जगातील अनेकजण फक्त भीतीमुळेच पराभूत होतात. आपण जितके खोलवर विचार करणार तितकी भीती मोठी वाटेल. भीतीचा सामना करायचा एकच उपाय आहे, तिच्या समोर ठामपणे उभे राहा. पुढील काही गोष्टींमुळे तुम्हाला भीती नक्की दूर करता येईल...!
( वाचा #प्रिये या लोकप्रिय #टॅग विषयी )
👉 मन जे सांगते तेच ऐका :
विशेषत: तुमच्यासाठी योग्य काय आहे ते पहा. दुसर्यांचे म्हणणे ऐका, पण निर्णय तुम्हीच घ्या. तुमचे मन जे सांगते तेच ऐका. कोणत्याही गोष्टीला एक उपाय नसतो हे लक्षात ठेवा. सर्व वाईट गोष्टींवर विजय मिळवायचा असेल तर मनातील भीतीमुळे पराभव होऊ देऊ नका.
👉 आपल्याला सर्वश्रेष्ठत्व द्या :
आपल्यासंदर्भात कठोर बनू नका. कारण कठोर होण्यासाठी दुसरे खूप आहेत. आपण आपल्याला सर्वश्रेष्ठत्व द्या, बाकी सर्व सोडून द्या. स्वत:ला सांगा, मी सर्वश्रेष्ठ काम करीत आहे. माझ्याकडे जे ही आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. स्वत:चा सन्मान करा आणि विश्वास ठेवा. कोणतेही काम आपण करू शकतो. काम करताना होणार्या चुकांमुळे तुमचे प्रयत्न दिसतील. आपण चांगले नाहीत, ही भीती नकोच.
👉 स्वत:ला तयार करा :
चांगली संधी येईल याचा विचार करून जीवनात थांबता येणार नाही. जर तुम्हाला ठाऊक नसेल की, लक्ष्य कुठे आहे, तर भरकटण्याची शक्यता आहे. म्हणून यासाठी स्वत:ला तयार करा आणि पुन्हा लक्ष्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न करा. ध्येयासाठी भीती बाळगू नका
👉 कम्फर्ट झोन सोडा :
अनेक वेळा तुम्ही जुन्या मार्गावरून जात असतात आणि ते बदलू इच्छित नसतात. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्याची तुम्हाला भीती वाटेल. त्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न आणि लक्ष्य उद्यावर सोडून देता. असे करताना तुम्ही तुमची संधी वाया घालवतात. कारण तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडत नाहीच. त्यामुळे तुम्ही कारणे देतात आणि जेव्हा करायचे असते तेव्हा संधीचा फायदा घेत नाही. बदल आणि कम्फर्ट झोन सोडण्याची भीती नको.
👉 योग्य विचारांच्या लोकांची संगत :
तुम्ही कोणाशी किती संबंधित आहात याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो. जेव्हा तुम्हाला काही व्यक्तींकडून सातत्याने दु:ख मिळते तेव्हा त्यांच्यापासून लांब होणेच योग्य असते. त्यामुळे अशा लोकांच्या सानिध्यात रहा, जे तुम्हाला प्रेरणा देत राहतील.
👉 स्वत:ला आनंदी ठेवा :
तुम्ही आनंद आपल्यातून बाहेर शोधत असाल तर तो मिळणार नाही. जितका जास्त बाहेर शोध घ्याल तितका तो आत लपण्याचा प्रयत्न करेल. शांततेने बसा. आपल्या सर्वात मोठ्या इच्छेचा विचार करा आणि ती पूर्ण करण्याचे मार्ग स्वत: शोधा. जेव्हा आपले डोळे उघडतील तेव्हा रोज स्वत:ला आनंदी ठेवण्याची क्षमता आपल्यात असल्याचा विश्वास ठेवा.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment