सर्वोच्च न्यायालयाने, आज १ एप्रिलपासून बीएस-३ दर्जाच्या वाहनांची विक्री आणि नोंदणी करण्यावर प्रतिबंध घातल्याने वाहननिर्मात्या कंपन्यांचे धाबे दणाणले आणि ग्राहकांवर सवलतींचा पाऊस सुरू झाला.
बीएस-३ दर्जाच्या वाहनांतून होणारे प्रदूषण रोखले जावे हा न्यायालयाचा उद्देश होता; पण त्यास हरताळ फासत काही तासांतच त्या वाहनांची विक्रमी विक्री होणे प्रदूषणवाढीस हातभार लावणारे आहे.
आताच्या वायुप्रदूषणाने घुसमट तर होतच आहे, त्यात आता बीएस-३ वाहनांची अचानकपणे अधिकची भर पडल्याने वायुप्रदूषणाची पातळी उंचावल्याचे घातक परिणाम सोसावे लागणार आहेत.
ज्यामुळे प्रदूषण वाढते ते माहीत असूनही सवलत मिळत असल्याने तिची खरेदी करणे म्हणजे निव्वळ बिनडोकपणा आहे. वाढत्या प्रदूषणापेक्षा प्रदूषण करणाऱ्या बीएस-३ दर्जाच्या वाहनाच्या घसरलेल्या किमती महत्त्वाच्या वाटल्या.
याचा अर्थ हाच की, प्राणापेक्षा प्रदूषण प्रिय आहे, असाच विचार सवलतींवर उडय़ा मारणाऱ्या ग्राहकांनी केल्याने प्रदूषण कमी करण्यास नाही, तर ते वाढवण्यास कोणत्या पातळीला जाऊ शकतात हे दाखवून दिले आहे.
वाहननिर्मात्या कंपन्यांनी बीएस-३ दर्जाच्या वाहनांवर सवलत दिली, पण प्रदूषणाकडून तशी कोणतीच सवलत मनुष्याला मिळणार नाही.
No comments:
Post a Comment