Friday, September 15, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३० )

परप्रांतीय माणूस म्हटला की आजकाल बरेच लोकांच्या डोक्याच्या शिरा उठतात. आम्ही येथील भुमिपुत्र आहोत , म्हणून आमचा हक्क पहिला अशी भुमिका घेऊन राजकीय पक्ष व काही संघटना कार्यरत असतात. आपण जरी कोणत्या प्रांताचे भुमिपुत्र असलो तरी पहिल्यांदा आपण असतो ते भारतपुत्र . ही व्यापक जाणीव सर्वथरात वेगवान झाल्याशिवाय राष्ट्र बनू शकत नाही. परप्रांतियांना टारगेट करत आपला राजकीय अजेंडा पुढे नेणारे लोकांना शाहूराजाची ही गोष्ट मार्गदर्शक ठरु शकेल असे वाटते. ...पाहूया

*मल्लविद्या ...या प्रकाराला कोल्हापूर नगरीने अक्षरशः वाहून घेतले होते असा तो काळ. महाराज मल्लांमध्ये दुजाभाव करत नसत.,आपल्या राज्यातील मल्लांची जितकी काळजी घेत तितकेच काळजी परप्रांतीय मल्लांचीही घेतली जाई. परप्रांतीय मल्लांनाही शाहूराजाची आस्था व प्रेम जाणवत होते. असेच एकदा १९११ साली दिल्ली येथे दरबार भरला होता. झाडून सगळे संस्थानिक हजर होते. याप्रसंगी कुस्तीचे मैदान होणार होते. सगळे राजेरजवाडे स्थानापन्न हौताच शाहूराजाही येऊन बसले. तितक्यात एक बुरुजबंद वृद्ध मल्ल शाहूराजाला त्रिवार वंदन करु लागला. पंजाबचा प्रसिद्ध मल्ल चंदन यानी तो मुजरा केला होता. या मानाच्ता मुजरेनंतर भारतीय किर्तीच्या श्रेष्ठ मल्लांची झुंबडच शाहूराजाला वंदन करणेसाठी उडाली. महाराजांचे आसन उचलून मैदानाच्या लगोलग नेऊन ठेवले गेले. एवढा मानमरातब सर्व राजेरजवाड्यामध्ये केवळ शाहूराजाला मिळाला. ....याचे कारण काय असावे ?? कारण असे की , समाज कृतज्ञ असतो. ज्या परप्रांतीय मल्लावर शाहूराजा प्रेम करत होता , कसलाच भेदभाव करत नव्हता , त्या मल्लानी शाहूराजाची अखंड मुर्ती आपल्या हृदयात जपून ठेवली होती. म्हणून तर दिल्ली सारख्या ठिकाणी , सर्व राजेरजवाडे बसले असताना मानाचा मुजरा केला गेला तो शाहूराजाला आणि आसनही उचलून ते मैदानाजवळ आणले गेले. परप्रांतीय मल्लांनी आपल्या उपकारकर्त्याला दिलेली ती सन्मानाची वंदना होती. प्रेम दिल्यावर प्रेम मिळते हा जगाचा इतिहास आहे. भुमिपुत्र ही संकल्पना मोठी व महत्त्वाची आहेच यात वाद नाही परंतु भारतपुत्र ही कल्पना त्याहीवरची आहे एवढे ध्यानात असू दे.*

आजकालचे आमचे काही राजकीय नेते आपापल्या प्रांतात ' शेर ' असतात. परंतु हा शेर कधीच आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन डरकाळी फोडू शकत नाही . कारण त्या परिघाबाहेर त्या त्या प्रांताचा ' एक शेर ' उभा असतो. अशा हद्दितल्या शेरांची आजकाल चलती आहे. पण लक्षात असूदे शाहूराजा सारखा माणूसच आपल्या योग्य व विधायक वर्तनाने भारतभर निर्भीडपणे संचार करु शकतो व प्रेम मिळवू शकतो. कारण तो हद्दीतला शेर नसतो तर तो सर्व मानवजातीच्या हृदयाताला शेर असतो. " सारे भारतीय माझे बांधव आहेत " प्रतिज्ञेतील हे वाक्य शाहूराजा नेहमीच आचरत होता अन् म्हणूनच त्याचे पाय धरण्याकरता जनता सरसावत होती. प्रेम व विश्वासानेच माणूस माणसाशी जोडला जातो...शाहूचरित्र हेच तर सांगते.

*!! पोट प्रत्येकाला असते व जगायचा अधिकारही प्रत्येकालाच असतो...हे सत्य जाणून सर्वाबरोबर व्यवहार करावा !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...