१* ती बिनधास्त आहे,
तिच्या कर्तुत्वावर ती निर्धास्त आहे.
लढेल कोणत्याही संकटांशी,
इतकं तिच्यात धारिष्ट्य आहे.
ती बिनधास्त आहे.
तिचे विचार नवीन आहेत,
तिच्या कल्पनाही नवीन आहेत,
नवीन स्वप्न साकारण्याचे तिचे मार्गही नवीन आहेत.
तिच्या मनात भरारीचे निर्णय तरीही पक्के आहेत,
जरी पंखांवर पुरोगामित्वाचे अरिष्ट आहे.
ती बिनधास्त आहे.
तिच्या कडेही आहे एक स्त्रीमन,
ज्यात दडलंय एक हळवेपण,
जितक्या सहजपणे जाते office ला,
तितकी सहजपणे सांभाळते kitchen पण.
जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच मित्रही आहेत,
modern असली तरी सांभाळते,
जाणीवेने आपुले स्त्रीधन.
मर्यादा ओलांडणार्यांसाठी,
तिच्यावरही चंडीकेचा वरदहस्त आहे.
ती बिनधास्त आहे.
ती थोडी नम्र आहे,
ती थोडी आगावू पोर आहे,
कधी अतिशय शालीन,
कधी दंगेखोर आहे.
घरही सांभाळते, स्वतःसाठीपण जगते,
जाणीवेने सा-या जगाकडे पाहते.
काळजातलं दुःख कधी चेहऱ्यावर आणत नाही,
स्वतःचा आनंद कधी एकटीचा मानत नाही.
चार गोष्टी सांगते कधी आईसारख्या समजावून,
कधी वागते अगदी वेड्यासारखी आपणहून.
अशी तशी कशी कशी पण जशी आहे तशी फार मस्त आहे.
ती बिनधास्त आहे.
...
To all lovely women ... With respect
-------------------------------------
२* जगणं विसरू नकोस...
*"जगणं विसरू नकोस...."*
*"सखे,"*
*जगाकडे रोज नव्याने..*
*बघणं विसरू नकोस....*
*सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस....*
तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील...
त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... १*
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...
कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... २*
तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...
काळजापासून माया तुझी
झरणं विसरू नकोस...
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... ३*
रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....
रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... ४*
तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही....
ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... ५*
कवि: प्रा. गुरूराज ग. गर्दे.
शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता.
पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9422058288
gururajgarde@gmail.com
-------------------------------------
Original Punjabi Poem translated into Many languages Please read Marathi " chithhi "
*(एक अस्वस्थ करणारी कविता)*
*.....चिठ्ठी.....*
*तो फक्त बोलायचा*
*ती फक्त ऐकायची*
*एक खेळ सुरू होता*
*बोलण्या-ऐकण्याचा*
*खेळात होत्या दोन चिठ्या*
*एकात लिहीले होते 'बोला'*
*एकात लिहीले होते 'ऐका'*
*आता हे प्राक्तन होते*
*की फक्त योगायोग?*
*तिच्या हाती यायची तीच चिठ्ठी*
*ज्यावर लिहीले होते 'ऐका'*
*ती ऐकत राहीली*
*कोणाचे तरी हुकूम,*
*कोणाचे तरी उपदेश.*
*बंधने तिच्यासाठी होती*
*तिलाच होते सर्व नकार*
*तिला हेही माहीत होते*
*'ऐकणे आणि बोलणे'*
*या नाहीत फक्त क्रिया.*
*राजा म्हणाला, 'विष पी'*
*ती मीरा झाली.*
*ऋषि म्हणाले, 'शिळा हो'*
*ती अहिल्या बनली.*
*प्रभू म्हणाले, 'चालती हो'*
*ती सीता झाली.*
*चितेतून आली किंकाळी*
*अनेक कानांनी ऐकली नाही*
*ती सती बनली.*
*दबले तिचे गा-हाणे*
*अडकले तिचे शब्द,*
*शिवलेले गेले ओठ..*
*दाटून आलेला गळा..*
*तिच्या हाती मात्र कधीच*
*नाही लागली ती चिठ्ठी*
*ज्यावर लिहीले होते 'बोला'.*
*कवयित्री : अमृता प्रितम्*
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !
आपल्या प्रतिसादबद्दल आपले आभार.
ReplyDeleteसर मि आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे.व मी ही पोस्ट परत आपल्या नावासोबत पोस्ट करत आहे.
सुंदर कविता भाग ७ मध्ये मि जेव्हा ही कविता pubilsh केली.मला माहित नव्हतं की याचे गीतकार/कवि आपन आहात.
सर सूंदर कविता ह्यांच्या पहिल्याच भागात मि नम्रपने कबूल केले आहे की सुंदर कविता या सदरातील कविता मि केलेल्या नाहीत.
आपल्याला प्रतिसाद देण्यास उशीर झाल्याबद्दल मल माफ करा.(आपल्या प्रतिसाद वरुण मला है लक्षात आले आहे की पहिल्या भागात जसे मि सुरुवातीला स्पष्ट केले होते की या सदरातील कविता मी केलेल्या नाहीत है मला या सदरातील प्रयेक भागात नमूद करावे लागेल. मी आपणास खात्री देतो की पुढील प्रयेक सदरात ही चूक दुरुस्त केली जाईल. तसेच आपल्या नावासोबत है भाग पुर्न प्रकाशित करत आहे)