Sunday, March 5, 2017

मुलींना विसरू नका

      सध्या सहा महिन्याच्या लहान बाळापासून ते सोळा वर्षाच्या मुला-मुलींना विविध उत्पादनाच्या बाजारपेठांनी आपल्या कवेत घेतलं आहे.या वयोगटातील मुला-मुलींसाठी तेल, साबण, कपडे, खेळणी, एनर्जी फूड्स, झटपट नाष्टा, विविध ज्युस, शीतपेये, यांची रेलचेल झालेली आहे.दूरदर्शन आणि पेपरमध्ये जाहिरातीवर वारेमाप खर्च होत आहे.
         तुमच्या मुलांच्या दातांची काळजी फक्त आम्हीच घेतो, असे म्हणण्यापासून तुमच्या मुलांच्या कपड्यावरील कितीही हट्टी डाग आम्ही एका मिनिटात घालवू म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. परीक्षा जवळ आली तर काळजी करू नका, आम्ही तुमच्या मुलाची समरणशक्ती वाढवून देऊ, अशी गॅरंटी ही ते देतात; पण टॉनिक घेण्याआधीच हल्लीची मुलं तरतरीत डोक्याची झाली आहेत.
गुवाहाटीतील एका नऊ वर्षाच्या मुलीने एका ज्युस उत्पादक कंपनीला चांगलाच घाम फोडला.जाहिरातीमध्ये लिंगभेद केल्याचा आरोप केला तिने. झाले काय, कि तिने त्या कंपनीचा ज्युस प्यायला चक्क नकार दिला. कारण काय तर त्या पॅकेज्डवर शाळेचा गणवेश घातलेल्या एका मुलाचे चित्र छापले होते. तिच्या वडिलांना ती म्हणाली, बाबा हा ज्युस फक्त मुलांसाठी बनवलेला आहे. मी तो पिणार नाही, हे ऐकल्यावर बाबांची ट्यूब पेटली.आपल्या मुलीची तक्रार एकदम योग्य आहे असे त्यांना वाटलं. त्यांनी लगेच तशी  लेखी तक्रार संबधित कंपनीकडे केली.
         कंपनी दखल घेत नाही म्हटल्यावर त्यांनी यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे केली.तेव्हा पाने हलली. आणि कंपनीला शेवटी नमते घ्यावे लागले.त्या कंपनीला आपल्या जाहिरातीवर असलेला लिंगभेदचा आक्षेप खोडून काढता आला नाही. मात्र, आपण येथून पुढे आपल्या जाहिरातीत योग्य तो बदल करू, असे काबुल केले.
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे ठीक आहे; पण त्याची आरती किती करायची? मुलीही तितक्याच कर्तबगार आहेत.जाहिरातीत त्यांना विसरू नका. नाहीतर आपल्या उत्पादनाची विक्री पन्नास टक्क्यांवर घटलोच असे समजण्यास हरकत नाही

-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...