Thursday, April 13, 2017

असे तयार झाले Whats app

युक्रेनमधल्या एका छोटय़ा खेडय़ात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता.
         तो १६ वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय- सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाहीत. परिस्थिती इतकी बिकट होती की, अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्य़ा-पेन असं शालेय साहित्यसुद्धा येताना आणलं. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याची आई पैसे मिळविण्यासाठी लहान मुलांना सांभाळायची आणि यान दुकानात फरशी पुसायचा. यानला इंग्लिश चांगलं येत असल्यामुळे रद्दीमधून काही वापरलेली पुस्तकं आणून तो कॉम्प्युटर नेटवर्किंग शिकला. पुढे कॉलेजमध्ये शिकताना कॉम्प्युटर हॅक करायला शिकला. याहू या कंपनीत एकदा तांत्रिक अडचण आली असताना यानने ती अडचण लीलया सोडवली आणि त्याला याहूमध्ये नोकरी लागली.
             ९ वर्षांनी त्यांनी याहू सोडली आणि फेसबुकमध्ये नोकरीसाठी अर्ज केला, पण तो नाकारला गेला. काही महिने नोकरी न करता काहीतरी नवीन शोधलं पाहिजे या भावनेने तो झपाटून गेला. अमेरिकन सरकारच्या बेकारी भत्ता कार्यालयासमोर रांगेत उभा राहून काही महिने उदरनिर्वाह केला. एका रशियन मित्राकडे जेवण आणि सिनेमा यासाठी अधूनमधून मित्र जमायचे आणि तिथे नवनवीन कल्पनांवर चर्चा चालायची. त्या वेळी अ‍ॅप्पलचा आयफोन नुकताच बाजारात आला होता. अ‍ॅप्पलचं अ‍ॅप स्टोर फक्त ७ महिन्यांचं होतं. त्यामुळे या अ‍ॅप स्टोअरसाठी अ‍ॅप तयार करणं ही मोठी संधी आहे हे त्याने ओळखलं.
           यानला अशी कल्पना सुचली की फोनबुकमध्ये ज्यांचा नंबर आहे त्यांच्या नावापुढे त्यांचा स्टेटस मेसेज दिसला तर? म्हणजे ‘मी आता हॉटेलमध्ये आहे’ किंवा ‘माझ्या फोनची बॅटरी कमी आहे’ इत्यादी. मग यान दिवसरात्र कामाला लागला. त्यांनी एक मोबाइल अ‍ॅप तयार करायला सुरुवात केली, ज्यात असे स्टेटस मेसेज दिसतील हे करता करता त्याला लोकांना या अ‍ॅपद्वारे एकमेकांशी गप्पा मारता याव्या, अशी कल्पना सुचली. हेच ते ‘व्हाट्सअ‍ॅप’ नावाचं, अ‍ॅप जे जगभर प्रचंड लोकप्रिय झालं. इतकं लोकप्रिय की, २०१४ मध्ये फेसबुकनं हे अ‍ॅप एकोणीस अब्ज डॉलर्सला विकत घेतलं! या विक्री व्यवहारावर स्वाक्षरी करण्यासाठी यान कूमनी एका खास जागेची निवड केली. ज्या बेकारी भत्ता कार्यालयासमोर यान भत्त्यासाठी रांगेत उभा राहायचा त्याच कार्यालयाच्या दारावर त्याने विक्री कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
                 आज जगात एक अब्ज लोक हे अ‍ॅप वापरतात. केवळ एक अफलातून कल्पना एका माणसाला कुठून कुठे नेऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे.
                  पुढे हे अ‍ॅप वापरकर्त्यांला उपयुक्त अशा सोयींनी विकसित होत गेलं. आज या अ‍ॅपवरून जगात कुठेही फुकट फोन करता येतो, संदेश, फोटो आणि व्हिडीओ पाठविता येतो.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...