Wednesday, March 22, 2017

स्मार्टफोनपासून दूर राहा

      ऑफिसच्या मिटिंग, घरगुती समारंभ, मित्रांचे भेटणे असो वा कुठलाही प्रसंग असो या सगळ्यामध्ये आडवा येतो तो आपला स्मार्टफोन.
         काही व्यक्ती स्मार्टफोनमध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की त्यांना वेळ-काळाचंही भान राहत नाही. कारण त्यांना आपला स्मार्टफोनचं सखा सोबती वाटतो. म्हणजे थोडक्यात ते स्मार्टफोनच्या आहारी गेलेले असतात. याचे दुष्परिणाम अनेक आहेत आणि ते वेळोवेळी दिसूनही येतात.
       त्यामुळे स्मार्टफोन पासून दूर राहिलेलेच चांगले किंवा त्याचा वापर कमी असावा...

_*स्मार्टफोनपासून दूर राहायचं कसं काही खास टिप्स...*_

* स्मार्टफोन काळाची गरज आहे आणि तो वापरलाच पाहिजे पण स्मार्टफोन वापरताना त्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. उठता-बसता, खाता पिता स्मार्टफोनचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा.

* आपल्या मोबाईल मध्ये भरमसाट अॅप्स असतात, कित्येकांचा तर आपल्याला काही उपयोग पण नसतो तरी ते अॅप्स आपल्या फोनमध्ये असतात. त्यामुळे शक्यतो नको असलेले अॅप्स फोनमधून काढून टाका. कारण अॅप्सवरील नोटीफिकेशन्स पाहण्यात आपला सर्वात जास्त वेळ खर्च होत असतो.

* संपूर्ण दिवसातील 6 ते 7 तास फोन तुमच्यापासून लांब ठेवा. त्याने हळू-हळू स्मार्टफोनचा वापर कमी होण्यास मदत होईल किंवा झोपताने तुमचा फोन बंद करून ठेवा.

* स्मार्टफोनच्या व्यसनापासून दूर जाण्यासाठी स्मार्टफोनचाच वापर करा. या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत त्याचा वापर करा. 'लॉक न् लोल' अर्थात लॉक युअर स्मार्टफोन अॅण्ड लाफ आऊट लाऊड हे अॅप वापरून स्मार्टफोनच्या व्यसनापासून दूर जाऊ शकतो. तसेच रेसक्यु टाईम (Rescue Time) आणि अॅपडेटॉक्स (AppDetox) ही अॅप्स देखील स्मार्टफोनचा वापर कमी करण्यास मदत करतात.

* वेळ पाहण्यासाठी मोबाईलचा वापर टाळा. त्यासाठी तुम्ही घड्याळ वापरू शकता. वेळ पाहण्यात आपला जास्त वेळ खर्ची पडतो.

* अॅनालॉग फोनचा वापर करण्यास सुरुवात करा म्हणजे ज्या फोनमध्ये बेसीक फीचर असतात तो फोन वापरा. त्यामुळे इतर फिचर मध्ये तुमचा जास्त वेळ खर्ची पडणार नाही.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...