बहुतेकांना नव्या गोष्टींचा अवलंब करण्याची भीती वाटते. त्यामुळे वर्षानुवर्ष ते एकच काम करताना दिसतात. आपल्या नोकरीला वैतागलेले अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. दुसर्या कंपनीत काम करावं किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु करावा असं त्यांना मनातून वाटत असतं. पण, हे सर्व प्लॅनिंग त्यांच्या डोक्यातच राहतं.
वर्षानुवर्ष एकाच हॉटेलमध्ये जाऊन तीच ती डिश ऑर्डर करणारे लोकही तुम्ही पाहिले असतील. काही लोक नवे मित्र करायला घाबरतात, ते पार्टीला जात नाही, नवा मार्ग शोधायला ते कचरतात. याची कारणं आणखी काही वेगळी नसून नवीन काम करण्याची भीती वाटणं हे आहे. त्यांना वाटतं की, या कंपनीत काम करत असल्यामुळे येथील काम कसं चालतं हे मला समजलंय. पण, नव्या कंपनीतील काम कसं असेल कोणास ठाऊक? राग आला तर मी नोकरी सोडेन. पण, माझा व्यवसाय चालेल की नाही? नवीन हॉटेलमध्ये गेलो तर ते कसं असेल? नवीन मार्ग शोधायला गेलो तर मला भटकत रहावं लागेल. नवीन मित्र केला आणि तो धोका देणारा असला तर? त्यापेक्षा मी जेथे आहे तेथे असणं चांगलं आहे. जे माझे मित्र आहेत त्यांनाच भेटत राहू, नव्या मित्रांचा अवलंब करायला नको.
चार्लस डिकेन्स यांनी वर्षानुवर्षे एकाच कोठडीत राहिलेल्या कैद्याबद्दल लिहिलं आहे. शिक्षा भोगल्यानंतर त्याला सोडण्यात आलं आणि त्याला तुरुंगाच्या बाहेर आणण्यात आलं तेव्हा तेथील उन्हाने तो हैराण झाला. त्या माणसाने चारी बाजूला पाहिलं आणि आपल्याला मुक्त करण्यात आलं याचं त्याला वाईट वाटायला लागलं. त्या माणसाने पुन्हा त्या कोठडीत जाण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याला स्वातंत्र्य आणि मोकळी हवा याऐवजी कोठडी, हातकड्या यामध्येच सुरक्षित वाटत होतं. याचं कारण वर्षानुवर्ष तेथे राहून त्याला त्याचं व्यसन लागलं होतं. चार्ली चॅप्लीन आपल्याला तुरुंगात पाठवण्यात यावं यासाठी वारंवार चुका करतो. याचं कारण अनोळख्या जगाशी जुळवून घ्यायला त्याला अवघड जात असतं. अनेकदा तो आपल्याला तुरुंगाची हवा मिळावी यासाठी जाणूनबुजून अपराध करत असतो. तुरुंगात त्याच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधनं येत असली तरी तेथे त्याला फार कमी निर्णय घ्यावे लागतात.
थोडक्यात आपला दृष्टीकोन नकारात्मक असेल तर आपलं आयुष्य सीमा किंवा मर्यादांमध्ये कैद आहे. अशा दृष्टीकोनामुळे आपल्याला मर्यादितच यश मिळू शकेल. नव्या गोष्टी करण्याची भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही…!
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment