Wednesday, September 20, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३३ )

राजा हा " उपभोगशून्य " स्वामी असतो असे म्हणतात. जगभरच्या राजेशाहीचा इतिहास मात्र या वाक्याशी विसंगत असा आहे. सन्माननीय अपवाद वगळता हे वाक्य कधीच खरं नव्हते. राजेशाहीने जनतेला खूशाल लुटावे आणि जनतेने राजा हा विष्णूरुप मानून स्वतःला लुटवत रहावे असेच चित्र सर्वत्र होते. म्हणून तर राजा आणि राजेशाही म्हटली की आठवते ते उंची शौक व ऐशोरामी वृत्तीचे जगणे. आपण जनतेच्या पैशाचे विश्वस्त आहोत हा विचार कधीही राजेशाहीने आचरणात आणला नाही. जे सन्माननीय अपवाद होते त्यामध्ये शाहूराजा हा खूप वरच्या क्रमांकवर होता. पाहूया अशीच एक घटना...

*रायबाग ..मुक्कामी असताना हैद्राबाद नवाबाचे पत्र घेऊन एक रसोईवाला महाराजांकडे आला. महाराजांच्या पदरी राहणेचौया इच्छेने नबाबाचे ओळखपत्र घेऊन तो आला होता. महाराजाकडे स्वयंपाक करण्याची परवानगी त्याने मागितली. महाराजांनी आज्ञा केली. आचारीला लागणारे सर्व सामान , मटण , मसाला पुरविले गेले. मोठ्या हौसेने रसैईयाने मोगली ऐश्वर्यसंपन्न पदार्थ बनवले. महाराज जेवायला बसले. बरोबरीचे सर्व सरदार मुक्तकंठाने जेवणाची स्तुती करत होते. महाराज थोडे जेवले आणि मग म्हणाले " जेवण चांगले केलंसा. आम्ही तुमच जेवण जेवलो. आता आम्ही आमच जेवण जेवतो. त्याशिवाय पोट भरायच नाय " सारे आश्चर्याने पाहू लागले. महाराजाचे जेवण आणले गेले. ताटात भाकरी , खर्डा , तांबडा रश्शयाची वाटी एवढेच जेवण होते . महाराजांनी आनंदाने जेवण घृतले. दुसऱ्या दिवशी आचारीला बोलवून मानाचा फेटा व ५०० रुपये दिले. स्पष्ट सांगितले " तुम्ही नवाबाच्या घरचे स्वयंपाकी. तुम्हाला ठेवून घेणे परवडायच नाही. तुम्ही दुसऱ्या राजाकडे जावा " निराश होऊन आचारी परतला. सरदार अस्वस्थ झाले. त्यांनी महाराजाना विचारले " महाराज , एवढे लाखाचे पोशिंदे आपण , एक आचारी आपल्याला जड आहे का ?" ..महाराज बौलले ते अधिक महत्त्वाचे आहे. महाराज बोलले " सरदारानो , काल त्या रसोईयाची सामानाची यादी पाहिली का ? ते मला परवडेल पणा मग तुम्ही कुठं जाशीला ? अरे , गरीबांचा राजा हाय मी. असलं नबाबी चोचलं आम्हाला परवडायच नाही ".....काय बोध होतो यातून ?? आपण कितीही श्रीमंत असलो तरीही आपण त्या संपत्तीचे विश्वस्त आहोत ही जाणं महाराजांना होती. राजाने आदर्श घालून द्यायचा असतो हे प्रत्यक्षात शाहूराजाने दाखविले. राजाची जीभ चोचले पुरवणारी नसावी तर आपल्या जनतेच्या सुखदुःखाची काळजीने ओतप्रोत हृदय असावे. शाहूराजाचे हृदय असे उदार होते.*

आजकालचे आमच्या राज्यकर्ते वर्गाला या घटनेपासून पुष्कळ शिकता येईल. उपभोग..उपभोग ..आणि उपभोग हेच जणू यांचे जीवीतकार्य झालेय. हे योग्य नाही. शाहूराजा प्रमाणे उपभोगशून्य स्वामी म्हणून गौरविले जावे असे कार्य यांच्या हातून घडावे. मालक बनून राहणेपेक्षा सेवक बनून जनतेच्या हृदयात कायमचे विराजमान व्हा...शाहूचरित्र हेच तर सांगते.

*!! जनतेचा जिंका विश्वास ...जनहिताचा अखंड घ्यावा ध्यास !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६४
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...