Saturday, December 17, 2016

अल्लाहाचं घर?

माझ्या तीन वर्षाच्या मुलाने,
माझं बोट धरून,
फिरायला नेण्याचा हट्ट धरला..
चौकातली मशीद पाहून तो म्हणाला "काय आहे?"
मी म्हणालो,"अल्लाहा चं घर"
पुढे दुस-या चौकात मंदीर पाहून...
तोच म्हणाला,"अब्बू,अल्लाहाचं घर?"

मात्र मी नि:शब्द..निरुत्तर...
त्याच्या हातून माझं बोट काढून घेतलं
अन मीच त्याचं बोट धरलं..!!

कवि- शेख बिस्मिल्ला

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...