Friday, March 31, 2017

आयपीएल चे संपूर्ण वेळापत्रक

       यंदा आयपीएलच्या मोसमाला 5 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील…

संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे

मॅच 1 : SRH vs RCB, 5 एप्रिल 2017, रात्री 8 वा.( भारतीय वेळेनुसार)

मॅच 2 : RPS vs MI, 6 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 3 : GL vs KKR, 7 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 4 : KXIP vs RPS, 8 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 5 : RCB vs DD, 8 एप्रिल 2017,रात्री 8 वा.

मॅच 6 : SRH vs GL, 9 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 7 :  MI vs KKR, 9 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 8 : KXIP vs RCB, 10 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 9 : RPS vs DD, 11 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 10 : MM vs SRH, 12 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 11 : KKR vs KXIP, 13 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 12 : RCB vs MI, 14 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 13 : GL vs RPS, 14 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 14 : KKR vs SRH, 15 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 15 : DD vs KXIP, 15 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 16 : MI vs GL, 16 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 17 : RCB vs RPS, 16 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 18 : DD vs KKR, 17 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 19 : SRH vs KXIP, 17 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 20 : GL vs RCB, 18 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 21 : SRH vs DD, 19 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 22 : KXIP vs MI, 20 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 23 : KKR vs GL, 21 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 24 : DD vs MI, 22 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 25 : RPS vs SRH, 22 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 26 : GL vs KXIP, 23 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 27 : KKR vs RCB, 23 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 28 : MI vs RPS, 24 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 29 : RCB vs SRH, 25 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 30 : RPS vs KKR, 26 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 31 : RCB vs GL, 27 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 32 : KKR vs DD, 28 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 33 : KXIP vs SRH, 28 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 34 : RPS vs RCB, 29 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 35 : Gl vs MI, 29 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 36 : KXIP vs DD, 30 एप्रिल 2017, रात्री 4 वा.

मॅच 37 : SRH vs KKR, 30 एप्रिल 2017, रात्री 8 वा.

मॅच 38 :  MI vs RCB, 1 मे 2017, रात्री 4 वा.

मॅच 39 : RPS vs GL, 1 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 40 : DD vs SRH, 2 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 41 : KKR vs RPS, 3 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 42 : DD vs GL, 4 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 43 : RCB vs KXIP, 5 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 44 : SRH vs RPS, 6 मे 2017, रात्री 4 वा.

मॅच 45 : MI vs DD, 6 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 46 : RCB vs KKR, 7 मे 2017, रात्री 4 वा.

मॅच 47 : KXIP vs GL, 7 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 48 : SRH vs MI, 8 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 49 : KXIP vs KKR, 9 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 50 : GL vs DD, 10 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 51 : MI vs KXIP, 11 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 52 : DD vs RPS, 12 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 53 : GL vs SRH, 13 मे 2017, रात्री 4 वा.

मॅच 54 : KKR vs MI, 13 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 55 : RPS vs KXIP, 14 मे 2017, रात्री 8 वा.

मॅच 56 : DD vs RCB, 15 मे 2017, रात्री 8 वा.

पहिली क्वालिफायर : 16 मे 2017, रात्री 8 वा.

एलिमिनेटर : 17 मे 2017, रात्री 8 वा.

दुसरी क्वालिफायर : 19 मे 2017, रात्री 8 वा.

फायनल : 21 मे 2017, रात्री 8 वा

आपणाला तोंड आले आहे का?

                  आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच तोंड येणे या प्रकाराचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट, आंबट या चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्याचा त्रास होणे हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे वेळीच त्यावर योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे आहे. या आजाराचे मूळ कशात आहे आणि त्यावर उपाय कोणते आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात...
  ( वाचा केसगळतीवर परिणामकारक जास्वंद )
तोंड येणे म्हणजे नेमके काय?

             तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर किंवा स्टोमोटायटिस असेही म्हटले जाते. हा आजार म्हणजे तोंडाच्या आतल्या भागाला सूज येणे होय.
        यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळताही येत नाही. यात फंगल इन्फेक्शन झाले, तर तोंडाला आतून बुरशी येते, प्रतिकारशक्ती कमी होते. काही वेळा तोंडाच्या आतली त्वचा सोलवटल्यासारखी होते. जीभ आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होते.
तोंड आल्यावर बर्‍याचदा आपण फक्त घरगुती उपचारांवर विसंबून राहतो. बर्‍याचदा त्याचा फायदाही होतो. परंतु वारंवार तोंड येण्याची समस्या सतावत असेल, तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक ठरते.

