Thursday, March 23, 2017

23 मार्च :शाहिद दिवस

        देशभक्त आणि क्रांतिवीर यांनी आपल्या देशासाठी स्वत:चे प्राणही द्यायला मागे-पुढे पाहिले नाही. या क्रांतिवीरांचे स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य.
       कारण त्यांच्यामुळेच आपण आपल्या देशामध्ये मुक्तपणे फिरत आहोत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचे योगदान फारच महत्वाचे आहे. या तिघांना ब्रिटिशांनी 23 मार्च रोजी फासावर चढविले.
        या वीरांच्या स्मरणार्थ समस्त भारतीय 23 मार्च हा शहीद दिन म्हणून पाळतात आणि या दिवसाला शहीद दिन म्हटले जाते.
सध्याच्या तरुण पिढीला बहुतांश स्वातंत्र्यवीरांची माहिती नाही. म्हणुनच शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना जाणून घेऊयात...
शहीद भगतसिंग
भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 या दिवशी पंजाबमधील ल्यालपूर येथे झाला. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भगतसिंग यांनी राजगुरु आणि सुखदेव या सहका-यांसोबत बंड केले. ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्स याची हत्या केली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शहीद भगतसिंग यांचे क्रांतिकारी विचार संपूर्ण देशात पसरले आणि देशभक्तीचे वारेच वाहायला लागले. भगतसिंग यांनी केलेल्या हत्येमुळे वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना लाहोर येथील कारागृहात फाशी देण्यात आली.
शहीद शिवराम राजगुरु
राजगुरु यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे 1908 साली झाला. बालपणापासूनच राजगुरु यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. अचूक नेमबाजी, दांडगी स्मरणशक्ती याची त्यांना जन्मजात देणगी होती. सुखदेव, भगतसिंग यांच्या सोबत त्यांनीही जॉन साँडर्सच्या हत्येत भाग घेतला. निर्दयी ब्रिटिश सरकारने राजगुरु यांना भगतसिंग, सुखदेव यांच्यासोबत फाशी दिली.
शहीद सुखदेव
सुखदेव यांचा जन्म पंजाबमध्ये 15 मे 1907 साली झाला. सुखदेव यांचे पूर्ण नाव सुखदेव थापर असे होते. भगतसिंग आणि राजगुरू यांचे सहकारी अशी सुखदेव यांची प्रमुख ओळख होती. जॉन साँडर्सच्या हत्येच्या कटात सहभागी झाल्याबद्दल 23 मार्च 1931 साली सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...