Monday, December 19, 2016

चला हसूया , मस्त जगूया

पोपट आणि हल्ला
           घरात फर्निचर तयार करायला आलेल्या एका कारागिराला एक महिला सांगते, ""मी बाहेर जातेय तुम्ही आपले काम करत राहा, घरात मोती कुत्रा व पोपट आहे. हे दोघेही तुम्हाला त्रास देणार
नाहीत. कुत्रा चांगला आहे पण पोपट जे
काही बोलेल त्याकडे दुर्लक्ष करा तो खूप धोकादायक आहे.'' कारागीर काम करत राहतो. मोती कुत्रा खरेच त्रास देत नाही. पण पोपट मात्र त्या कारागिराला सतत शिव्या देत असतो. बराच वेळ झाल्यावर शिव्या असह्य झाल्याने कारागीर त्या पोपटाला म्हणतो ""अरे मूर्ख पोपटा, गप्प बस '' हे ऐकल्यावर पोपट म्हणतो "" मोती बघतोयस काय, कारागिरावर हल्ला कर ''
===================================================

फार अवघड काम
      एका कंपनीतील व्यवस्थापकासमोर दहा आळशी कर्मचारी उभे होते. त्यांच्यात
कामाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी
व्यवस्थापक म्हणाले "" आज तुम्हा सर्वांसाठी अतिशय सोपे काम देणार आहे. तुमच्यातील सर्वांत आळशी माणसाने हात वर करावा.'' नऊ लोकांनी हात वर केले. हात वर न केलेल्या
कर्मचाऱ्याला, तू हात वर का केला नाहीस असे विचारल्यावर तो म्हणाला "" हात वर करणे खूपच त्रासदायक आहे. ''
===================================================

ज्ञानप्राप्ती
स्वप्नीलने त्याच्या वडिलांना विचारले "" युद्ध कसे सुरू होते? '' वडील उत्तरले "" समज पाकिस्तान आणि जपान यांच्यात भांडण सुरू झाले''
त्याचवेळी तेथे आलेली स्वप्नीलची आई म्हणाली "" पाकिस्तान आणि जपान यांच्यात भांडण कसे होईल ? ''
वडील उत्तरले -" अगमी केवळ उदाहरणासाठी त्याला सांगतोय ? त्यानंतर दोघांच्यात यावरून जोरदार चर्चा सुरू झाली
आई- पण तुम्ही त्याला चुकीचे शिकवताय
बाबा- मी बरोबर आहे, मी केवळ
उदाहरण देतोय
आई- नाही तुम्ही चूक करताय
बाबा- तू मला भडकावू नकोस
आई- तुम्ही अडेलतट्टूपणा करताय
बाबा- तुझे शब्द आवर नाहीतर एक ठेवून देईन
हे सर्व ऐकून स्वप्नील म्हणाला तुम्ही दोघेही भांडू नका, युद्ध कसे सुरु होते ते मला समजले.
====================================================

मालिका आणि क्रिकेट
        दूरचित्रवाणीवरील मालिका भान हरपून बघत असलेल्या पत्नीला तिच्या नवऱ्याने विचारले "" आपल्याशी ओळख नसलेल्या, आपला काहीही संबंध नसलेल्या पात्राच्या सुख दु.:खाशी इतके समरस होण्याचे कारण काय ? त्यात
तुला काय आनंद वाटतो?
'' पत्नी म्हणाली"-" तुमची ओळख नसलेल्या क्रिकेटपटूने शतक झळकावल्यावर तुम्हाला होणाऱ्या आनंदासारखेच हे प्रकरण आहे.''
===================================================

त्याग आणि आयुष्य
      हेलिकॉप्टरला बांधलेल्या दोराला दहा पुरुष व एक स्त्री लटकून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. इतरांचे प्राण वाचविण्यासाठी कुणी तरी एकाने दोर सोडला पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते.
भावपूर्ण शब्दात ती स्त्री म्हणते" स्त्रिया घरात, रस्त्यावर, कार्यालयात सर्व ठिकाणी
अन्याय सहन करतात. कुटुंब आणि समाज स्त्रीच्या त्यागावर उभा आहे. मीच त्याग करते आणि दोर सोडते''
त्या स्त्रीचे हे भावपूर्ण भाषण ऐकून उरलेल्या दहा जणांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली.
===================================================

मानसिकता
      सुखी व समृद्ध वैवाहिक आयुष्य कसे जगावे यावर चर्चासत्रात चर्चा सुरू होती. पुरुषी वर्चस्व, पुरुषी अहंकार याबद्दल बोलताना एक वक्ते म्हणाले " समजा तुमची बायको तुमच्यापेक्षा जास्त पैसे मिळवत असेल तर तुमची मानसिकता काय राहील ?
श्रोत्यांमध्ये शांतता निर्माण झाली.
पाठीमागून आवाज आला "मला अशी बायको हवी आहे '
====================================================

