शेअर बाजाराच्या उलढालीचा आणि आपल्या स्वतःच्या हुशारीचा वापर करून काही लोक कसे आणि किती श्रीमंत होतात याचे एक उदाहरण मी खाली देत आहे
( छत्रपती शिवाजी : द मॅनेजमेंट गुरू )
डी मार्ट हे रिटेल स्टोअर चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपरमार्केट कंपनीच्या आयपीओचे शेअर बाजारात लिस्टिंग झाले. २९९ रुपयांचा हा शेअर पहिल्याच दिवशी दुपटीपेक्षाही जास्त म्हणजे ६४१ रुपयांवर गेला.या कंपनीचे मालक राधाकिशन दमानी त्यामुळे अब्जाधीश झाले. पण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नेव्हील नोरोन्हा देखील ९०० कोटींचे मालक झाले.
नोरोन्हा यांच्याकडे या कंपनीचे सुमारे १.३७ कोटींचे शेअर होते.शेअरची किंमत दुपटीपेक्षाही जास्त झाल्याने त्याच्याकडे ९०० कोटी रुपये जमा झाले. नोरोन्हा हे दहा वर्षांपूर्वी हिंदुस्थान युनिलिव्हर या बहूराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. राधाकिशन दमानी यांनी त्यांना डिमार्ट कंपनीत आणले, आणि डिमार्टचा व्यवसाय वाढवण्याचे कार्य त्यांना दिले.
सुपरमार्केट मध्ये खरेदी करणाऱ्या भारतीय ग्राहकांना त्यांनी डिमार्ट कडे आकर्षित केले. त्यामुळे डिमार्टला मोठं यश मिळालं.हि कंपनी असेच यश मिळणार हे लक्षात घेऊन नोरोन्हा यांनी या कंपनीत शेअर खरेदी केले आणि आज ते ९०० कोटींचे मालक झालेत.
यालाच म्हणतात जोखीम उचलण्याचे बक्षीस! ==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment