Tuesday, September 12, 2017

शाहूचरित्र ....काय शिकवते ?? ( भाग २९ )

आत्मस्तुती...हा एक भयानक आजार आहे. बहुतांशी लोकांना त्याने विळखा घातलेला असतो. भोवताली खूशमस्करी लोक गोळा करून स्वतःची टिमकी वाजवत बसणे हे एक व्यसनच बनलेले असते. त्यात जर व्यक्ती राजा असेल तर मग काय विचारावे ? राजाची स्तुती करून आपल्या पोटपाण्याची सोय करणारे महाभाग ढिगभर भेटतात. राजे लोकांना खूश करण्यासाठी अनेक युक्ती लढवले जातात. चरित्र लिहिणे हा देखील बरेचदा असाच खूशमस्करीचा भाग असतो. शाहूराजा याबाबतीत अत्यंत दक्ष माणूस . त्यांच्या जीवनातील घटनाच याचा पुरावा...

*शाहूराजाचे चरित्रकार बी.एल.पाटील हे महाराजाकडे आले. " महाराज , मी तुमचे चरित्र लिहिणार आहे , त्याला परवानगी असावी " असे बोलले. महाराज स्पष्ट पण रोखठोक बोलाले की , " माझे चरित्र लिहावयाचे असेला तर ते मी मेल्यावर लिहा. कारण त्यावेळी माझ्या गुणदोषांचे विवेचन तीम्हास मोकळ्या मनाने करता येईल. त्यापासून मग लोकांना चांगला धडा मिळेल " महाराजांच्या मृत्यूनंतरच त्यांचे चरित्र लिहिले गेले......गोष्ट छोटी आहे पण आशय मोठा व कृतीत बाणवण्यासारखा आहे. एक राजा इतका प्रांजळपणे व नम्रपणे स्वतःच्या गुणदोषाविषयी भाष्य करतोय हे खरोखरीच अचंबित करणारे आहे. इतका तटस्थपणा हा एखाद्या प्रकांड योगी असणाऱ्या व्यक्तीलाच शोभतो. शाहूराजा हा असाच निर्लेप मनाचा योगी होता. आपल्या हयातीत केवळ आपली स्तूतीच गायली जाईल व दोष मागे राहतील आणि यामुळे लोकांना शाहूराजा कळणार नाही हे जाणूनच महाराजांनी आपल्या चरित्रकारांना सूचना केली व ती अंमलातही आणली.*

मला नेहमीच या गोष्टीचे आश्चर्य वाटतय की...ऐश्वर्य ओतप्रोत भरलेल्या महालात जन्माला येऊनही शाहूराजा हा इतका निर्लेप कसा काय जगू शकला ?? भारतातील शेकडो संस्थानिकांच्या मांदियाळीत शाहूराजा आपले आगळेवेगळै चरित्र का निर्माण करु शकला आणि समाजात कायमचा सन्माननीय कसा होऊ शकला यासाठी शाहूचरित्र परायण गरजेचेच आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे आणि स्वतः बरोबर आपल्या इतर बांधवांचा कळकळीने विचार करावा...शाहूचरित्र हेच शिकवते हो.

*!! स्तूतीपाठकांचा गराडा पडला....की मग माणसातील माणूस संपत जातो !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...