Saturday, April 22, 2017

आजीबाईचा बटवा : तुळस

         तुळस म्हणजे पवित्र वनस्पती तसेच तुळस सहज प्राप्त होणारी परंतु उच्चकोटीचे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. तिचे पान, खोड बी, सर्वच औषधी आहे. तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस निर्माण झाली अशी तुळशीच्या उत्त्पत्तीविषयी पुराणात कथा सांगितलेली आहे. तुळशीचे एकूण 5 प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र तुळस, राम तुळस, बाबी तुळस आणि तुकाशामीय तुळस. तुळशीचे अन्य गुणधर्म जाणून घेऊयात...

👉 रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीच्या रस पिल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते.

👉 ताप आल्यावर तुळशीचा रस पिल्यानंतर ताप कमी होतो.

👉 मलेरीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा रस पिल्यावर आराम मिळतो .

👉 गजकर्ण आणि कोड यासारख्या तसेच त्वचा रोगांवर उपचार तुळशीचा रस लावला जातो.

👉 रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वारधक्य कमी करण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा होतो.

👉 तुळशीमध्ये इगेनॉल हे द्रव्य असल्याने मधुमेह रोगावर नियत्रंण मिळवण्यासाठी फायदा होतो.

👉बारीक ताप, खोकला, सर्दी या विकारात तुळस गुणकारी आहे तसेच तुळशीची पाने डासांना दूर पळवितात.

👉 मूळव्याध, दम, कोरडी खरुज , कावीळ, केस गळणे, क्षयरोग अश्या अनेक रोगांवर तुळस गुणकारी आहे.

👉 रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या झाडासमोर बसून दीर्घ श्वसन केल्यास आरोग्य सुधारेल.

👉 कोलायटीस , अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कडे, मेदवृद्धी, डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...