दैनंदिन जीवनामध्ये आता यश मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा करावी लागत आहे .अशा वेळी आपण तयार असं महत्वाचं असत. या स्पर्धेसाठी तुम्ही नेहमी तयार असावं यासाठी आम्ही तुम्हाला एक आठ कलमी कार्यक्रम दिला आहे. तोही भन्नाट आहे.
वाचा, विचार करा, आणि तो अंमलात आणण्याचा प्रयन्त करा. मग बघा....यश नक्की मिळेल.
वाचा, विचार करा, आणि तो अंमलात आणण्याचा प्रयन्त करा. मग बघा....यश नक्की मिळेल.
१. तुमच्या संकल्पाशी बांधील राहा! जर तुम्ही व्यायाम करायचं ठरवलं असेल तर रोज किमान १० मिनिटं तुम्हाला त्यासाठी मिळतील असं बघा.
२. वास्तवाचं भान असू द्या. उगाच रोज टेकडी चढीन म्हटलं की तिसऱ्या दिवशी बुट्टी मारलीच जाईल, हे मान्य करा.
३. स्वत:कडून अति अपेक्षा ठेवू नका. स्वत:ला ओळखून मगच स्वत:वर नियम घाला.
४. स्वत:ला एक कार्यक्रम द्या. नुसतं ठरवून उपयोगाचं नाही. त्यासाठी एखादा कृती कार्यक्रम तयार करा.
५. त्यामध्ये लवचिकता ठेवा. एखादा दिवस काही कारणानं नाही जमलं तर सगळंचं संपलं असं नसतं. पुन्हा सुरू करा. सकाळी व्यायाम करणार असाल आणि वेळ नाही मिळाला, लागली झोप एखाद दिवस तर ठीक आहे. संध्याकाळी जा!
६. वेळोवेळी या संकल्पाची आठवण राहील असं काहीतरी करा. म्हणजे तुमच्या डायरीमध्ये त्याबद्दल लिहून ठेवणं, एखादं पोस्टर करून तुमच्या खोलीत लावणं वगैरे.
७. तुमची प्रगती ट्रॅक करा.
८. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला बक्षीस द्या!!
हे नियम वापरलेत तर बरंच काही जमावं!
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो

No comments:
Post a Comment