पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नटसम्राट आहेत. याची प्रचिती गेल्या अडीच वर्षात वारंवार आलेली आहे. प्रत्येक सभांमधील त्यांचा अभिनय हा नटसम्राटाच्याच तोडीचा आहे. एवढेच नव्हे तर १५
ऑगस्टसारख्या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करताना लालकिल्ल्यावरून त्यांचे जे हातवारे आहेत, ते।हातवारेही त्यांच्या अभिनयाचीच झलक आहे.
लालकिल्ल्यावरून पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिराजी गांधी, मोरारजी देसाई, चरणसिंग,।राजीव गांधी, व्ही.पी.सिंग, एल. के. गुजराल, मदन चंद्रशेखर, देवेगौडा, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सर्व माजी पंतप्रधानांनी अतिशय संयमित आणि अतिशय सुसंस्कृतरीत्या भाषण केले होते.
मात्र हातवारे करणारे पंतप्रधान जणू राजकीय पक्षाच्या निवडणूक सभेत भाषण करणारे राजकीय नेते आहेत. अशा थाटात त्यांची भाषणे दोन वर्षे जनतेने पाहिली. ते पंतप्रधान नटसम्राट आहेतच. प्रचारात ग्लोबेल्सच्या पुढे आहेत. राजकारणात गुस्पेट करून पुढे कसे निघून जायचे त्यात ते तरबेज आहेत.
पण त्यांच्यातील एक सुप्त गुण परवा त्यांच्या गुजरात दौ-यातील भाषणात समोर आला, तो म्हणजे ‘कांगावा’. मराठीत त्याला कांगावखोर म्हणतात.
मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर अपेक्षा अशी होती की, नोटाबंदीच्या मागचा त्यांचा उद्देश रिझर्व्ह बँकेने दिलेला मूळ प्रस्ताव, त्याचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम याबद्दल आगोदर देशाला आणि नंतर संसदेला पूर्ण विश्वासात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संबंधिचे आपले आर्थिक निवेदन संसद सुरू होईल त्यादिवशी करतील. तेव्हा नोटाबंदीच्या
निर्णयाबाबत अर्थमंत्री जेटली निवेदन करतील. नोटाबंदीच्या निर्णयाचे श्रेय घ्यायला मोदी पुढे आले, मात्र त्यानंतर देशात झालेल्या हाहाकाराबाबत ते ना शब्दाने बोलले, ना संसदेला विश्वासात घ्यायची त्यांची तयारी होती. उलट
गुजरातमध्ये भाषण करताना त्यांनी कांगावा केला की, ‘विरोधी पक्षांचे लोक लोकसभेत मला बोलूच देत नाहीत, म्हणून मी जनसभेत बोलतो आहे..’ शब्दाची कोटी करण्यात मोदी वस्ताद आहेत.
त्यामुळे लोकसभा आणि जनसभा अशी कोटी त्यांनी केली. पण हे निवेदन करत असताना ते शुद्ध कांगावखोर आहेत हेही यानिमित्ताने समोर आले आहे.
म्हणजे याला ‘चोराच्या उलटया..’ म्हणतात. तशी ही स्थिती आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून पहिले चार दिवस मोदी लोकसभेत उपस्थितही राहिले नाहीत. हा तर सभागृहाचा अपमानच होता. एका
आठवडयानंतर उपस्थित राहिले तेव्हा एका शब्दाने ते बोलले नाहीत. श्रवण करण्याची भूमिका त्यांनी घेतली. विरोधी पक्षाने वारंवार मागणी केली की,
देश हादरून सोडणारा हा निर्णय. पंतप्रधानांनी याबाबत निवेदन केल्यानंतर, लोकसभेत ते निवेदन का करत नाहीत.
अधिवेशन सुरू झाले त्या दिवशी पहिल्या तासाला सर्व कामकाज बाजूला टाकून अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर पंतप्रधानांचे निवेदन व्हायलाच हवे होते.
एवढेच नव्हे तर लोकसभेच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांना निवेदन करण्याचे आदेश द्यायला हवे होते. राष्ट्रपतींनी आदेश दिले नाहीत. किंवा पंतप्रधान निवेदन करत नाहीत, याबद्दल लोकसभेचा
अपमान होत आहे, संसदेचा अपमान होत आहे, असेही राष्ट्रपती बोलले नाहीत, ना अध्यक्ष बोलले..
गोंधळ झाला तो त्यातून झाला. आग्रह आहे.. पंतप्रधानांच्या निवेदनाचा. पंतप्रधान निवेदन करू इच्छित नाहीत. या मुद्दयावर मतदान घेण्याची वेळ आली तर पक्ष फुटेल, त्यांना अशी भीती वाटते आहे.
कारण भाजपामधील सर्व खासदारांना
नोटाबंदीचा निर्णय अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे मोदींच्या मनात भय आहे. संसदेला ते त्यामुळे टाळू इच्छितात. दाखवायला ते स्वत:ला खूप शूर आहेत, असे दाखवतात. पण असे शूरत्व दाखवणारी माणसं आतून भेदरलेली असतात आणि त्यामुळे कांगावखोर होतात.
मोदींची तीच अवस्था आहे. पण मी निवेदन करायला घाबरतोय, हे उघडपणे कसे बोलणार? म्हणून त्यांनी ‘मला बोलू देत नाहीत हो..’ असा हंबरडा फोडला आहे. यातील ढोंग लोकांना कळते आहे.
ज्या पक्षाच्या लोकसभेत अध्यक्ष बसलेला आहे. ज्या पक्षाजवळ २८३चे बहुमत आहे. त्या पक्षाचा लोकसभेतील नेता महत्त्वाच्या विषयावर निवेदन करायला उभा राहिला तर अगदी धरून चला,
विरोधकांनी गोंधळ घातला तरी त्यांचे माईक बंद करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. त्याही पलीकडे अगदी हलकल्लोळ झाला तरी पंतप्रधानांना आपले निवेदन पटलावर ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्याची अधिकृत नोंदणी इतिवृत्तात करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. हे
सगळे लोकशाहीतील वैध मार्ग उपलब्ध असताना ‘मला बोलू देत नाहीत हो..’ हे मोदींचे रडगाणे कीव वाटणारे आहे.
५६ इंचांची छाती असल्याचे ते सांगतात आणि त्या ५६ इंच छातीला लोकसभेत बहुमत असताना निवेदन करण्याची भीती वाटावी, निवेदन करण्यासाठी विरोधकांची भीती वाटावी, हे मोदींचे निवेदन नुसतेच शेळपट नाही तर हास्यास्पद आहे. आपली जबाबदारी टाळण्यासाठी मोदी विरोधकांवर आता न बोलू? देण्याचे खापर फोडत आहेत. विरोधकांची मागणी आहे की मोदींनी निवेदन करावे. गोंधळ त्याकरिता आहे. निवेदन करायला मोदी उभे राहिले की, एका मिनिटांत गोंधळ संपेल.
पण हीच तर खरी मेख आहे. निवेदन तर करायचे नाही आणि खापर तर फोडायचे. तेव्हा असला डबल गेम
मोदींचे हसे करत आहे. शेंबडया पोरांचा विश्वास नाही. मोदींना निवेदन करू देत नाहीत.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment