गुणांची कदर करता आली पाहिजे तरच कलावंत सन्मानित होत असतो. ही कदर जेव्हा राजा असणाऱ्या व्यक्तीकडून होते तेव्हा कलावंत नैसर्गिकच जास्त सुखावतो. कारण त्याला राजमान्यता मिळालेली असते. पणा यातली खरी मेख अशी की , राजमान्यता मिळविण्यासाठी खुशमस्करी करणारा कलावंत असला तर तो कलावंत नावाला खरा उतरत नाही. घेणाऱ्याचे व देणाऱ्याचे माप एकच,असावे तरच समतोल साधला जातो. कलावंत आपल्या कलेने मानवी जीवनात विविध रंग भरत असतात . राज्यकर्ते वर्गाला या कलावंताची खरी श्रीमंती कळली तरच ती कला सफल झाली असे म्हणता येते. शाहूचरित्र वाचताना एक गोष्ट लैलै आवडली. तुमच्या करता ......
*आबालाल रहमान...हे थोर चित्रकार . एकदा ते आजारी पडलेले असताना या थोर कलावंताची विचारपूस करायला शाहूराजा गेले. आपल्या मिश्कील पध्दतीने जाणीवपूर्वक रस्त्यावर थांबून हाका मारत राहिले. या हाकांनी तापाने फणफणलेले आबालाल भांबावून जिना उतरुन खाली आले. समोर महाराजांना पाहताच खाली वाकून मुजरा केला. शाहूराजानेही आबालालना मुजरा केला. चौकशी करून डाँक्टर पाठविण्याची व्यवस्था केली. पण महाराजांच्या सोबत असणाऱ्या परिवारातील एका सदस्याने महाराजांनी आबालालला केलेला मुजरा आवडला नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात ही नाराजी बोलून दाखविली. एका फाटक्या पेंटरला महाराजांनी मुजरा करावा हे रितीरिवाजाला धरून नाही अशी तक्रार त्यांनी केली. शाहूराजा अत्यंत शांतपणे बोलले " ही कलावंत मंडळी माझ्या राज्याची शान आहेत. त्यांच्यामुळे माझ राज्य मोठ झालं. नावलौकिकाला गेल आहे. म्हणून हा मुजरा त्या फाटक्या पेंटरला नाही तर त्यांच्या कलेच्या उच्चतम अधिष्ठानाला आहे "......पाहिलत का मंडळी . एका संस्थानाचा राजा किती नम्र असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. आज कोल्हापूर म्हणजे कलापूर असे जे म्हटले जाते त्याचे खरे कारण म्हणजे शाहूराजाने या कलावंत मंडळीचा केलेला योग्य व याथोचित सन्मान होय. महाराजांचे दोन प्रेमाचे शब्द आणि कला जपणारी कृती या दोन गोष्टीमुळे मोठमोठे कलावंत कोल्हापूरला आले अन् इथलेच होऊन गेले. कोल्हापूर अशा रितीने बहराले. यामगे आहे ते शाहूराजाची कलेरती निर्मळ व आदरभावाची नजर.*
लोकहो , ते आबालाल होते न् तो शाहूराजा होता म्हणून कला व कलावंत यांचा सन्मान राखला गेला. आजकलचे कलावंत व राज्यकर्ते हे दोघेही स्पष्ट बोलायचं तर असा आदर्श जपू शकत नाहीत. कारण त्याकरिता लागते ती एक कलावंत म्हणून कलेची प्रतिष्ठा जपणारा कलावंत आणि त्या जपणुकीची जाणीव ठेवून कलावंताशी सन्मानपूर्वक कृती करणारा शाहूराजा. आजकाल हे दृश्य दुर्मिळातील दुर्मिळ आहे. कला व कलावंत हे राज्याची शान असतात , त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते , तरच कला विविधांगी बहरते. ....शाहूचरित्र हेच तर सांगते.
*!! जपावी कलेची शान....कलावंत असतो महान !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment