गुजरात निवडणुकीत अनेक फॅक्टर्स निर्णायक ठरले. जाणून घेऊयात असेच काही मुद्दे….
1. गुजरातमधील ५० टक्क्यांहून अधिक मतदार ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत
2. यंदाच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रितरित्या ६४ सार्वजनिक सभा घेतल्या
3. भाजपने ३४ तर काँग्रेसने ३० सार्वजनिक सभा घेतल्या
4. एकूण महिला मतदारांची संख्या ४८ टक्के तरी आत्तापर्यंत गुजरातमध्ये केवळ एकदाच महिलेने मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
5. १८२ पैकी केवळ ११ जागी भाजपने तर १० जागी काँग्रेसने महिलांना उमेदवारी दिली होती.
6. पहिल्यांदाच पूर्णपणे महिलांनी एखाद्या मतदार केंद्रावर सर्व जबाबदारी पार पाडली
7. यंदा ६८.७० टक्के मतदान झाले. २०१२ साली हाच आकडा ७१.३२ इतका होता. म्हणजे यंदा मतदानाची टक्केवारी २.९१ टक्क्यांनी घसरली
8. मोदींचा सी प्लेन दौरा आणि राहुल गांधींनी १२ हिंदू मंदिरांना दिलेली भेट यंदाच्या निवडणुकींच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरले.
9. पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडीट ट्रायल (व्हीव्हीपीएटी) मशिन्सचा वापर करण्यात आला. यामुळे मतदारांना आपले मत पडले की नाही हे तपासून पाहता येते.
10. भाजपने पट्टीदार समाजातील ५० ओबीसी समजातील ५८ तर १३ दलित समाजातील उमेदवारांना यंदा तिकीट दिले होते
11. काँग्रेसने पाटीदार समाजातील ४१, ओबीसी समजातील ६२ आणि दलित समजातील १४ उमेदवारांना तिकीट दिले होते
12. १९८५ साली काँग्रेसला एकूण मतदानापैकी सर्वाधिक मते मिळाली होती. १९८५ साली एकूण ५५.५५ टक्के मते काँग्रेसच्या पारड्यात पडली होती
No comments:
Post a Comment