तोंड येण्याची कारणे काय?

👉 शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे. एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषधे घेत असल्यास त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊन तोंड येते. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन, अति धूम्रपान, अति प्रमाणात तिखट, तेलकट खाणे.

👉 पचनाच्या तक्रारी, विशेषत: पोट साफ नसल्यासदातांचे विकार असल्यास किंवा दात झिजून टोकदार झाले असल्यास ते वारंवार लागूनही तोंडात व्रण होता आणि तोंड येण्याचा त्रास होतो.

👉 कुपोषण किंवा ब 12 या जीवनसत्त्वाचा आणि अन्य पोषक द्रव्यांचा अभाव. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे होणारे इन्फेक्शन. अशा प्रकारे तोंड येण्याची कारणे वेगवेगळी असतात. त्यामुळे या त्रासाचे नेमके कारण शोधून त्यावर उपाययोजना केली जाणे महत्त्वाचे असत

तोंड येणे यावर उपाय काय?

👉 तोंड आल्यानंतरच्या वेदना कमी करून तात्पुरते बधीरत्व आणणारी मलमे सध्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केला, तर वेदना कमी होऊन रुग्ण व्यवस्थित जेवण करू शकतो. त्यामुळे आहार कमी होऊन त्रास वाढण्याचे टळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टी व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सच्या सप्लीमेंट्स घ्याव्यात.

👉 उष्णतेने तोंड आले असल्यास अतिरिक्त उष्णता कमी करणारी औषधे घ्यावीत. नारळपाणी, सौम्य चवीचे सूप, थंड दूध असे घटक आहारात घ्यावेत.

👉 जीवाणू आणि विषाणू संसर्ग किंवा बुरशीच्या संसर्गाने तोंड आल्यास झाल्यावर अ‍ॅन्टीबायोटिक्स, अ‍ॅन्टी फंगल औषधे डॉक्टरांकडून घ्यावीत. कोमट दुधात हळद घालून प्यावे. शुद्ध गेरूची पूड, हळद आणि मध यांचे मिश्रण तोंडातील जखमा आणि व्रणांवर लावावे.

👉 पोटाच्या तक्रारींमुळे तोंड येत असल्यास पचन सुधारणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत पोट साफ राहावे यासाठी तंतुमय पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करावा. पोटाची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. काही वेळा आतड्यांना होणार्‍या अल्सरचे सुरुवातीचे लक्षण म्हणून सतत तोंड येण्याची तक्रार उद्भवू शकते. अशी शंका असेल, तर गरम दुधात गाईचे तूप मिसळून नियमित प्यावे.

👉 आहार चौरस आणि सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा होईल असा असावा. अति तिखट, तेलकट जेवण टाळावे. तोंडाची नियमित व योग्य प्रकारे स्वच्छता करावी. पानतंबाखूचे अतिसेवन आणि धूम्रपान टाळावे.

👉 दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्यावी दात झिजून टोकदार झाले असतील, किंवा दातांचे तुकडे पडत असतील, तर त्यांची झीज थांबवण्यासाठी योग्य उपचार घ्यावेत. तुटलेल्या दातांवरही उपचार करून घ्यावे.

👉 विशिष्ट औषधांमुळे हा त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे बदलून घ्यावी किंवा त्यांच्यापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल, ते त्यांना विचारावे.
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Thursday, March 30, 2017

शायरी भाग ७

👉 दुनियादारी में हम थोड़े कच्चे हैं,
पर दोस्ती के मामले में सच्चे है,
हमारी सच्चाई बस इस बात पर कायम है,
कि हमारे दोस्त हमसे भी अच्छे हैं...

👉 वक़्त की हो धूप या तेज़ हो आँधियाँ,
कुछ क़दमों के निशाँ कभी नहीं खोते,
जिन्हें याद करके मुस्कुरा दें ये आँखें,
वो लोग दूर होकर भी दूर नहीं होते..!

👉 अंदाज़ कुछ अलग ही हे मेरे सोचने का,
सब को मंज़िल का शौख हैं, मुझे रास्ते का..।

👉 सब कुछ हासिल नहीं होता
ज़िन्दगी में यहां,
किसी का ‘काश’ तो
किसी का ‘अगर’ छूट ही जाता है!

👉 कोई हालात नहीं समझता
कोई जज़्बात नहीं समझता
ये तो बस अपनी अपनी समझ है
कोई कोरा कागज़ भी पढ़ लेता है
तो कोई पूरी किताब नहीं समझता!!

