Wednesday, March 15, 2017

एकदा वाचा अपोआप शेअर कराल ...

एके दिवशी
मी संध्याकाळी घरी आलो
तर माझी ३ वर्षाची पुतणी
हट्ट करू लागली,
काका माझ्याशी लगेच खेळा.
.
मला फ्रेश व्हायला वेळ हवा होता म्हणून मी टेबलावरील एक मँगझीन घेऊन त्याच्या कव्हर वरील
'जगाच्या नकाशाचे' कातरीने
ब-यापैकी बारीक तुकडे केले
व तिला म्हणालो, अगोदर हा जगाचा नकाशा मला जोडुन
दाखव...? मग आपण खेळुया...!!!
.
मी फ्रेश होऊन चहा सुध्दा घेतला नव्हता तेव्हा ती आली व म्हणाली
काका मी जगाचा नकाशा जोडला.
मी म्हणालो चल ...!!!
कसं शक्य आहे......???
ती म्हणाली चला दाखवते.
.
मी पुन्हा म्हणालो,
अगं कसं शक्य आहे....???
तुला अजुन कुठला देश कुठे आहे,
हे सुद्धा माहित नाही.
.
तेव्हा ती म्हणाली,
सोप्पं आहे.
त्या नकाशाच्या मागे
एका माणसाचे चित्र होते
आणि
माणुस जोडणं सोप्पं आहे ना...!!!!
मी फक्त माणुस जोडला.....!!!!!
आपोआपच जग जोडले गेले.
.
- खरच किती सोप्पं आहे नाही?
आपण फक्त माणसं जोडायची
जग आपोआप जोडले जाईल...!!!!
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.in वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...