोत या एकाच विचाराने जागृत व्हा म्हणजे जातीचा व्यर्थ अभिमान गळून पडेल*
(सर्वच लोक अशा संकुचित विचाराचे आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही, पण जे आहेत त्यांच्यासाठी)
अरे जातीवादी भडव्यांनो !
(ही शिवी फक्त कुणबी,महार व ब्राम्हणेतरांसाठीच नाही तर जातीच्या गाजरावर ब्राम्हणांनासुद्धा जातीचं शेण खावयास लावणाऱ्यांसाठीही आहे) 
हे सनातनी, कर्मठ, कर्मकांडी ब्राम्हण्यवादी तुम्हा-आम्हाला आणि सर्व जमातींना एकाच पारड्यात मोजतात रे !
*मशिदी पाडायच्या वेळी तुम्ही हिंदू असता, आणि मंदिरात प्रवेश करतेवेळी किंवा यांच्या देवाचा नैवेद्य केल्याने देव बाटतो म्हणून शुद्र ठरता ?* याची  अक्कल केव्हा येईल ?
आता तरी फेकून द्या ह्या जातीवादी अभिमानाच्या कुबड्या आणि बना एक निसर्गाने निर्मिलेला "माणूस".

पण एका कोपऱ्यात मात्र थोडं चित्र पालटल्यासारखं वाटतं, जे लोक एकेकाळी बाबासाहेबांच्या नावानं बोटे मोडीत असत त्यांनाच आता बाबासाहेबांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही, ते सुद्धा आपल्या dp वर बाबासाहेबांचा फोटो ठेवायला लागलेत.(मान्य आहे की, नुसता फोटो ठेवल्याने तो विचार आत्मसात होत नसतो, पण ती एक बदलाची सुरुवात आहे) 
तेवढी एक सकारात्मकता दिसून येते.
*अरे तो बाबासाहेब होता म्हणून आज मी हे लिहू शकलो, आणि तुम्ही वाचू शकला*
*एक सलाम त्या बापाला ज्याने लिहिलेल्या संविधानावर आजचा भारत टिकून आहे, नाहीतर केव्हाच लयाला गेला असता*
----------------------------------------
✍गौरव लता मोहन ✍
 (शोध अविरत सत्याचा)
     9665671263
============================
From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com   
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
Thanks!!!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...