👉 वो बेवफा नहीं है, हमको यकीन है
बस इम्तहान लेने का खुदा शौकीन है
न आने का सबब महज मजबूरियाँ रही होंगी
वरना दोस्ती के कितने ही उनके लम्हे हसीन हैं!

👉 दूर रहकर हमसे वास्ता रखना,
मुलाकात ना सही बातों का सिलसिला चालू रखना,
छू लो आसमां को तुम हमारी यही तमन्ना है,
पर हम तक वापस आने का रास्ता बनाये रखना!

👉 कलम उठाई है, लफ्ज नही मिलता,
जिसे ढूँढ रहा हूँ वो शक्स नही मिलता,
फिरते हो तुम जमाने की तलाश में,
बस हमारे लिए तुम्हें वक्त नही मिलता…।

(वाचा जमीदार)

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

केसगळतीवर परिणामकारी जास्वंद

जर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे. फॉसफरस, कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो.
(वाचा स्मार्टफोनपासून दूर का राहावे?)

केसगळतीवर परिणामकारी जास्वंद

👉 जास्वंदाची पाने व फुले केसगळतीच्या समस्येवर नैसर्गिकरीत्या परिणामी आहेत.

👉 जास्वंद केसांची वाढ करतात व टाळूचा रक्तपुरवठा वाढवतात

👉 जास्वंदातील कॅल्शियम व व्हिटामिन सी मुळे केसांची घट्ट होतात.

घरीच बनवा जास्वंदाचा हेअर पॅक

👉 जास्वंद आणि खोबरेल तेल
      काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.

👉 जास्वंद आणि ऑलिव तेल
     जास्वंदाचा वापर तुम्ही रोज शाम्पू म्हणून करू शकता. जास्वंद, पाणी आणि ऑलिव तेल एकत्र करा तुमचा शाम्पू तयार. खलबत्यात 2-3 जास्वंदाची फुले व पाने घ्या त्यात थोडं ऑलिव तेल व पाणी घालून कुटून घ्या हे मिश्रण 15-20 मिनिट मुळांपासून टोकापर्यंत लावा व नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.

👉 जास्वंद आणि आवळा
     जास्वंद आणि आवळा केसगळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कुटलेली जास्वंदाची फुलं आणि आवळा पावडर पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण केसांना मूळापासून लावा व पूर्णपणे सुकल्यानंतर ते धुऊन टाका. ही उपचार पद्धती केस गळती पूर्णपणे थांबवून केसांच्या वाढीस मदत होईल.
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Wednesday, March 29, 2017

आणखी एका नास्तिकांची हत्या 

आणखी एका नास्तिकांची हत्या 
लोकसत्ता | 28/03/2017 |

भारतात ईश्वरनिंदा कायदा नाही. पाकिस्तानात तो आहे. भारतात मात्र तसा कायदा करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण त्या कायद्याने जी काही शिक्षा देण्यात येते, दहशत निर्माण करता येते, ती तसा कायदा नसतानाही निर्माण करण्यात येथील अतिरेकी धर्मवाद्यांना पुरेपूर यश आले आहे. त्या धर्मविजयाची द्वाही दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांचा खून करून देण्यात आली आहेच.

याबाबतीत इस्लामसारखा जिहाद-बा-सैफ करणारा, तलवारीच्या बळावर जगभर पसरलेला ‘शांततावादी’ धर्म भारतात याबाबत मागे राहून कसे चालणार होते? तिकडे बांगलादेशात इस्लामविरोधात लिहिणाऱ्या ब्लॉगरांच्या कशा छान छान हत्या होत आहेत. पाकिस्तानात तसे करण्याची हिंमत कोणात नाहीच. तरीही तेथे काही डावे आहेत. नास्तिक आहेत. त्यांचा वेळोवेळी काटा काढण्यात येत आहे आणि भारतात मात्र याबाबत सगळा अंधार? हे कसे चालणार म्हणून आता येथील एका नास्तिक तरुणाची हत्या करून आजवरच्या गलथानपणाचे परिमार्जन करण्यात आले आहे. या तरुणाचे नाव एच फारुख. वय ३१. दोन लहान मुलांचा बाप. कोईमतूरजवळच्या एका गावात भंगारविक्रीचा व्यवसाय होता त्याचा. त्याची समस्या एकच होती. तो विचार करीत असे. द्रविडार विडुदलै कळहम या विवेकवादी संघटनेत जात असे. देव, धर्म मानत नसे. म्हणजे इस्लामच्या दृष्टीने पापीच. इस्लाममध्ये धर्म सोडून दूर जाणे याला बइद म्हणतात. धर्मावर शंका घेण्याला इर्तदाद म्हणतात. असे करणाऱ्यांना जमिनीत पुरावे आणि दगडाने ठेचून ठार मारावे अशी शिक्षा धर्माने दिली आहे. फारुख हा तर त्या दृष्टीने शंभर टक्के वाजिबुल कत्ल होता, कारण तो इस्लामची बदनामी करीत होता. त्याने त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या.