देवदुताची काळजी
       दीनानाथ रस्त्याने चालला होता. त्याला एक आवाज ऐकू आला. ""थांब पुढे गेलास तर डोक्यात वीट पडेल आणि तू मरशील'' दीनानाथ थांबला.त्याच्या पुढ्यात वीट पडली.
दीनानाथ पुढे चालू लागला, पुन्हा आवाज आला, "" थांब समोरून येणारी कार तुला धडक देईल''दीनानाथ थांबला आणि त्याच्या जवळून एक कार सुसाट वेगाने निघून गेली.
दीनानाथाने विचारले "" पाच मिनिटात माझे प्राण दोन वेळा वाढवणारे आपण कोण आहात?''
प्रत्युत्तरादाखल आवाज आला "" मी तुझा पालक देवदूत आहे.''
दीनानाथने आकाशाकडे पाहत हात
जोडले आणि म्हणाला "" हे देवदुता आपण माझी इतकी काळजी घेत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण मला एक सांगा, माझे लग्न झाले तेव्हा आपण कोठे होता?''
====================================================

अकौंटंट
        एका कंपनीत अकौंटंट पदासाठी
मुलाखती झाल्या. मुलाखतीसाठी चाळीसजण हजर होते. या सर्वउमेदवारांत तुषार शैक्षणिक पात्रता, लेखी परीक्षा, मुलाखत या सर्व बाबीत सरस ठरला. मुलाखतीनंतर व्यवस्थापकांनी तुषारला बोलावून घेतले. ते म्हणाले "" तू इतरांपेक्षा अभ्यासू हुशार व स्मार्ट आहेस.आम्ही तुला वर्षाला एक लाख वीस हजाराचे पॅकेज देऊ''
तुषार म्हणाला , "" सर म्हणजे मला
महिन्याला किती रुपये पगार मिळणार ? ''
====================================================

कल्पना
शिक्षक - कल्पना कर की तू "डायनासोअर' च्यादुनियेत आहेस आणि एक डायनासोअर तुला खाण्यासाठी सज्ज आहे तर तू काय करशील ?
विद्यार्थी - सोप्प आहे ...कल्पना करणे ताबडतोब बंद करीन
====================================================

प्रार्थना
      पिंटू प्रथमच आपल्या आजोबांसोबत गणपतीच्या मंदिरात गेला होता. मंदिरात शिरल्याबरोबर आजोबांनीदारातील घंटा वाजवली. पिंटू बारकाईने आपले आजोबा काय काय करतात ते निरखून पाहत होता. नंतर आजोबागणपती समोर हात जोडून डोळे मिटून बसले. पिंटूही गणपतीसमोर हात जोडून बसलापण त्याने डोळे न मिटता तो आजोबा काय करतात ते बघत होता.आजोबा डोळे मिटून दोन क्षण बसले आणि त्यांनी
प्रार्थना केली -
आजोबा - देवा मला पाव
क्षणाचाही विलंब न लावता डोळे मिटून पिंटू म्हणाला -'' देवा मला खारी ''
====================================================

असेही सूत्र
     मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.ल. देशपांडे यांनी सरकारी कामकाजातील दुर्बोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला होता.ते म्हणाले, "" रेडिओवरच्या मराठीत 'अमुक वृत्त पोलिस सूत्रांनी दिले' असं मी जेव्हा ऐकलं, तेव्हा पोलीससूत्र हे काय प्रकरण आहे, ते मला कळेना !
आता कळलं. 'सूत्र' हे इंग्रजी "सोर्स' चं भाषांतर आहे. पोलिस कचेरीतून ही
माहिती मिळाली, ... असं सांगितलं असतं,
तर वृत्तनिवेदकाला काय पोलिसांनी पकडलं असतं?'' ते पुढे म्हणाले "" म्हणजे आता आपल्या बायकोकडून एखादी बातमी कळली, तरी ती मंगळसूत्राकडून कळली, असं म्हणायला हरकत नाही!
====================================================

रिकामी सीट
दोन बायका एका बस मधे जागेवरून भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला," तुमच्यापैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल' आणि ती एक सीट रिकामीच राहिली ====================================================

पाच सत्य वचने
◆मूलभूत राजकीय पक्ष दोनच - सत्ताधारी, सत्ताकांक्षी
◆मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड
◆प्रेम आंधळे असते, लग्न डोळे उघडते
◆देवा मला वाट पाहायची शक्ती दे
...तीही आज आत्ता ताबडतोब
◆काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे , पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.
====================================================

मूर्ख बनविले
दुकानदाराने एका पोपटाची किंमत पाचशे रुपये सांगितली. गिऱ्हाईक म्हणाले,"" ही किंमत खूप जास्त आहे.
दुकानदार म्हणाला "" माझा पोपट बोलका आहे, पाहिजे तर पोपटाला विचारा, त्याची ती रास्त किंमत आहे '' गिऱ्हाईक पोपटाला म्हणाले "" ही किंमत रास्त आहे का ?
पोपट म्हणाला ""या बाबत शंकाच नको''
पोपट खरेदी करून घरी गेल्यावर गिऱ्हाईक म्हणाले "" मला दुकानदाराने नक्की मूर्ख बनवले.''
पोपट म्हणाला "" याबाबत शंकाच नको''
====================================================

एक तरुण एका ग्रंथालयात नोकरी हवी
म्हणून मुलाखतीसाठी गेला. मुलाखतकर्त्यांने त्याला, "आपल्याला यापूर्वी वाचनालयातील नोकरीचा काही
अनुभव आहे का ' असे विचारले.
तो तरुण उत्तरला "" अनुभव म्हणून पूर्वी काम करत असलेल्या ग्रंथालयांचे शिक्के असलेली पुस्तके या ग्रंथालयाला मी
देऊ शकतो.''
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...