शाहूराजा हा लोकराजा म्हणून का संबोधिला गेला याची अनेक उदाहरणे शाहूचरित्र वाचताना आढळतात. शाहूराजाची सहृदयता हा एक पी.एच.डी. संशोधनाचा विषय ठरावा . कारण या सहृदयतेत जनतेप्रती अमाप प्रेम आहे. खात्रीने इतके म्हणता येईल की जगाच्या पाठीवरील इतर कोणत्याही राजांपेक्षा सर्वाधीक सहृदय राजा कोणता असा प्रश्न विचारला तर शाहूराजा हेच उत्तर हमखास द्यावे लागेल. ज्यांना याबाबतीत थोडी शंका वाटते त्यांच्या करता खालील गोष्ट महत्त्वाची ठरावी.
*शाहूराजा ..हा आपल्या रयतेच्या सुखदुःखात पूर्णपणे विरघळलेला अथवा सामावून गेलेला होता. मुंबईला जाऊन आल्यावर महाराज अस्वस्थ होते. जवळच्या लोकांना स्पष्ट बोलले " मुंबईची दुसरी बाजू मी पाहिली. किती हालअपेष्टात लोक राहत बिचारे ! ना घर ना दार , ना आसरा , कुणी फुटपाथवर पडलय तर कुणी कापडाचे काँट करुन रस्त्यावर पडलेत. कुणी दुकानाच्या फळ्यांवर झोपलेत. हे पाहून मला माझ्या ऐश्वर्याची लाज वाटू लागली आहे ". किती मानवतावादी विचार ...पण महाराज एवढं बोलून थांबले नाहीत तर " मी सुध्दा आता काथ्याचे काँट आणि कांबळी घेऊन झोपायच ठरवल आहे. तेव्हा प्रत्येक कँपात तशी सोय करा " अशी थेट आँर्डरच दिली. साधे काँट तयार करुन त्यावर झोपायला सुरुवातही झाली . महाराजांचे हे कृत्य न पटून गुंडोपत पिशवीकर हे गृहस्थ महाराजांना बोलले " हे राजाला शोभते काय ? ज्यान त्यान आपल्या पायरीनं वागायला पाहिजे " . महाराजांनी लगेच डाकवे नावाच्या मेस्त्रीला बोलवल आणि म्हणाले " कैद्यांना आत्ताच बोलवून घ्या आणि माझ्या बसायच्या जागेपर्यतच्या सगळ्या पायऱ्या काढून टाका. ही पायऱ्याची ब्यादच काढून टाकायला पाहिजे ". ....या गोष्टी वर काय भाष्य करावे ? जनतेच्या हालअपेष्टा बघून जो राजा स्वतः हे हालआपेष्टा भोगायची तयारी करतो त्याला राजर्षी हे नाव योग्यच नव्हे काय ? सारे ऐश्वर्य पायाशी लोळत असताना आपल्या गोरगरीब रयतेच्या डोळ्यांत असणारी आसवे जो राजा आपल्या हृदयात जपून ठेवतो तो " लोकराजा " का नाही होणार ?? जगाच्या पाठीवर असे उदाहरण आहे ???*
लोकहो...राजे बहुत झाले . बहुसंख्य दृष्टच झाले. अपवादात्मक म्हणून जे काही रयतेच्या हिताकरता स्वतःला वाहत होते अशा राजांच्या मांदियाळीतही शाहूराजा आपली वेगळी छाप सोडतो. आपल्या राजेशाहीची वस्त्रे कायमची नाहीत तर आपण करणारे लोककार्यच नंतरच्या काळात मोलाचे ठरेल याची यथार्थ जाणं शाहूराजाला होती. जनता म्हणजे सर्वस्व हे ज्या नायकाला कळते तो नायक जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळवतो....शाहूचरित्र हेच शिकवते.
*!! जनतेत सामावून जाणे...म्हणजे रयत होऊनच जगणे..शाहूराजा जगला असा..म्हणून अभिमान वाटे त्याचा !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment