शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी वैयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये अनुदान असेल किंवा विमा असेल अशा प्रकारची मदत केली जाते. काय आहेत योजना जाणून घेऊयात...
(वाचा नवीन लेख: नव्या गोष्टीची सुरुवात करूया)
👉 दुभत्या जनावराचा पुरवठा :
पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी अनुसूचित जाती/जमातीच्या लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांच्या गटाच्या पुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.
👉 शेळी गटाचा पुरवठा करणे :
शेळीपालकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडावी यासाठी अनुसूचित जाती/जमातींच्या लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर 10+1 शेळी गटाचा पुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजने अंतर्गत राबविण्यात येते.
👉 दुधाळ जनावरांचे वाटप :
ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत राबविण्यात येते. यामध्ये केंद्र शासनातर्फे 50 टक्के, राज्य शासनातर्फे 25 टक्के अनुदान देण्यात येते.
👉 दुभत्या जनावरांना खाद्य अनुदान :
दुधाळ जनावरे गट वाटप योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांना भाकड, तसेच प्रगत गर्भावस्थेच्या काळात 100 टक्के अनुदानावर खाद्यपुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.
👉 पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण : ही योजना सर्वसाधारण, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते. पशुपालकांमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वसाधारण पशुपालकांना, तसेच अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभधारकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण देण्यासाठी तरतूद आहे.
👉 सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना :
हि योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येते. राज्यातील 16 सधन कुक्कुट विकास गटांची स्थापन व बळकटीकरण या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री, साधनसामग्री खरेदी व बांधकामावरील खर्चासाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत राबविण्यात येते.
👉 कृत्रिम रेतन सुविधांचे बळकटीकरण :
कृत्रिम रेतन सुविधांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत द्रवनत्रपात्रे खरेदी व यंत्रसामग्री खरेदीसाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.
टीप : अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाकडे चौकशी करावी.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment