Sunday, September 10, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग २८ )

हामानवांना जातीच्या चौकटीत बांधून ठेवायची वाईट खोडं समाजात नित्य असते. शिवाजीराजा हा मराठ्यांचा , बाबासाहेब हे दलिंतांचे / बौध्दांचे , टिळक हे ब्राम्हणांचे असे बरेच वंगाळ प्रकार चालू असतात. महामानवांवर हा अन्यायच असतो. माणूस आपल्या असामान्य कतृत्वाने महामानव बनतो आणि तसा बनतानाच आपल्या जीवनात अशी अनेक उदाहरणे पेरून ठेवतो की त्याला जातीबध्द व्यवहार करायची चिडं आहे. अशी उदाहरणे वारंवार समाजापुढे ठेवावी लागतात. कारण त्यातूनच सर्व समाजाचे प्रेरणास्थान म्हणून महामानव लक्षात राहतो , फक्त एका जातीचा म्हणून नव्हे . अशीच एक गोष्ट शाहूचरित्र मधील...

*१९२० सालची गोष्ट ..सोनतळी कँपवर बडोद्याचे एक बडे मराठा समाजातील गृहस्थ पाहुणे म्हणून आले होते. जेवण तयार होते. भोजनास सर्वजातीचे लोक एकाच पंक्तीत बसले होते. बडोद्याचे पाहुणे बोलले " महाराज , आपण अस्पृश्याची चळवळ चालू केली आहे ती सोडावी. आपला मराठा समाजच इतका मोठा आहे की , केवळ मराठ्यांच्या उन्नती करता चळवळ हाती घेतली तरी महाराजांचा खजिना पुरणार नाही . मग अस्पृश्योध्दार चळवळ कशासाठी ?? शाहूराजा स्पष्ट बोलला " मी केवळ मराठा समाजासाठी चळवळ केली व दुसऱ्या उपेक्षित समाजांकडे दुर्लक्ष केले , तर मला मराठ्यांचा राजा म्हणतील , कोल्हापूरचा राजा म्हणणार नाहीत " यावर बडोद्याचे पाहुणे निरुत्तर झाले.......काय समजते हो यातून ?? राजा हा सर्वांचा प्रतिनिधी असतो. ज्या जातीत तो जन्माला आला त्यांच्याच उत्कर्षात तो गुरफटला तर मग तो एका समाजाचा प्रतिनिधी ठरेल , संपूर्ण समाजाचा नव्हे. याचे अचूक भानं शाहूराजाला होते. म्हणून तर सर्वजातीय उध्दाराकरता कायम झटत राहीले. स्वतः शाहूराजानेच आपण जातीच्या चौकटीत स्वतःला डांबून घेऊ इच्छित नाही याचे स्पष्ट उदाहरण घालून दिले.*

आजकालच्या लोकप्रतिनीधी अथवा संस्था - संघटना यांचे नेते म्हणवणारे यापासून काही शिकतील का ?? जातीविलयातून जातीअंत घडत असतो. आपल्या जातीसाठीच केवळ काम करणे म्हणजे जातीव्यवस्था बळकट करणे. आपल्या समाजाकरता काम करता करता इतर समाजबांधवांच्या प्रगतीसाठी आपला हात पुढे करणे म्हणजे जाती निर्मूलन दृष्टीने एक पाऊल टाकणे होय. सगळे महामानवांच्या चरित्रतून हेच तर कळत असते...मग शाहूचरित्र दुसरे काय सांगते.

*!! चौकटी जातीच्या मोडायच्या असतात , जातीपलिकडील भावकी जोडायच्या असतात !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...