Friday, April 14, 2017

बाबासाहेब आंबेडकर

आज 14 एप्रिल , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती दिवशी आपल्या ब्लॉगकडून मानाचं अभिवादन।

आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडक विचारांचे स्मरण करूया


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन:

*  समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
*  समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो.
*  जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर महत्पदाला चढतो.
*  माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
*  शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.
*  मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.
*  माणूस धर्माकरीता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
*  शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
*  जेथे एकता तेथेच सुरक्षितता.
*  काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
*  सेवा जवळून, आदर दुरून, ज्ञान आतून असावे.
*  जो प्रतीकुल  लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो,
*  शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.
*  जे खरे आहे तेच बोलावे.
*  माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
*  दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
*  शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र  क्षेत्र आहे.


जय भीम

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...