नेताजी सुभाषचंद्र बोस जपानच्या सोबतीने ब्रिटिशांशी लढत होते. ६ तारखेला हिरोशिमा व त्यानंतर तिसऱ्या दिवशी नागासाकीवर झालेल्या अणुबाँम्ब हल्यानंतर पूर्णपणे कोसळलेले जपान केव्हाही शरण जाईल असे वातावरण होतेवातावरण.त्याच वातावरणात नेताजी १३ आँगस्टला सिंगापूरला पोहचले. १५ आँगस्टला जपानने शरणागती पत्करली.
आता पुढे काय करायचे हा सवाल नेताजींच्या समोर उभा होता. समोर दोन मार्ग दिसत होते. एकतर ब्रिटिशपुढे शरणागती पत्करणे किंवा निसटने.नेताजींनी यावर विचार करण्यासाठी बैठक बोलावली .एस ए अय्यर डॉ एम के लक्ष्मय्यालक्ष्म, ए.एन.सरकार, एम.झेड.कियानी ,मे.जन.अलगप्पन,कर्नल.जी.आर.नागर आणि हबिबुर रहमान हे या बैठकीला हजर होते.तोवर जपानच्या शरणागतीचा निर्णय झाला होता.प्रश्न होता जपानबरोबर आझाद हिंद सेनेने शरण जायचे कि स्वतंत्रपणे लढायचे ? बैठकीत ठरले स्वतंत्रपणे लढायचे! पण त्याला जपानची मंजुरी आवश्यक होती.
जपानचे सिंगापूरमधील कमांडर तशी परवानगी देऊ शकत नव्हते म्हणून सर्वांनीदळून ठरवले कि नेताजींनी स्वतःच टोक्योला जायचे.त्यासाठी आधी बँकाकला जावे लागणार होते,कर। तेथे आझाद हिंद सेनेचे मुख्यालय होते.नेताजी १६ आँगस्टला बँकाकला पोहचले.त्यांच्यासोबत अय्यर ,रहमान,आणि लेफ्ट.कर्नल प्रितमसिंग होते.तेथे त्यांनी आझाद हिंद सरकारमधील जपानमधील मंत्री हचिया टेरुको,तसेच लेफ्ट.जन.सुबरो इसोदा आणि कर्नल कागावा यांच्याशी चर्चा केली.हचिया यांनी सुचवले की,त्यांनी सायगावला जावे व फिल्ड मार्शल कांउन्ट तेराऊची यांना भेटावे.नेताजींची काहीच हरकत नव्हती.हचिया आणि इसोदा हेही त्यांच्यासोबत येणार होते.
१७ आँगस्टला ते सायगावला पोहचले पण तेराऊची हेही नेताजींना काही निर्णय देऊ शकले नाहीत.टोक्योहून त्यांना त्याबाबत आदेश आला नव्हता.आता टोक्यो ला जावेच लागणार होते.पण तिकडे जायचे कसे? नेताजी आणि त्यांच्या सहकार्यांना विमान उपलब्ध करून द्यायचे कसे? कारण दोस्तराष्ट्रांनी जपानच्या विमानांना उड्डाणबंदी घातली होती.मात्र सायगावहून एका लष्करी विमानाला परवानगी मिळाली होती.पण त्यात एकाच जागा शिल्लक होती.नेताजींना एकटे सोडण्यास त्यांचे सहकारी तयार नव्हते.अखेर आपले एडीसी कर्नल हबिबुर रहमान याना सोबत घेण्याचे नेताजींनी ठरवले.आणखी एका जागेची व्यवस्था करण्यात आली.
