Wednesday, April 19, 2017

Lets accept the change

           आपल्या आयुष्यात सतत बदल होत असतात कधी परिस्थितीत, कधी माणसांत, कधी नातेसंबंधात, कधी आजूबाजूच्या परिस्थितीत आणि दुर्दैवाने या सार्‍यावर आपण प्रत्येकवेळी नियंत्रण ठेवू शकूच असे नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे घडवून आणू शकूच असे नाही. त्यामुळे झालेल्या बदलाचा त्रास करून घेण्यापेक्षा थोडी तडजोड केली तर आपण अनेक समस्यांपासून दूर राहू शकतो. मानसशास्त्र सुकर आयुष्य जगण्यासाठी नेहमी आपल्याला असं सांगत की, प्रथम परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. पण परिस्थिती बदलणं शक्य नसेल तर प्रथम स्वतःमध्ये बदल करा’
                
              मित्रांनो बारकाईने विचार केलात तर आपल्या असं लक्षात येईल की, बर्‍याचदा ही तडजोड किंवा अ‍‍ॅडजेस्टमेंट करण्यात निर्माण होणारा अडसर म्हणजे आपला इगो अर्थात आपला ’अहम् भाव’. माझ्या अहम् भावाला धक्का लागेल असे जेव्हा आपल्याला जाणवायला लागते तेव्हा आपण तडजोड करणे नाकारतो. आपला अहम् भाव दुखावला जाऊ नये म्हणून परिस्थिती बदलण्याच्याच मागे लागतो. परिस्थिती किंवा माणसांनीच आपल्यासाठी बदलले पाहिजे असा आपला अट्टहास असतो आणि हा अट्टहास पुरा करण्याच्या प्रयत्नातूनच मग समस्या निर्माण होतात. आपल्या नकळत आपली मतं समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न करू लागतो, त्यांच्या भावना, मन दुखवायला लागतो. कारण आपल्याला आपला अहम् कोणत्याही परिस्थितीत दुखवायचा नसतो.
               पण मित्रांनो एक लक्षात घ्या, ’बदल हा सृष्टीचा नियम आहे.’ सगळेच दिवस सारखे नसतात. मग तुम्ही मी या नियमाला अपवाद कसे असू शकतो. बदल होणार हे तर सत्यच आहे. प्रश्‍न इतकाच आहे की, हे बदल आपण कसे स्वीकारतो. चांगले बदल अर्थातच आपण आनंदानेच स्वीकारतो. पण काही बदल नकोसे वाटणारे, त्रास देणारे, दुःख देणारे असले तरी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून, परिस्थितीचा, समोरच्या व्यक्तीचा, तिच्या भावनांचा विचार करून कमीत कमी त्रास करून घेणे अनिवार्य असते. आपला अहम् दुखावला जाऊ नये या भावनेतून परिस्थितीचा अस्विकार केलात किंवा ती बदलण्याचाच अट्टहास केला तर समस्या निर्माण होणं उघडच आहे.
              त्यामुळे परिस्थितीचा योग्य तो विचार करूनच आपण तडजोड करायला हवी. बदलांचा खुल्या दिलाने स्वीकार आणि अंगिकार केल्यामुळे आपला अहम् भाव दुखावणार तर नाहीच उलट समस्या सोडवल्याचे समाधान तुम्हाला वेगळा आनंद देईल...
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...