Tuesday, April 11, 2017

महात्मा जोतिबा फुले

स्थळ जयप्रभा studio, शाहू महाराज मालिकेचे चित्रिकरण चालू होते. माणगांव परिषदेच्या प्रसंग होता. अभिनेते राहुल सोलापूरकर शाहूंच्या पोषाखात, अभिनेता शैलेश दातार आंबेडकर बनले होते. मी छोट्या भूमिकेच्या निमित्ताने तिथे होतो. शाहूंच्या भाषणाचे चित्रण चालू झाले. भाषणात एके ठिकाणी शाहू महाराज म्हणतात कि मी *महात्माजींच्या विचारांनी खूपच प्रभावी आहे* असे एक वाक्य होते. राहूल सोलापूरकर सह सगळ्यांनाच हे वाक्य खटकू लागलं. कारण ज्याकाळातली ती घटना आणि भाषण होते तेव्हा गांधीयुगाची सुरूवातही नव्हती मग इतक्या लवकर गांधीना महान म्हणून त्यांच्या विचारांनी प्रभावित आहे असे तेव्हाच जाहीर भाषणात कसे म्हणतील? राहूलजींना हे खटकल्यावर त्यांनी दिग्दर्शक सतिश रणदिवेंना त्याबद्दल विचारले. सतिशजींनी ते शाहूंचे छापील भाषण आहे तसे आहे असे सांगितले. राहूलजींनी त्या छापील भाषणाचे पुस्तक मागवीले आणि ते स्वतः ते भाषण वाचून पाहू लागले. मागील पुढील संदर्भ त्यांनी चाळला. त्यादरम्यान चित्रिकरणाचे काम बरेच वेळ थांबले होते. पण नाईलाज होता. काही वेळाने राहूलजींना काहीतरी लक्षात आले. ते म्हणाले चला tack करुत. सतिशजींनी विचारले काय? लक्षात आलं? राहूलजी म्हटले *ज्योतिबा  फुलेंना* महात्माजी म्हटले आहे. उपस्थित सारेच नरमलो कि इतकी साधी गोष्ट आपल्या  लक्षात येऊ नये?
        पुढे एकदा मला या घटनेची आठवण पुन्हा आली जेव्हा एका भाषणात वक्ते प्रताप घेवडे म्हणाले कि आपल्याकडे दोन व्यक्तींना महात्माही उपाधी मिळाली एकाला देशाच्या नोटेवर स्थान  मिळाले तर दुसरा मात्र विस्मृतीत जात आहे. गांधीबद्दल मला प्रचंड आदर आहेच. आणि त्यांचा आदर करणारा मोठा वर्ग आहे आणि न मानणारेही टिका करण्यासाठी  का होईंना गांधींचे नांव पुन्हा पुन्हा घेतात. पण फुलेंचे काय?
      खरं म्हणजे शाळा काढल्या, पत्नीला मुलींना शिकविले, हौद काढले इतकेच  त्यांचे कार्य आज सर्वांना माहिती आहे. आणि पाहुणे दोनशे वर्षांनंतर शाळा इतक्या  उदंड झाल्या आहेत आणि मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे म्हणून फुलेंच्या कार्यांची थोरवी कदाचित जाणविणार नाही. पण त्यांचे कार्य येवढेच मर्यादित नव्हते तर सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रध्दांना विरोध करुन वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे विचार, जाती व्यवस्था घणघणीता टिका हे आजही काळाच्या पुढचे वाटण्यासारखे आहेत. आपण आजही जितकी परखड मते मांडण्याचे धाडस करणार  नाही तो ज्योतिबा फुलेंनी मांडला, त्यासंबंधी लिखाण केले आणि त्याच्या तळागाळाप्रयत्न प्रभावीपणे पोहचवला. महाराष्ट्रात फुलेंच्यानंतर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात उभारल्या त्याचे सारे श्रेय *शिवबाच्या दृष्टीला, तुकोबाचूया वाणीला आणि ज्योतिबाच्या कृतीला* जाते.            पण वाचनाच्या आभावामुळेच ज्योतिबांचे परखड विचार न कळता. फक्त शाळा सुरू केल्या इतकेच कळले.
     विद्दे विणा समाजाचे खूप नुकसान होते आहे याची जाणीव होऊन ज्योतिबांनी तळागाळापर्यंत तिचा प्रसार व्हावा हे ध्येय ठेवले खरे. आणि आजचे स्वरूप पाहता त्यांचे हे स्वप्न ढोबळमानने पूर्ण झाले असे चित्र तयार झाले आहे. पण ज्योतिबांना अपेक्षित असणारी विद्या घेऊन माणसे आजही शहाणी होताना दिसत नाही.
         हे सगळं आजच सुचन्याचे कारण कि ११ एप्रिल या तारखेला ज्योतिबा फुले जयंती आहे. साहेबांच्या जयंतीच्या तयारीत असणारे किंवा महाराजांच्या जयंतीच्या नियोजनात गर्क असणारे ज्योतिबांच्या जयंतीला मात्र इतका उत्साह दाखवित नाहीत. बाबासाहेब ज्ञानाचा महासागर असतील तर ज्योतिबा त्याचे उगम स्थान आहे आणि शिवाजी महाराज आपल्या अभिमानाचे प्रतिक असतील तर त्याची जाणीव करुन देण्याचे श्रेय ज्योतिबांना जाते याची जाणीव सर्वांना हवी. मला कल्पना आहे कि संयुक्त जयंती करत काहीजण बाबासाहेबांच्या सोबत ज्योतिबांची तेव्हा जयंती करतात पण संयुक्त जयंतीत ज्योतिबांना तितका मान मिळतो का? हा प्रश्न सर्वांना पडावा. आणि मला हेही माहिती आहे कि social media वर सकाळी आलेले ज्योतिबांना जयंतीनिमित्याने  आभिवादन करणारे संदेश दिवसभर copy paste होत राहतील. पण ज्योतिबांचा मान यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
      आणि काहीजण असेही म्हणतील कि जयंतीच्या औपचारिकतेची गरजच काय? त्यांचे तर मी मनापासून स्वागत करेण आणि म्हणेण कि नकोच महापुरुषांच्या जयंती/पुण्यतिथी कायमच  आपण त्यांच्या विचारांचा अभ्यास आणि आदर करुत.
        नाहीतरी मागील वर्षीच ११ एप्रिल मी जेव्हा आमच्या officeमध्ये ज्योतिबा फुलेंच्या जयंती निमित्ताने अभिवादन करु म्हटलं तेव्हा आमचे साहेब पुन्हा पुन्हा शंका काढून विचारत होते कि आजच जयंती आहे ना? साहेबांचे तरी काय चुकले म्हणा त्यादिवशी ना सुट्टी ना  कसले परिपत्रक. त्याहूनही मोठी गंमत म्हणजे दोन कर्मचाऱ्यांच्यामध्ये ज्योतिबांना नाम भवगा ओढायचा असतो कि निळा? यावरून एकमत होईना.
        असो जंयती मोठी करो वा छोटी यावरून ज्योतिबांच्या कार्यांचा किंवा विचारांचा मोठेपणा ठरणार नाही आहे. ते मोठेच आहेत. म्हणून किमान आपल्या पातळीवर तरी ज्योतिबांचे  विचार समजून घेऊत. आणि ज्यांना समजले आहेत त्यांनी अंगीकारण्याचा प्रयत्न करुत.
             कपिल मुळे
            ९७६७८९७४१४
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...