आपल्या विचारांवर आपलं आयुष्य अवलंबून असतं. आपल्या मनात जे विचार येत असतात त्याचप्रमाणे आपले आयुष्य घडत असते. जर आपल्याला आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणावयाचा असेल तर आपल्याला नेहमीपेक्षा वेगळा करणे अत्यंत गरजेचे आहे.
नेहमीपेक्षा वेगळा विचार केल्यावर तर काय होतं? तर आपल्या समस्या, प्रश्न आपण सहजपणे सोडवू शकतो. जीवनाकडे सकारात्मकपणे बघता येते. आपला जीवनविषय दृष्टिकोन व्यापक बनण्यास मदत होते. इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्हीच इतरांना मदत करायला पुढे धावता. एखाद्या प्रश्नाकडे विविध अंगांनी बघता येणे सहज शक्य होते. मन आनंदी राहते. आपल्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होते. आपल्या स्वभावामध्येही बदल होण्यास मदत होते. ते कसे हे एका उदाहरणाद्वारे पाहूयात...
बर्नर हा तरुण एका फोटोग्राफरकडे काम करीत होता. त्याच्या स्टुडिओत एक तरुण एकदा एक खगोल शास्त्रावरील पुस्तक विसरला. हे पुस्तक बर्नर घरी घेवून गेला आणि रात्रभर जागुन त्याने ते पुस्तक वाचून काढले. त्या पुस्तकातून बर्नरला स्फूर्ती मिळाली आणि त्याने एक चार इंची दुर्बिण खरेदी केली. त्याच चार इंची दुर्बिणीने तो आकाश निरीक्षण करू लागला. आकाश निरीक्षणाचा क्रम त्याने रोज रात्री चालू ठेवला. त्यामुळे त्याचा अभ्यास वाढत गेला. त्याला खगोलशास्त्रातील थक्क करणारी माहिती मिळाल्यावर त्याच्या आश्चर्याला सीमाचा राहिली नाही. आता त्याने थोडी मोठी दुर्बिण खरेदी केली आणि आकाशाचा त्याचा अभ्यास रोज वाढू लागला.

लवकरच त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याला समजलेली आकाशातील अनेक रहस्ये त्याने जगासमोर मांडली. हे सर्व यश बर्नरला तेथे विसरलेल्या पुस्तकातून लाभले. बर्नरला संधी एका पुस्तकातून मिळाली एका पुस्तकाच्या रुपाने बर्नरसमोर संधी चालून आली होती. त्याचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. खरोखर त्यावेळी बर्नरने वेगळा विचार केला नसता तर तो खगोलशास्त्राचा अभ्यासक होऊ शकला नसता. परंतु त्याने नेहमीपेक्षा वेगळा विचार केला व आयुष्यात यशस्वी झाला. आपल्यालाही जर काही मिळवायचे असेल तर अनेक मार्ग खुले असतात फक्त त्या मार्गांचा शोध घेण्यासाठी आपण नेहमीपेक्षा वेगळा विचार करणं जास्त महत्वाचं आहे
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment