Sunday, September 3, 2017

शाहूचरित्र ....काय शिकविते ?? ( भाग २५ )

राज्यकर्ते वर्ग जरी सत्ता हाती राखत असला तरी ती सत्ता प्रामुख्याने चालते ती प्रशासनातील लोकांच्या कामावर. राजा निर्दयी असला तर मग प्रशासनाचि मुजोरी कुणी विचारावी ? जणू आपणच राज्यकर्ते आहोत अशा थाटात सारा व्यवहार चालू असतै. राजा जर आळशी व बिनघोर असला तर मग प्रश्नच नाही. रयतेने दोन्ही हाताने ठोकत बसण्याशिवाय उपाय नसतो. पण राजा जर कार्यक्षम असला तर तो स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनावर आपली पकड ठेवतो. त्यातुनही काही कामचुकार निघले की मग त्यांच्यावर राजाची वक्रदृष्टी ठरलेलीच. शाहूराजा हा कार्यक्षम राजा होता. त्यांनी एका अधिकाऱ्याला कसा धडा शिकवला हे पाहण्यासारखे आहे.

*बाळासाहेब गायकवाड ..हे महाराजांच्या विशेष मर्जीताले.महाराज गायकवाडांशी नोकर या नात्यापेक्षा मित्र या नात्याने वागवित. गायकवाड एकदा कचेरीत असताना त्यांना घेऊन बाहेर जायच म्हणून महाराज कचेरीत गेले. पण आपण फारच कामात आहोत हा ढंग आणण्यासाठी त्यांनी महाराजांना तिष्ठत बसवले. थोड्या वेळानं बाहेर येऊन " फार कामे होती महाराज . प्रत्येक काम बघितल्याशिवाय सही करता येत नाही " अस सांगू लागले. महाराज हे सारे कारकुनी डावपेच माहिती असणारे होते. दुसऱ्या दिवशी महाराजांनी गायकवाडांच्या हाताखालच्या कारकुनाला एकटेच बोलवले आणि सह्यांच्या कामात एक कागद ढकलून यांवर सही घेऊन यायला सांगितलं. कारकुनाने काम फत्ते केले. गायकवाड महाराजांकडे येताच महाराजांनी तो अलगद ढकललेला कागद बाहेर काढला की ज्यावर गायकवाड यांनी सही केली होती. तो कागद बीभत्स लावण्यांचा होता.....काय शिकावे बरं यातून ?? मित्रत्वाचे नाते असले तरीही आपल्या अंगीकृत कामात जो कामचुकार वागतो त्याला धडा कसा घालून द्यावा याचे हे उत्तम उदाहरण आहे. अधिकारी वर्गाची चापलूसी , कामाचे ढिग उपसत असल्याचा बहाणा , काम करुन करुन पुरते थकून गेल्याचे नाटक आदी गोष्टी जर राजाला ठाऊक नसाल्या तर अधिकारी मुजोर होतो व जनकल्याण साधू शकत नाही . अशा अधिकाऱ्यांना वेळीच जागा दाखवावी लागते. कारण अधिकार कुचकामी तर प्रशासन बेफिकीर , प्रशासन बेफिकीर तर जनता उघड्यावर , जर जनता उघड्यावर तर राजाने कसला ढोल वाजवावा ?? याकरिताच वेळोवेळी प्रशासनाची कसोटी पहावी लागते.*

आपल्या आजकालचे राज्यकर्ते एकेकदा असा आव आणतात खरा. " मंत्री महोदयांची अचानक भेट " असा एक मथळा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये झळकतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा येरे माझ्या मागल्या हा अनुभव सर्वसामान्य लोकांच्या वाट्याला येतो. असे का होते ?? कारण हे की शाहूराजा व आजकालचे राज्यकर्ते यांच्यातील मुलभूत फरक. शाहूराजाच्या पाठी त्याची रयत अखंड उभी होती. रयातेचा राजावर विश्वास होता. अन् राजाला हा विश्वास कायम ठेवायला हवा याची यथार्थ जाण होती. म्हणून तर गायकवाड सुधारु शकले. आजकालच्या राज्यकर्ते वर्गाबद्दल रयतेची ही विश्वासाची भावनाच गायब झालीय. परिणाम ...समौर आहे. म्हणून राजा असणाऱ्या प्रत्येकाने जनतेच्या विश्वासाला कायम पात्र राहण्यासाठी दक्ष असावे लागते ...शाहूचरित्र हेच तर शिकवते

*!! जनकल्याणाची आस असेल जर हृदयात..जनता ठेवेल तुम्हाला आपल्या काळजात !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...