हा भावना दुखावण्याचा रोग मोठा मजेशीर असतो. धर्माच्या नावाखाली केले जाणारे अत्याचार, अतिरेक, दहशतवाद यातून त्यांच्या भावनांना ठेच लागत नाही. हा अतिरेक ठेचावा असे त्यांना वाटत नाही; पण कोणी देव-धर्म मानत नाही म्हटले की त्यांना जगात दानवी प्रवृत्ती वाढली असेच वाटते. ती प्रवृत्ती ठेचून येथे तथाकथित धर्मराज्य स्थापन करण्यास जसे इस्लाममधील अतिरेकी उत्सुक आहेत तसेच हिंदू सनातनीही; कारण याबाबत सारे धर्म सारखेच, परस्परपूरकही. इस्लाममधील अतिरेकाकडे बोट दाखवून हिंदू संघटना आपल्या अनुयायांना अधिक अतिरेकी बनवण्याचे प्रयत्न करणार. ते पाहून येथील इस्लाम अधिक कट्टरवादी बनत राहणार आणि सारे मिळून विवेक, शांतता, सौहार्द, सहिष्णुता यांविरोधात काम करणार. त्यातही एवढा बिनडोकपणा की, या बाबींमुळेच राष्ट्र मोठे होत असते, समाजाचा विकास होत असतो. असा त्या धर्मअंधांचा समज असतो. हा बिनडोकपणा वाढावा यासाठी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन अशा सगळ्यांच धर्मातील अतिरेकी प्रयत्नशील आहेत.

फारुखची हत्या हे त्या प्रयत्नांचेच फळ. अर्थात व्यक्तीची हत्या ही टोकाची क्रिया. त्याऐवजी रोजच्या जगण्यात पदोपदी केली जाते ती स्वातंत्र्याची, विवेकाची हत्या. तुम्ही काय ल्यावे, प्यावे, खावे, कसे वागावे, प्रेम करावे की करू नये हे सारे आता हे भावनादुखीचा रोग झालेले धार्मिक अतिरेकी ठरवीत आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांविरोधात दंडसंहितेची कलमे आहेतच. ती कमी पडतील तेथे त्यांच्या हाती दंड आहेतच. अर्थात विवेकाचा आवाज त्याने दबला जात नसतो. तो कोठे ना कोठे शिल्लक राहतोच. फारुखच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी नास्तिक म्हणूनच जगेन, फार तर मारलाही जाईन, असे जाहीर केले आहे. विवेकाची लढाई सुरू राहतेच.
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Tuesday, March 28, 2017

शेतकऱ्यांचा विकास

शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी पशुसंवर्धन  विभागामार्फत  पशुपालकांसाठी  वैयक्तीक  लाभाच्या  विविध  योजना  राबविल्या जातात. यामध्ये अनुदान असेल किंवा विमा असेल अशा प्रकारची मदत केली जाते. काय आहेत योजना जाणून घेऊयात...

(वाचा नवीन लेख: नव्या गोष्टीची सुरुवात करूया)

👉  दुभत्या जनावराचा पुरवठा :
पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी अनुसूचित जाती/जमातीच्या लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांच्या गटाच्या पुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

👉  शेळी गटाचा पुरवठा करणे :
शेळीपालकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडावी यासाठी अनुसूचित जाती/जमातींच्या लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर 10+1 शेळी गटाचा पुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजने अंतर्गत राबविण्यात येते.

👉  दुधाळ जनावरांचे वाटप :
ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत राबविण्यात येते. यामध्ये केंद्र शासनातर्फे 50 टक्के, राज्य शासनातर्फे 25 टक्के अनुदान देण्यात येते.

👉  दुभत्या जनावरांना खाद्य अनुदान :
दुधाळ जनावरे गट वाटप योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांना भाकड, तसेच प्रगत गर्भावस्थेच्या काळात 100 टक्के अनुदानावर खाद्यपुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

👉   पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण  : ही योजना सर्वसाधारण, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते. पशुपालकांमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वसाधारण पशुपालकांना, तसेच अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभधारकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण देण्यासाठी तरतूद आहे.

