7 एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारण याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली होती. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. 7 एप्रिल 1948 रोजी स्विझर्लंड मधील जीनिव्हामध्ये याची स्थापना झाली. या संघटनेविषयीच्या कराराची पहिली बैठक 22 जुलै 1946 रोजी झाली होती. त्यात 51 देशांचा सहभाग होता व आज या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ 192 देशांचा सहभाग आहे.
लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे जास्तीत-जास्त लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट असून सुरुवातीला देवी रोगाचं निर्मूलन करण्याची अग्रगण्य भूमिका या संस्थेने बजावली होती. सध्या एचआयव्ही, इबोला, मलेरिया आणि क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रभाव कमी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. याचप्रमाणे संसर्गजन्य रोगांचा प्रभाव कमी करणे, लैंगिक संबंधातून पसरणारे रोग सुधारणे, माता आणि बाल यांच्या आरोग्याचा विकास, वृद्धत्व, पोषण आणि पर्यावरण स्वच्छता, अन्न सुरक्षा, पदार्थ निरोगी राखणे, व्यावसायिक आरोग्य राखणे, पदार्थाचा दुरुपयोग कमी करणे, तसंच आरोग्यविषयक अहवाल प्रकाशन करणे आदी गोष्टींसाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विविध कार्यक्रम राबवत असते.
दक्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंटन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेची कार्यालये आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेची कार्य पुढीलप्रमाणे
👉 आंतरराष्ट्रीय आरोग्य कामात दिशादर्शक म्हणून काम करणे व समन्वय राखणे.
👉 संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रभावी सहकार्याने विशेष संस्था, सहकारी आरोग्य प्रशासन, व्यावसायिक गट आणि इतर संस्थांचे व्यवस्थापन करणे.
👉 आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सरकारला मदत करणे.
👉 योग्य तांत्रिक सहाय्य करणे आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आवश्यक ती मदत करणे.
👉 जिथे आवश्यक असेल तिथे अपघाती जखम प्रतिबंध आणि इतर विशेष संस्थांमार्फत सहकार्य करणे.
👉 काही विशेष संस्थांमधील पोषण, निवारा, स्वच्छता, मनोरंजन, पर्यावरण स्वच्छता आदी गोष्टींना प्रोत्साहन किंवा सहकार्य करणे.
👉 नियमावली, करार आणि नियम मांडणे तसंच आंतरराष्ट्रीय आरोग्य वास्तू सुरू करण्यासंदर्भात शिफारसी करणे.
No comments:
Post a Comment