Monday, September 25, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३५ )

कोणत्याही राजाला स्वतःचा एक धर्म असतो. राजा हा सुध्दा आपल्या सारखाच हाडांचा माणूस असतो. आपल्या सारख्याच बरेच प्रमाणात त्यालाही भावभावना असतात. परंतु एक महत्त्वाचे असे की , आपण रयत,म्हणून केलेली वैयक्तिक कृती आणि राजाने केलेली वैयक्तिक कृती यामध्ये अंतर असते. कारण राजाची कृती ही बहुतांशी वेळा सार्वजनिक कृती ठरत असते. रयत राजाच्या कृती बरेच प्रमाणात जमेल तसे अनुकरण करते. यासाठीच राजाचे एक खास कर्तव्य असते ते असे की त्याची दृष्टी ही निकोप व सर्वाना समान न्याय करणारी असावी लागते. यात थोडी जरी गडबड झाली तरी राज्यातील महत्त्वाचे समुह रसातळाला जाऊ शकतात. विशेषतः धार्मिक बाबतीत राजाचे धोरण हे काटेकोरच असावे. जसा आपला धर्म आपणांस प्यारा असतो तसेच दुसऱ्या धर्मातील लोकांना त्यांचा धर्म प्यारा असतो हे सार्वजनिक वास्तव समजले की बरेच गोष्टी साधता येतात. शाहूचरित्र वाचताना काही आवर्जून सांगाव्यात अशा गोष्टीतील ही एक गोष्ट ...

*परधर्मसहिष्णूता....हा राजाचा मुख्य गुणधर्म असायला हवा. शाहूराजाने जशी जातीची वसतीगृहे बांधली तसेच एक महत्त्वाचे असे मुस्लिम बौर्डींग बांधले. त्यासाठी जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च केले. या एकमेव बोर्डींगचे शाहूराजा हा अध्यक्ष होते. मुसलमानाचा धर्मग्रंथ कुराण. कुराण हे केवळ मुस्लीमाकरता राहू नये तर मराठी वाचकानाही समजावे म्हणून महाराजांनी कुराणाचे मराठी भाषांतर करून घेतले. यासाठी २५००० खर्च केले. भाषांतरासाठी हकीम भोरेखान , अब्दुल इनामदार , गुलाम महमुद मास्तर व एक मौलवी यांची कमिटी नेमली. कल्लाप्पा निटवे यांच्या जैनेंद्र प्रेसला छपाई काम दिले होते. मुसलमानाचे वक्फ ( देवस्थान उत्पन्न ) त्यांच्या जमातीकडे एका अटीवर दिले होते . ती अट म्हणजे वक्फमधून योग्य तो धार्मिक खर्च करावा व नंतर उरलेला त्यांच्याच जमातीच्या शिक्षणकरता खर्च करावा. या पध्दतीने दरवर्षी पंधरा हजार रुपये या समाजाला मिळत....मुसलमान समाजाच्या हिताकरता कोणत्याही प्रकारचा दुजाभाव महाराजांनी कधीच केला नाही. हिंदू मुस्लिम सलोखा कायम रहावा यासाठी महाराज कायम दक्ष होते. त्यांच्या या प्रयत्नामुळेच कोल्हापूरला हिंदू मुस्लिम ऐक्य साधता आले आहे. महाराजाचे हे धोरण देशपातळीवर राबवले असते तर आजसारखा हिंदू मुस्लिम संबंध तणावाचा खचितच राहिला नसता.*

राज्यकर्ते वर्गाची ही जबाबदारी असते की त्याने सर्वाना समान छत्र धरायचे असते. धर्मावरुन प्रतिडाव खेळणे हे अविवेकाचे लक्षण असते. स्वतःच्या धर्माबाबतीत योग्य अभिमान जरुर बाळगा पण इतरांच्या धर्माचाही यथोचित सन्मान करावा....शाहूचरित्र हेच तर शिकवते.

*!! धर्माचा अभिमान असावा पण अहंकार नसावा !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...