👉 सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना :
हि योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येते. राज्यातील 16 सधन कुक्कुट विकास गटांची स्थापन व बळकटीकरण या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री, साधनसामग्री खरेदी व बांधकामावरील खर्चासाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत राबविण्यात येते.

👉 कृत्रिम रेतन सुविधांचे बळकटीकरण :
कृत्रिम रेतन सुविधांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत द्रवनत्रपात्रे खरेदी व यंत्रसामग्री खरेदीसाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

टीप : अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाकडे चौकशी करावी.

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

Oscar 2017

'मूनलाइट'ला बेस्ट फिल्म अवॉर्ड*_
         अवघ्या जगाताचे लक्ष लागून राहिलेल्या ऑस्करची उत्सुकता संपली असून, ऑस्कर मिळालेल्या चित्रपटांची आणि अनेक मान्यवरांची नावे जाहीर झाली आहेत. ऑस्कर हा जगातील सर्वात जुना आणि मानाचा समजला जाणार सोहळा आहे. यंदाचे ऑस्करचे 89 वे वर्ष आहे. कॅलीफॉर्नियातील हॉलीवुडच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे.

👉 मूनलाइट ठरला सर्वोत्कृष्ठ सिनेमा.

👉 ला ला लँडला 6 ऑस्कर.

👉 सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार : केसी अॅफ्लेक ('मँचेस्टर बाय द सी' चिपत्रपटासाठी)

👉 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : एम्मा स्टोन्स (‘ला ला’ लँड चिपत्रपटासाठी)

👉 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार : डेमियन शेझल ('ला ला लँड' चिपत्रपटासाठी)

👉 सर्वोत्कृष्ट गीत पुरस्कार : 'सिटी ऑफ स्टार' ('ला ला लँड' चिपत्रपटामधील)

👉 सर्वोत्कृष्ट लघू माहितीपट : 'व्हाइट हेल्मेट्स'

👉 सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : 'सिंग'

👉 सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार : 'ला ला लँड'

👉 सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : ‘ला ला लॅण्ड’

👉 सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : ‘पायपर’

👉 सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म : ‘झुटोपिया’

👉 विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट : 'द सेल्समन' (इराण)

👉 सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग :  ‘हॅक्सॉ रिज’

👉 सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग : ‘अरायव्हल’साठी सलवेन बेलमेरला ऑस्कर

👉 मेकअप आणि केशरचना : ‘सुसाईड स्क्वॉड’च्या टीमला ऑस्कर

👉 वेशभूषा : ‘फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम’साठी कॉलिन एटवूडला ऑस्कर

👉 सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर : ‘ओ.जे.: मेड इन अमेरिका’

👉  बेस्ट फिल्म नॉमिनेशन

'ला ला लँड', 'मूनलाइट', 'मँचेस्टर बाय द सी', 'अरायव्हल', 'फेंसेस', 'लायन', 'हिडन फिगर्स', 'हॅकसॉ रिज' आणि 'हेल ऑर हाय वॉटर'.

👉 बेस्ट डायरेक्टर- नॉमिनेशन

डेमियन चॅजेज : ला ला लँड  । बॅरी जँकिंस : मूनलाइट । डेनिस विलेनिअवे : अरायव्हल । केनेथ लोनर्गन : मँचेस्टर बाय द सी । मेल गिब्सन : हॅक्सॉ रिज

👉  बेस्ट अॅक्ट्रेस इन लीडिंग रोल

नतालिया पोर्टमॅन : जॅकी । एम्मा स्टोन : ला ला लँड । ईसाबेल हम्पर्ट : एली । मेरिल स्ट्रिप : फ्लोरेंस फोस्टर जँकिंस । रूथ नेगा : लव्हिंग

👉 बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल

रायन गॉसलिंग : ला ला लँड । कॅसी अफ्लेक : मँचेस्टर बाय द सी । डेंजल वॉशिंग्टन : फेंसेस । एंड्रयू गारफील्ड : हॅक्सॉ रिज । विगो मॉर्टेन्सन : कॅप्टन फँटास्टिक

👉 बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर

महेर्शला अली : मूनलाइट । जॅफ ब्रिजेस : हेल ऑर हाय वॉटर । लुकास हेजेस : मँचेस्टर बाय द सी । देव पटेल : लॉयन  । माइकल शेनॉन : नॉक्टर्नल अॅनिमल्स

👉 बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस

विओला डेविस : फेंसेस । मिशेल विलियम्स : मँचेस्टर बाय द सी । ऑक्टेविया स्पेंसर : हिडन फिगर्स । नाओमी हैरिस : मूनलाइट । निकोल किडमैन : लायन
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...