Saturday, September 23, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३४ )

राजा म्हणून जगणे हे जेवढे ऐश्वर्याचे असते त्याच्या उलट सुधारक म्हणून जगणे हे फारच आव्हानात्मक असते. विशेषतः ज्यावेळी तुम्ही समाजाच्या केंद्रभागी असता तेव्हा तर फारच जोखमीचे असते. तुमच्या प्रत्येक हालचालीवर समाज बारीक लक्ष ठेवून असतो. मोठ्या माणसाची जगणी म्हणून तर जास्त आव्हानाचे ठरत असते. शाहूराजा हा असेच आव्हान घेऊन जगणारा सुधारकवादी राजा होता. जेव्हा प्रत्यक्षात आपल्यावर सुधारणाची वेळ येते तेव्हा कचखाऊ भुमिका न घेणारा होता. म्हणून तर शाहूराजा लोकराजा ठरला. त्यांच्या जीवनातील ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर ठेवतोय....

*इंदूमतीदेवी...ह्या शाहूराजाच्या सूनबाई. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी विधवा झालेल्या. युवराजाच्या मृत्यूचे दुःख शाहूराजा सोसत होता. त्यातूनच त्यांनी आपल्या सहकारी लोकांशी चर्चा करून इंदूमतीदेवीना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला . त्याकाळी शिक्षण हे स्त्री वर्गाला वर्ज्य समजले जायचे. त्यातही राजघराण्यातील स्त्रीचे नखसुध्दा लोकांच्या नजरेला पडत नसे. साहजिकच शाहूराजाना या निर्णयाकरता खुद्द कुटुंबातूनच विरोध सुरु झाला. घरच्या मंडळीनी विरोध म्हणून महाराजांना मुजरा करणे बंद केले. ही नाराजी शाहूराजाने ठामपणे स्विकारली. जातीनिर्मूलनाची दिशा इंदूमतीदेवीना मिळावी म्हणून शाहूराजाने एका ख्रिस्ती मैत्रीणचे वडील वारले तेव्हा विचारपूस करण्यासाठी मुद्दाम इंदूमतीदेवीना पाठवले. वेळोवेळी इंदूमतीदेवीना पत्र लिहून महाराज त्यांना इतर संस्कारीक शिक्षण स्वतः देत . त्यांची बुद्धीमत्ता पाहून त्यांना डाँक्टर बनवायची महाराजांची इच्छा होती. याकरिता दिल्ली येथे बंगला खरेदी केला. स्वतःच्या मृत्यूपत्रात इंदूमतीदेवीना दागदागिने , पैसे , निर्वाहाची व निवासाची कायमची सोय याची तजवीज शाहूराजाने केली. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंदूमतीदेवीना शिकवायला जे शिक्षक भार्गवराम कुलकर्णी यायचे ते तापट व विक्षिप्त होते. त्यांच्या स्वभावाची जेव्हा शाहूराजाला कल्पना दिली गेली तेव्हा शाहूराजा म्हणाले " माझ्या सूनेला जोवर ते उत्तम विद्या देत आहेत तोवर माझा मान त्यांनी राखला नाही तरी चालेल. उलट मीच त्यांना नमस्कार करीन".....शाहूराजाचे उदार अंतकरण प्रकटणारे हे बोल आहेत. आपल्या विधवा सूनेच्या उत्कर्षाकरता शाहूराजाने आपले सगळे वैयक्तिक मानमरातब , प्रतिष्ठा , राजेपणाचा इतर कोणताही भाव मध्ये न आणता शिक्षण देण्यासाठी ठाम निर्णय घेतला. आपल्या विधवा सुनेचे हे एक प्रकारे पुनरुज्जीवनच होते. शाहूराजा करता हे आव्हान होते. प्रत्यक्षात घरच्या मंडळीचा विरोध डावलून ११ वर्षाच्या आपल्या सूनेला सुसंस्कृत बनविण्यासाठी महाराजांनी सारे कष्ट सोसले. प्रसंगी पत्रे लिहून तिला सामाजिक शिष्टाचार शिकवले , रयतेच्या सानिध्यात नेले. महाराजांच्या मनाचा मोठेपणा व स्त्रीमुक्तीची धडपड यातून दिसून येते.*

वैयक्तिक प्रतिष्ठा जपण्यासाठी अगदी आजही स्त्रीला विविध बंधनात अडकवले जाते. खोट्या प्रतिष्ठैचा हा अहंभाव त्या स्त्रीच्या मुक्तीमध्ये अडथळा बनतो. परिणामी कळीचे सुंदर फुलात रुपांतर होत नाही. याची असंख्य उदाहरणे जागोजाग सापडतील. महाराजाचे हे वैशिष्ट्ये होते की , त्यांनी नेहमीच लांबवरचे पाहिले व त्यानूसार कृती केली. ही कृती करताना अडखळले नाहीत. एकदा ध्येय ठरले तर कोणत्याही परिणामाना सामोरे जात आपली वाटचाल करायची असते...शाहूचरित्र हेच तर शिकवते.

*!! काळाची पुढची पावले चालताना..विरोध होतोच ..परंतु जो परिवर्तनवादी आहे त्याने आपली वाटचाल निश्चितपणे करायला हवी !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...