Thursday, December 22, 2016

सुंदर कविता : भाग ६

खरच सांगा गुरुजी

खरच सांगा गुरुजी.कोण कुठं चुकलं
शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं
काॅप्या पुरवुन शाळेचं
   काम तुम्ही खास केलं ,
      दहावीचं पोर माझं
       झटक्यात पास केलं !
       पोरासगट माझा
      सत्कार जाहिर झाला.
      सत्काराचा माझ्या गाजावाजा
      गावभर झाला !
माझ्यासह संस्थेचं, नाव त्यानं राखलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
       टक्केवारी वाढवुन
       पगार तुमची वाढली,
      पगाराची नशा
       दारुसारखी चढली !
       अाता पोरगं अाकरावीत
      भुगोल गणित पचेना .
       इंग्रजीतर सोडाच
       मराठीही वाचेना !
परिक्षेच्या भट्टीत ,कच्चं अांम्बं पिकलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
        अाकरावीतुन बारावीत
        तसच तुम्ही रेटलं,
        फॅशनचे कपडे घालुन
        नटावणी नटलं !
        बारावीच्या नखर्‍याला
        खुदकन हसलं,
       चार विषयात पोरगं
       गळ्याइतकं फसलं !
मायेनं पदराखाली,अाम्ही त्याला झाकलं
खरच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं
       शाळंसाठी पोराच्या
       नवं साल धरलं.
       विकु म्हणते अाई त्याची
       गळ्यातिल डोरलं !
       शाळा शिकुन पोरगं
      लय लय मोठं होईल,
      अाईच्या सपनाला
      सुखाचं फुल येईल !
सुखाचं सपान , डोळ्यातच सुकलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
       शाळंला पोरानं
       राम राम ठोकला,
       पुस्तकाचा डिगारा
       किलोवर विकला !
      अाता पोरगं हॅाटेलात
      काम करु लागलं,
      खंगलेल्या संसाराला
      धिर देवु लागलं !
अायुष्याच्या प्रवासात कोण काय शिकलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं
_______________________
आजच्या आठवी पर्यंन्त पुढच्या वर्गात ढकलणे व नंतर पुढे मुलांची कशी परवड होऊन नुकसान होत हे विशद करणारी सुंदर कवीता .

===============================================================

आयुष्य

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतेय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोप असतं…
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असतं…
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात…
तोंड देता आले तर
संकट ही शुल्लक असतं…
वाटायला गेलं तर
अश्रूंत ही समाधान असतं…
पचवायला गेलं तर
अपयश ही सोपं असतं…
हसायला गेल तर
रडणेही आपल असतं…
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…

आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं...

अश्रु नसते डोळ्या
मधे तर डोळे इतके
सुंदर असले नसते..!
दुःख नसते ह्रदयात तर
धडकत्या ह्रदयाला काही
किंमत उरली नसती..!
जर पुर्ण झाल्या असत्या
मनातील सर्व इच्छा तर
भगवंताची काहीच गरज
उरली नसती..!!

आयुष्य पण हे
एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची
काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या
हातात असते.

आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..

आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं पण..
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की..घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की..
स्वार्थाचं ही भानं नसावं,
आयुष्य असं
जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर..
______________________________________________________________________________

एक जमवले गेलेले नाते
नवरा बायको ..पती पत्नी
पूर्वी कधी एकमेकांना पाहिलेही नसते
आता जन्मभर  एकत्र रहाणार
आधी अनोळखी ..मग.
.हळूहळू होत जाणारी ओळख
हळूहळू होत जाणारे स्पर्श
मग येणारे...
रुसवे... फुगवे... हट्ट...
भांडण... अबोला...
हळूहळू घट्ट होत जाणारी वीण
मग... एकजीवता... तृप्तता
लग्न मुरायला थोडा वेळ लागतो
हळूहळू मूरत जाते
एकमेकांना निट ओळखले जाते
वृक्ष वाढत जातो
वेल बिलगते घट्ट
फुले येतात... फळे येतात
नाती घट्ट होतात
हळूहळू एकमेकांशिवाय करमत नाही
वय वाढत जाते
ओढ वाढत जाते
एकमेकांवर अवलंबून रहाणे
वाढत जाते
एकमेकांशिवाय चुकल्या चुकल्या सारखे होते
......नंतर मनात हळूहळू भीती वाटत रहाते
"ही गेली तर मी कसा जगू "
"हा गेला तर मी कशी जगू "
इतके एकमेकात गुंततात.... अन ....
स्वताचे स्वतंत्र अस्तित्व विसरून जातात ..
किती अजब नाते ..कोण कुठले ..
एक जमवले गेलेले नाते ...
नवरा-बायको
                  ..पती-पत्नी
________________________________________________________________________________

खासियत

यह नदियों का मुल्क है,
पानी भी भरपूर है।
बोतल में बिकता है,
पन्द्रह रू शुल्क है।
:
यह गरीबों का मुल्क है,
जनसंख्या भी भरपूर है।
परिवार नियोजन मानते नहीं,
नसबन्दी नि:शुल्क है।
:
यह अजीब मुल्क है,
निर्बलों पर हर शुल्क है।
अगर आप हों बाहुबली,
हर सुविधा नि:शुल्क है।
:
यह अपना ही मुल्क है,
कर कुछ सकते नहीं।
कह कुछ सकते नहीं,
बोलना नि:शुल्क है।
:
यह शादियों का मुल्क है,
दान दहेज भी खूब हैं।
शादी करने को पैसा नहीं,
कोर्ट मैरिज नि:शुल्क हैं।
:
यह पर्यटन का मुल्क है,
रेलें भी खूब हैं।
बिना टिकट पकड़े गए तो,
रोटी कपड़ा नि:शुल्क है।
:
यह अजीब मुल्क है,
हर जरूरत पर शुल्क है।
ढूंढ कर देते हैं लोग,
सलाह नि:शुल्क है।
:
यह आवाम का मुल्क है,
रहकर चुनने का हक है।
वोट देने जाते नहीं,
मतदान नि:शुल्क है।

यह शिक्षकों का मुल्क है,
पाठशालाएं भी खूब है,
शिक्षकों को वेतनमान देने के पैसे नहीं,
पढ़ना,खाना,पोशाक निःशुल्क है।

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...