एन.आर.नारायनमूर्ती
नारायणमूर्ती यांनी केलेल्या भाषणाचा सारांश खाली देत आहे.त्यांनी केलेलं भाषण माझ्या मनाला खूप भावलं,त्यांचे ओघवते शब्द अगदी मनावर कोरले गेले.
जीवनामध्ये कोणतेही ध्येय साध्य करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. मात्र,ध्येयप्राप्तीसाठीचा हा ओरवास अखंडितपणे सुरु ठेवण्यामध्येच खरा जीवनानंद आहे. कोणतेही ध्येय गाठल्यानतंर संतुष्ट होऊन चालणार थांबून चालणारथांबून नाही. एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्याची तयारी सुरु केली पाहिजे. कारण प्रत्येक सामन्याच्या विजयाचा आणि तो विजय मिळवण्यासाठी खेळण्याचा आनंद वेगळा असतो. 'आता खूप झालं', असं म्हणून समाधानी राहू नका. जिंकण्याची,उद्दिष्टपूर्ती करण्याची 'प्रोसेस' अव्याहत सुरु राहिली पाहिजे.
मी आयुष्यात अनेक चूक केल्या. अपयशी झालो. मात्र,प्रत्येकवेळी सावरलो.नव्या उमेदीने उभा राहिलो. यशाची वाट नेहमीच काटेरी असते. तो प्रवास करत, यश गाठताना नवे बदल स्वीकारण्याची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे. इलेक्टरीकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर मी हायड्रो पॉवर प्लँटमध्ये नोकरी करण्याचा विचार केला होता.मात्र शिक्षण सुरु असतानाच एका वक्त्यांचे भाषण ऐकलं. त्यांनी संगणक आणि माहिती नाच्या-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऊज्ज्वल भविष्याविषयीचं चित्र त्यांच्या भाषणधुन मांडलं होत.त्या वाख्यानामूळ माझं आयुष्य पालटलं.मी म्हैसूरमधून अभियांत्रिकेच प्रशिक्षण पूर्ण केलं.आय.आय.टी. कानपूर मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. अहमदाबादच्या आय.आय.एम.मध्ये चीफ सिस्टम प्रोग्रॅमर म्हणून नोकरी केली.त्यानंतर परिसमध्येही नोकरी केलीआणि अखेर पुण्यामध्ये " इन्फोसिस "ची स्थापना केली.बंगरुळमध्ये व्यवसायाचा विस्तार केला.
ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना संकटरुपी अडथळे येतच असतात.मात्र अनेकदा या संकटामध्ये संधी दडलेली असते.ती शोधण्याची गरज असते.संकटप्रसंगी तुमची वर्तणूक कशी असते,अडचणीमध्ये पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यामध्ये तुमच्या यशाचं गमक दडलेलं असतं.
" इन्फोसिसची "स्थापना आम्ही सातजणांनी केली.सुरुवातीच्या काळात एक टप्पा असा आला होता की, सर्वांनी मिळून ती कंपनी विकण्याचं ठरवलं होतं. कारण,वर्षभर मेहनत केल्यानंतर आम्हाला केवळ १० लाख डॉलर्सच मिळत होते,हे आमच्यापुढचं मोठ्ठ संकट होतं. मात्र,मला या कंपनीचं भविष्य दिसत होतं. त्यामुळं मी माझ्या साथीदारांना सांभाळून घेतलं,त्यांना समजावून सांगितलं आणि " इन्फोसिस " विकण्याचा निर्णय रद्द केला.
१९९५ मध्ये " इन्फोसिस "पुढे एक मोठा पेचप्रसंग निर्माण राहिला होता.एका विदेशी कंपनीनं त्यांच्या सेवांसाठीचं मूल्य अचानक कमी करण्याचा निर्णय घेतला. आमच्या एकूण व्यवसाय-उत्पन्नात त्या कंपनीचा वाटा सुमारे २५ टक्के होता.अश्या कंपनीशी करार तोडणं याचा अर्थ एक चतुर्थांश.उत्पनावर पाणी सोडणं, असा होता.त्या प्रसंगापासून एक धडा घेतला. कोणत्याही प्ररिस्थितीत एका गोष्टीवर अवलंबून राहायचे नाही.तुमचा व्यवसाय इतका मोठ्ठा असला पाहिजे की, कोणीही तुम्हाला आदेश काम नये.
नोकरी-व्यवसायामध्ये आपण प्रचंड मेहनत करून धन-दौलत,संपत्ती जमा करतो. मात्र, तुम्ही त्या संपत्तीचे केवळ रखवालदार असता. तेही तात्पुरत्या किंवा अनिश्चत काळासाठी. त्यामुळंच मिळवलेल्या संपत्तीचा खरा आनंद उपभोगायचा असेल,तर त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे.त्यासाठी ज्यांच्याकडे ती नाही, त्यांच्यासोबत वाटून घेतली पाहिजे. आज तुम्ही जी फळ चाखता आहात, ते झाड तुम्ही लावलेलं नाही. त्याच बी तुम्ही अंकुरीत केलेलं नाही. म्हणूनच येणाऱ्या पिढीसाठी बीज पेरणं, रोप लावण आणि ते वाढवणं ही आपली जबाबदारी आहे.
कोणतंही आव्हानं आलं की, आपला सर्वात पहिला प्रयत्न किंवा प्रतिक्रिया हि त्याच्यापासून दूर जाण्याची व टाळण्याची असते.
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:
Post a Comment