ते होते मित्सुबिशी की-२१बाँम्बफेकी विमान.त्यात आणखी ११ ते १२ प्रवासी होते.रात्री सारचूं सुमारास ते विमान तौरेनला उतरले.रात्रीचा मुक्काम तेथेच होता. विमान सायगावहून निघाला तेव्हा त्यात आधीच वजन जास्त होते.त्यामुळे नेताजींना काही बॅगा मागे ठेवाव्या लागल्या होत्या.तरीही विमानाला संपूर्ण धावपट्टीचा वापर करावा लागला होता.त्यामुळे तौरेनला उतरल्यानंतर या विमानातील १२ विमानविरोधी मशीनगन काढून टाकण्यात आल्या.विमानाचे वजन ६०० किलोने कमी झाले
१८ आँगस्ट १९४५.यादिवशी त्या विमानाने तौरेनहून उड्डाण केले.दुपारी दोनच्या सुमारास ते फार्मोसातील तैहोकू विमानतळावर उतरले.सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने म्हणजेच २:३०ला त्या विमानात सर्वजण बसले.विमान धवपट्टीवरून धावू लागले.हलकेच त्याचा पुढचा भाग उचलला गेला.ते हवेत झेपावले.३० -४०मीटर उंचीवर असतानाच अचानक मोठा आवाज झाला.विमान डावीकडे कलले. कॅ.नाकापुरा यांच्या डोळ्यासमोर हे घडत होत.विमानाच्या डाव्या बाजूला काहीतरी खाली पडत असल्याचं त्यांना दिसलं.तो प्रोपेलर होता.पाहता पाहता विमान हवेत हेलकावे खाऊ लागलं.आणि ध्वधावपट्टीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर ते कोसळले.विमानाचा वेग असावा ताशी ३००किमी प्रतितास.कोसळताच विमानाने पेट घेतला.
नेताजींच्या डोक्याला मार लागला होता. ते कसेबसे उभे राहिले.विमानाचा पुढचा भाग चेमटला होता.आगीने वेढला होता.ते मागच्या बाजूने बाहेर येण्यास निघाले.पण ते अशक्य होते.मागचा दरवाजा आतल्या पेट्या आणि अन्य समानांने अडला होता.कर्नाल रहमान नेताजींना म्हणाले,आगे से निकलीये नेताजी.मागे रस्ता नाहीये.
पुढचा दरवाजाही आगीने वेढलेला होता.नेताजी सरळ त्या आगीतून धावत गेले.कर्न रहमानही त्यांच्यामागे बाहेर पडले. बाहेर पडताच कर्नल रहमान यांनी पाहिलं तर पुढे १० यार्डावर नेताजी उभे होते.त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला होता.अपघातात फुटलेल्या टाकीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर सांडले होते.त्या पेट्रोलमुळे त्यांचे कपडे पेटले होते.रहमान त्यांच्याकडे धावले.त्यांनी त्यांचा शर्ट काढण्याचा प्रयन्त केला.त्यावर बेल्ट होता.त्यामुळे शर्ट काढणे अवघड झाले होते.त्यांच्या पँटीने मात्र पेट घेतला नव्हता.
रहमान यांनी नेताजींना जमिनीवर झोपवले.त्यांचे अंग भाजले होते.डोक्यावर बहुधा डाव्या बाजूला मोठी जखम झाली होती.चेहरा आगीने पोळला होता.केस जळले होते.अंगावरची भाजलेली कातडी लोंबत होती.नेटगीन प्रचंड वेदना होत होत्या.अपघातात मर बसल्याने,थकव्याने रहमानहीकोसळले नेताजींच्या बाजूला कोसळले. त्या अवस्थेतही नेताजींनी त्यांना विचारले,आपको ज्यादा तो नही लगी.
रहमान म्हणाले,मी ठीक आहे अस वाटतंय.
त्यावर नेताजी म्हणाले,मी वाचत नाही अस दिसतय.
काही क्षणांनी ते म्हणाले, आप जब अपने मुल्क वापस जाये तो मुल्की भाईयोंको बताना,कि मै आखरी दम तक मुल्क कि आझादी के लिये लढता रहा हूं. वह जंग-ऐ-आझादी को जारी रखे. हिंदुस्थान जरूर आझाद होगा.उसे कोई गुलाम नाही राख सकता.
थोड्याच वेळात नेताजींना जवळच्या नानमाँन लष्करी इस्पितळात नेण्यात आले.तेव्हा दुपारचे तीन वाजत आले होते.नेटजींवर तातडीने उपचार सुरु झाले.पण रात्री ९ वाजता त्यांचे देहावसान झाले.
Thursday, December 15, 2016
अपघात
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment